Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 1

नायक कसा असावा ? नायक असा असतो कि स्वताचा स्वार्थ न बघता समाजाची सेवा करणे ,स्वाभिमानी बाणा दाखवून समाजाच्या उन्नतीसाठी जगणे तोच खरा समाजाचा नायक अर्थातच नेता होऊ शकतो समाज म्हणजे विशिष्ट जातीचा किवा धर्माचा समूह नव्हे तर अखिल मानव जातीचा समूह होय.

अशाच एका नायकाचा वेध आपण घेणार आहोत , हा वेध घेताना कोणी याला राजकीय प्रमोशन मानेल किंवा काही पण नायक नेत्याचे त्याहीपेक्षा एका समाजकारन्याचे गुणविशेष आणि कौतुक झाले पाहिजे आणि जनतेला आपला नेता निवडायला पर्याय दयायला हवा . याचा असा अर्थ नव्हे कि इतर कोणी नेता वाईट आहे किवा नेतृत्व करू शकत नाही तरीही जनतेने बहुआयामी नेतृत्व स्वीकारून आपल्या राजकीय ,सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक इ . वाटचालीस गतिमान कराव .

असाच एक नेता म्हणजे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून असली तरी स्वताची वेगळी ओळख राजकीय ,सामाजिक आणि धम्मकार्यात केलेली आहे . बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचेच काम प्रकाश आंबेडकर करत आहेत अस वाटत ,सामाजिक बदल झाल्याशिवाय राजकीय बदलाला काही अर्थ उरत नाही ,जातीअंताची लढाई बाळासाहेबांनी सुरु केलेली केलेली आहे त्याचा संदर्भ म्हणजेच बाबासाहेबांनी मांडलेले अमुल्य विचार Inhalation Of Caste या ग्रंथात आढळतात . बाळासाहेब आंबेडकरांनी कधी तडजोडीच्या राजकारणाला महत्व दिल नाही समाजहिताच्या गोष्टीपुढे सत्तेला नाकारणारे बाळासाहेब रक्ताचेच नाही तर खऱ्या आंबेडकरी विचारांचे वारसदार ठरतात म्हणून आम्हास ते इतराहून स्वाभिमानी आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व वाटतात याचा प्रत्यय व्ही . पी . सिंह यांच्या सरकारच्या वेळेला आला , निवडणूक पूर्व जनता दलाशी राजकीय समझोता करून सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची व्ही . पी . सिंह यांची ऑफर न स्वीकारता आंबेडकरी समाजहिताच्या महत्वपूर्ण गोष्टी व्ही . पी . सिंहाकडून करवून घेतात त्यात १९५६ पासून अपूर्ण राहिलेली बाब ज्याचा अपमान बाबासाहेबांच्या मुलाला आणि प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांना मोरारजी देसाई पंतप्रधान असताना सहन करावा लागला सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोरारजीना भेटावयास गेले असता नवबौद्ध ,बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत करावा त्यावर चोरांचे मोर असलेले मोरारजी म्हणतात कि कोण सांगितले होते महारांना बौद्ध होण्याचे , त्यावर भैय्यासाहेब म्हणतात आमच्या बापाने आणि तेथून निघून जातात ,हीच मनातील सल आणि अखिल भारतातील बौद्ध जनतेच्या सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा क्षण बौद्धांचा समावेश अनुसूचित जातीत व्ही. पी .सिंग यांना करायला भाग पाडतात हेच उत्तर आहे जे आरक्षणाचा लाभ घेतात आणि वर तोंड करून विचारतात प्रकाश आंबेडकरांनी समाजासाठी काय केल ? संसदेमध्ये बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न किताब हे बाळासाहेबांच्या मुस्तद्देगिरिचे फलित आहे

क्रमश:

!!! पुणे कराराचा धिक्कार म्हणजेच बाबासाहेबांचा धिक्कार !!!



बामसेफ ,मूलनिवासी , अम्बस ,भारत मुक्ती मोर्चा इ . जातीयवादी संघटना , मी जातीयवादीच म्हणेल कारण आंबेडकरी चळवळ हि सागरासारखी आहे त्यात असल्या घाण ,नाल्यातल्या सांडपाणी असलेल्या संघटना सागरास घाण करण्यास कार्यरत असतात . पुणे करार सारखे विषय घेऊन गेल्या २५ -३० वर्षामध्ये आंबेडकरी लोकांमध्ये जात आहेत . इतक्या वर्षात स्वतःलाच मुक्ती नाही देऊ शकले तर भारताला काय मुक्ती देणार ? विशिष्ट समाजाला लक्ष करून विविध जाती पाती जोडून शिकलेल्या पण तेव्हढ्याच प्रकारे स्वताच्या डोक्याने हुकलेल्या लोकांच्या नाकर्तेपणामुळे खऱ्या आंबेडकरी चळवळीपासून दूर जात आहोत . गेल्या खूप दिवसापासून पुणे करार या विषयाचे अध्ययन सुरु केले असता लक्षात आले कि बामसेफ ,मूलनिवासी , अम्बस ,भारत मुक्ती मोर्चा इ . जातीयवादी संघटना खोटा अपप्रचार करीत आहेत , मग स्वताला आंबेडकरी म्हणवणाऱ्या ह्या भिक मागणाऱ्या संघटना RSS च्या आहेत कि आंबेडकरी आहेत हे कळत नाही .
भडवे ,दलाल या शिव्यांचा प्रवर्तक आणि बामसेफ या टोळीचा म्होरक्या वामन मेश्राम खोटा अपप्रचार करण्यात माहीर आहे शेवटी गोळा केलेल्या पैसा आणि संपत्ती च्या जोरावर समाजाला 'गुमराह ' करत आहे . काही अक्कल्शुन्य ,मूर्ख लोक स्वतःची विवेकबुद्धी कुठे गहाण ठेवतात त्यांना माहिती . फक्त एक मेंढी एकाच मार्गाने जात असेल तर बाकीही मेंढ्या त्याच मार्गाने जाणार कारण त्यांना इतर मार्ग माहित नसतो शेवटी ते मेंढीवळच असते त्यांचे.

२४ सप्टेंबर १९३२ ला जो करार गांधीजी आणि बाबासाहेबामध्ये झाला त्याला आपण पुणे करार म्हणतो . बाबासाहेबांनी केलेल्या काही मागण्यावर महात्मा गांधी ला आक्षेप होता त्यामुळे गांधीजीने आमरण उपोषण सुरु केले होते त्यात महत्वाची बाब होती कि अस्पृश्यांना वेगळ्या राखीव जागा आणि बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी २ मतदानाची मागणी , मतदानाचे २ दा अधिकार हा इतर वर्गापासून विपरीत मागणी होती आणि त्यामुळे देशातील सर्व समान नागरिकतेला फाटा मिळाल्यागत होईल हि स्तिथि त्यावेळी निर्माण झाली होती . यातून गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो समझोता झाला तो पुणे करार होय . पुणे कराराचा तपशील खालीलप्रमाणे आहे

** Puna pact 1932**

1 There shall be seats reserved for the Depressed Classes out of general electorate seats in the provincial legislatures as follows: - Madras 30; Bombay with Sind 25; Punjab 8; Bihar and Orissa 18; Central Provinces 20; Assam 7; Bengal 30; United Provinces 20. Total 148. These figures are based on the Prime Minister's (British) decision.

2 Election to these seats shall be by joint electorates subject, however, to the following procedure All members of the Depressed Classes registered in the general electoral roll of a constituency will form an electoral college which will elect a panel of tour candidates belonging to the Depressed Classes for each of such reserved seats by the method of the single vote and four persons getting the highest number of votes in such primary elections shall be the candidates for election by the general electorate.

3 The representation of the Depressed Classes in the Central Legislature shall likewise be on the principle of joint electorates and reserved seats by the method of primary election in the manner provided for in clause above for their representation in the provincial legislatures. Central
Legislature

4 In the Central Legislature 18 per cent of the seats allotted to the general electorate for British India in the said legislature shall he reserved for the Depressed Classes.

5 The system of primary election to a panel of candidates for election to the Central and Provincial Legislatures as i herein-before mentioned shall come to an end after the first ten years, unless terminated sooner by mutual agreement under the provision of clause 6 below.

6 The system of representation of Depressed Classes by reserved seats in the Provincial and Central Legislatures as provided for in clauses (1) and (4) shall continue until determined otherwise by mutual agreement between the communities concerned in this settlement.

7 The Franchise for the Central and Provincial Legislatures of the Depressed Classes shall be as indicated, in the Lothian Committee Report.

8 There shall be no disabilities attached to any one on the ground of his being a member of the Depressed Classes in regard to any election to local bodies or appointment to the public services. Every endeavour shall be made to secure a fair representation of the Depressed Classes in these respects, subject to such educational qualifications as may be laid down for appointment to the Public Services.(Adult franchise but reservation has been provided for Dalits on population basis, till 1960),
9 In every province out of the educational grant an adequate sum shall be ear-marked for providing educational facilities to the members of Depressed Classes.

पुणे करार
१) प्रांतीय विधानसभामध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी अस्पृश्य वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणेप्रमाणे मद्रास-३०, मुंबई व सिंध मिळून-१५, पंजाब-७, बिहार व ओरिसा-१८, मध्यभारत-२०, आसाम-७, बंगाल-३०, मधप्रदेश-२० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.
२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी अस्पृश्य वर्गातील ४ अमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.
३) केंद्रिय कार्यकारिणीमध्ये अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.
४) केंद्रिय कारिणीमध्ये अस्पृश्य वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल
५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.
६) प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिनीमध्ये अस्पृश्यांनाजागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे. तो पर्यंत अमलात असेल जो पर्यंत दोन्ही संबंधीत पक्षांद्वारा आपसात समझौता होऊन त्यास हटविण्याची सर्वसंमत निर्णय होत नाही.
७) केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत अस्पृश्यांनामतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.
८) अस्पृश्यांनास्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
९) सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.

असा हा संक्षिप्त स्वरूपाचा पुणे करार होता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी तो एक राजकीय समझोता गांधी सोबत केला . विशेष बाब म्हणजे हा पुणे कराराचा ड्राफ्ट गांधीजीने नव्हे तर बाबासाहेबांनी स्वतः बनविला होता ,या पुणे करारावर गांधीची नव्हे तर स्वतः बाबासाहेबांची सही आहे . मग या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी तत्कालीन परीस्थ्तीतीवर मात करण्यासाठी बनविल्या ,समाजाला अधिकार देण्यासाठी गांधीशी चार हात केले, यातून मार्ग म्हणजे पुणे करार ! बाबासाहेबांनी स्वतः तयार करून मार्ग काढला , त्याचा धिक्कार करणे म्हनजेच बाबासाहेबांचा धिक्कार आहे ,वामन मेश्राम आणि तत्सम जातीयवादी ,पैसा गोळा करणाऱ्या संघटना दिवसरात्र बाबासाहेबांचा धिक्कार आणि अपमान करत असतात . अशा संघटना पासून आंबेडकरी समाजाने व इतर बहुजन समाजाने सावध राहावे .
वामन मेश्राम लिखित पुस्तक " पुना पॅक्ट के दुष्परीणाम" या पुस्तकात अकलेचे तारे तोडताना म्हणतात कि पुणे कराराच्या विरुद्ध बाबासाहेबांनी १९४६ ला मोठ आंदोलन केल होत पण असा इतिहासात कोणताही संदर्भ नाही ,बाबासाहेब आंबेडकर हे जगातले इतके उच्चविद्याविभूषित , ज्ञानवंत महापुरुष होते कि कोणत्याही कार्यात चूक करू शकतील आणि परत ती सुधारण्यासाठी आंदोलन करतील हि गोष्ट अशक्यप्राय आहे . त्याच बाबासाहेबाबद्दल भ्रम निर्माण करणारे किती गद्दार आहेत तेही बघा . याच पुस्तकात ते असे सांगतात कि १५ जुलै १९४६ ला पुणे ला विधिमंडळाचे अधिवेशन भरणार होते त्यामध्ये उच्चन्यायालयाचे रिटायर्ड जज आर. आर. भोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आणि त्यांना जेल पण झाली होती असा वामन मेश्राम ची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे . मुळात वामन मेश्राम यांना हे माहित नाही कि आर. आर. भोळे हे १९४६ ला मुळात जज नव्हतेच ते १९६७ ला मुंबई हायकोर्टाचे जज झाले .इथे माझा प्रश्न आहे कि १९४६ ला जज असलेली व्यक्ती परत जज होऊ शकते ? बर झाली तर झाली ज्या व्यक्तीला शिक्षा झालेली आहे ती जज होऊ शकते ? यासाठी वामन मेश्राम ने त्याकाळात सरकारकडे काही शिफारस केली असेल . अशा या खोट्या आणि लबाड माहितीने बामसेफ सारख्या संघटना बाबासाहेबांचाच धिक्कार करून अपमान करीत आहेत आणि असले हे लोक आंबेडकरी चळवळीपासून दूर आहेत आणि हेच लोक खरे दुश्मन आहेत .
वामन मेश्राम ,बामसेफ आणि त्याचे काही चेले हाच अपप्रचार करून थांबत नाहीत . खोटे संदर्भ देऊन खोटे दाखले देऊन बाबासाहेबांची विटंबना करीत आहे . गोलमेज परिषदेदरम्यान बाबासाहेब आणि गांधी दरम्यान उडालेले खटके आणि ब्रिटन मधल्या मिडियाने बाबासाहेबांच्या मुलाखती पुणे कराराच्या नंतरच्या आहेत असे सांगतात. अनेक संदर्भ देऊन त्यांना काय साध्य करायचं ते अधिक जाणो . 'पुणे करार' हा तत्कालीन परिस्तितीनुसार बाबासाहेबांनी केलेला करार होता त्यामुळे हजारो वर्षापासून अधिकारापासून वंचित असलेला समाज सत्तेत जाणार होता या पुणे कराराच्या अधिकारामुळे तत्कालीन समाजाचे प्रतिनिधी विधिमंडळात जाणार होते ,ज्या समाजाला गावाच्या बाहेर रहाव लागे , चाकरीची ,घाणेची कामे करावी लागायची तो समाज पुणे करारामुळे म्हणजेच बाबासाहेबामुळे हजारो वर्षापासून निपचित पडलेला समाज आज विधिमंडळात जाणार होता आणि तो एक ऐतिहासिक क्षण होता आणि इतिहासात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचा आपण निषेध करावा कि स्वागत करून बाबासाहेबांचा गौरव करावा अर्थात याचे उत्तर गौरवच येईल . या पुणे करारामुळे अनेक प्रतिनिधी विधिमंडळात गेले स्वताची सत्ता मिळाली मग या ऐतिहासिक गोष्टीला बाबासाहेबांचे नातू तथा रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर " पुणे करार अधिकार दिवस " जर साजरा करीत असतील तर ते चूक आणि तुम्ही ते खरे! अशा या नालायक संघटना अन या नालायकी प्रवृत्तीमुळे या संघटना समाजात प्रदूषणाचे वातावरण निर्माण करून बाबासाहेबांच्या घराण्यावर नीच पातळीवर जाऊन आरोप करतात , यात विलास खरात नावाचा नालायकी प्राध्यापक आपल्या ब्लॉग वर बाळासाहेब आंबेडकर , त्यांच्या पत्नी एव्हढेच नाही तर धम्म कार्यात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याविषयीही अर्वाच्य शब्दात आपल्या घाणेरड्या तोंडातून घाण बाहेर काढतो ,असा या मूर्ख बामसेफवासी नराधमाला चांगला धडा शिकवायला हवा . तथागत बुद्धाचा फोटो छापण्याची लाज वाटणाऱ्या या जातीयवादी संघटना जितक्या दूर केल्या तेव्हढा चांगल आंबेडकरी समाजासाठी असू शकते . बाबासाहेबांना कांशीराम , संत रविदास , बसवेश्वर या सारख्या लोकांच्या रांगेत लावून अपमान करणाऱ्या संघटनांचा जेव्हढा तिरस्कार करावा तेव्हढा कमी आहे . संत बसवेश्वर लिंगाला दैवत मानून लिंगाची पूजा करतात ,मी धम्माचा उपासक असल्याने मला अशा गोष्टी लिहिण्यासही लाज वाटते अशा लोकांना हे बाबासाहेबांच्या बरोबरीने फोटो लावतात अशा ह्या संघटनांचा निषेध करावा तेव्हढा कमी आहे . अशी हि दुष्कृत्ती करून ह्या संघटना स्वताला आंबेडकरवादी कशा म्हणवून घेतात जिथे पावलोपावली बाबासाहेबांची विटंबना करीत असतील तर समाजाने यांच्यापासून सावध राहावे.
मुळात पुणे करार आज अस्तित्वात आहे का ? हा मोठा प्रश्न आहे . याच उत्त्तर नाही अस आहे मग ज्या गोष्टीच अस्तित्व नाही त्या गोष्टीची वारंवार चर्चा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या गोष्टी करून त्यांच्यासाठी पोषक वातावरण या संघटना आणि त्यांचे म्होरके आणि चेले चपाटे करीत आहेत . काही दिवसांनी हे असही सांगतील कि संविधान हे बाबासाहेबांनी मजबुरीमध्ये लिहिले होते आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले संविधान दुसरे होते म्हणून हे आता बदलायला हव . २६ नोव्हेंबर १९४९ ला बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना तयार करून शोषित ,पिडीत , मागास समाजास पुणे करारापेक्षाही अधिक अधिकार राज्यघटनेमध्ये देऊन स्वतंत्र भारताला नवी दिशा दिली . त्यावेळीच पुणे कराराचे अस्तित्व संपुष्टात आले आणि देशाची नवीन राज्यघटना बाबासाहेबांनी या देशाला दिली मग पुणे कराराचा संदर्भ देऊन असल्या संघटना फक्त लोकाकडून पैसे गोळा करीत आहेत आणि पुणे कराराचा धिक्कार करून बाबासाहेबांचाही धिक्कार करीत आहे अशा लोकांचा आपण खऱ्या स्वाभिमानी आंबेडकरी जनतेने चांगला समाचार घ्यावा आणि या मागे असलेला पक्ष आणि संघटनाचा निषेध करून आपल्या विवेक बुद्धीने आणि बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराने आणि तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने अनुसरून मार्गक्रमण करावे … जय भीम …… नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

!!! म्हाताऱ्याची अनैत्तिक कृत्ये अन वात्रटपणा !!!



आपल्या भोंदुगिरी आणि फसवेगिरी साठी प्रसिद्ध असलेला आसाराम नावाचा भोंदू जो कित्येक प्रकरणामध्ये आरोपी आहे . कुठे जमिन प्रकरणी फसवेगिरी करतो ,तर कुठे कोणा शिष्याला माहित असलेल्या कुकर्माबद्दल खून करतो ,कुठे लहान मुलांचे लैंगिक शोषण करतो तर कुठे काय काय ,पण कालपरवा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार त्याने केला तशी रीतसर त्या मुलीने तक्रार पण केलेली आहे . बलात्कार हा शब्द उच्चारताना आम्हाला लाज वाटते पण आसाराम बापू नावाचा भोंदू सराईतपणे बलात्कार करतो आणि सरकार मात्र अशा बापू भोंदू ना अभय देते . इथवरच तो आसाराम थांबला नाही तर काल चक्क त्याने स्वताची तुलना तथागत गौतम बुद्धाशी केली . तथागत हे विश्वासमान आहेत आणि आसाराम हा धुलीकणासमान . काय तर म्हणे बुद्धालाही असेच प्रसंग सहन करावे लागले होते . कुठे तथागत गौतम बुद्ध आणि कुठे हा नराधम आसाराम भोंदू ! उच्चवर्गातील काही मूर्ख लोक आपला पैसा कसा खर्च व्हावा आणि आपल्या काळ्या पैशातून कसा नंगानाच करता येईल आणि नाचगाणे करून स्वताचे मनोरंजन करून असल्या भोंदुना पाठीशी घालत आहे ,असा वर्गही तितकाच असल्या अनैतिक कृत्यासाठी जबाबदार आहे . तासानतास त्याचे प्रवचन ऐकत बसलेले लोक आणि असले भोंदू महाराज ,बापू दिन दुबळ्या लोकासाठी यांची नाळ तुटलेली दिसते . असे हे लोक खरोखरच इथल्या मूळ लोकांचे दुश्मन आहेत अस मी मानतो .

तथागत गौतम बुद्धावर असले आरोप करणारे त्या काळातले आसाराम सारखेच मनुवादी ब्राह्मण लोक होते ,बुद्धाची कीर्ती सर्वदूर पसरली होती . बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाने आणि पंचशिलेने लोक मार्गक्रमण करीत होते . ब्राह्मणवादाचे जोखड झुगारून लोक धम्मात शामिल होत होते त्यामुळे ब्राह्मणाच्या मनात बुद्धाविषयी घृणा निर्माण झालेली होती . कोणी लोक ब्राह्मणाला विचारत नव्हते सर्वत्र त्यांच्यावर थु थु होत होती . अशातच बुद्धाला बदनाम करण्यासाठी काही ब्राह्मणांनी एक डाव रचला . चिंचा नावाची देखणी ,सुंदर ब्राह्मणी तिला समोर करून तथागताला बदनाम करण्याचा डाव रचण्यात आला . तेव्हा तथागत श्रावस्ती मधील जेतवनात वास्तव्याला होते . जेव्हा लोक सायंकाळी तथागताचे दर्शन घेऊन आणि प्रवर्चन ऐकून परत येत तेव्हा हि चिंचा नावाची ब्राह्मणी हातामध्ये फुलांच्या माळा घेऊन जेतवनाकडे जात असे कोणी तिला विचारले तर उल ट उत्तर देत असे आणि म्हणत असे तुम्हाला काय करायचं ? परत रात्र जेतवनाच्या शेजारी असणाऱ्या तीर्थिकाराम वनात काढून परत सकाळी शहरात परतते तेव्हा लोक तिला विचारत कि रात्र कोठे घालवलीस तर त्यावर लोकांना उलट उत्तर देऊन म्हणायची तुम्हाला काय करायचे ? मी रात्र जेतवनात श्रमण गौतामासोबत घालवली त्यावर काही लोक विश्वास करायचे . हा प्रकार रोज चालायचा , असे ३ महिने उलटले तथागताची बदनामी व्हावी म्हणून तिने कपड्यांच्या चिंध्या पोटाला बांधून हा प्रकार असाच सुरु ठेवला आणि लोकांना वाटू लागले कि तिला ३ महिन्यांचा गर्भ राहिला . परत ९ व्या महिन्यात चिंचाने लाकडाचा ओंडका आणि त्यावर कापड पोटाला बांधले . विषारी किड्या मुंग्या ना स्वताच्या हाता पायाला चावून घेऊन सूज निर्माण केली .

अशावेळी तथागत लोकांना उपदेश करत असताना चिंचा तिथे जाऊन तथागतास म्हणाली ," हे श्रमण गौतमा ,तुम्हाला माझ्या पोटात वाढणाऱ्या गर्भाची काही काळजी नाही ,तुमची जबाबदारी आहे कि आपल्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या संगोपनाची आपण व्यवस्था करावी किवा आपल्या शिष्याला तशी सूचना करावी . यावर प्रवचन करणारे तथागत मध्येच गंभीर होऊन तिच्याकडे शांतपणे बघत राहिले . उपस्थित लोकांचा समुदाय स्तब्ध होऊन बघत होता . यावर तथागत गौतम बुद्ध म्हणाले , " हे भगिनी चिंचा , जे काही झाल हे माझ्या आणि तुझ्या मनाला चांगल्या प्रकारे माहित आहे. यावर चिंचा ब्राह्मणी म्हणाली ," हो हो माहित आहे माझ्या गर्भावस्थेला तुम्हीच कारणीभूत आहात आणि ती जोर जोरात खोकलू लागली . खोकल्यामुळे पोटाला बांधलेली लाकडी फळी पोटातून गळून पायावर पडली . त्यामुळे तिचा खोटेपणा लोकांच्या लक्षात आला . लोकांनी तिला काठीने मारून तेथून पिटाळून लावले . अशा प्रकारे बुद्धाला बदनामीचे अशाप्रकारचे अनेक षडयंत्रे तथागताच्या तेजाने गळून पडाली .

आसाराम सारखे असे भोंदू स्वतःची तुलना बुद्धाशी करून स्वताची नालायकी सिद्ध करत आहेत . ज्या तथागताचा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय आणि बौद्ध धम्माची मुलतत्वे भारतीय संविधानात समाविष्ट करून अखिल भारत तत्वाने बौद्धमयच केलेला आहे . मुळात मनुवाद्याना हे संविधान नको आहे त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे त्यामुळे या देशात असली कृत्ये केली जात आहे . परंतु मुठभर असणाऱ्या ह्या मनुवाद्याना हे माहित नाही कि बहुजन समाज आता जागृत होत आहे आणि असल्या आसरामासाठी तुरंग वाट पाहात आहे आपल्या दुष्कृत्याच्या शिक्षेसाठी !!!

!!! जयभिम ………………. नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – ३ !!!



मागील भागात आपण पाहिलं कि बौद्ध धम्माचे साहित्यिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे विकृतीकरण इथल्या ब्राह्मण्यवादाने केलेलं आहे . काही काल्पोकाल्पित काव्य, कथा रचून बहुजन समाजाला फिल्मी वाटणाऱ्या पात्राला प्रत्यक्षात उतरवून बहुजन समाजाला मानसिक गुलामीत लोटलेल आहे . इथल्या बहुजन ओबीसी ने स्वताला गुलामगिरीत ठेवायचं कि मुक्त व्हायचं हे त्यांनी ठरवावं परंतु बौद्ध धम्मबांधवांनी धम्माचे पालन आणि धम्माबद्दलचा विपर्यास आणि इतिहासाची माहिती ठेवणे हेही महत्वाच आहे .

' दसरा ' या शब्दाचा अर्थ आहे रावण ; याला दहा तोंड होती म्हणतात आणि त्याच दिवशी त्याचा वध करण्यात आला म्हणून हा दसहरा ! रावणाला दहा तोंडे नव्हतीच . दहा प्रकारची शक्ती याला प्राप्त होती , तो दसबलाने युक्त होता . ते दस बळ वैगेरे शक्ती काहीही नव्हत तर त्याने दहा परिमिता पूर्ण केलेल्या होत्या म्हणून तो दसबळ असलेला बौद्ध धर्मीय लंकेचा राजा रावण होता आणि दसबळ हे मुळात भगवान बुद्धाचे आहे

' सब्बेपि बुद्धं दसबल तनुज बोधिचेतिय नमामि '

- ज्याने दहा प्रकारचे बळ अथवा गुण प्राप्त केलेले आहे असे ते बुद्ध . या दसऱ्याला भारतातून ब्राह्मणी परंपरेने बौद्ध धम्माचा लोप केला हा अर्थ त्याच्यात आहे आणि रामायणामध्ये बुद्धाला चोर जाणा म्हटलेलं आहे . आजही आदिवासी रावणाची पूजा करतात . राम हा ब्राह्मण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा तर रावण हा ब्राह्मणेतर म्हणजेच बौद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा आहे . रावणाला ते राक्षस संबोधतात . राक्षस शब्दाचा अर्थ जो रक्षण करतो तो . कारण ' रक्ष' या धातूपासून राक्षस हा शब्द बनलेला आहे . यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी दिला जात असे परंतु यज्ञाला आणि प्राणीहत्येला ज्यांनी विरोध केला ते म्हणजेच राक्षस ज्यांनी प्राणीमात्रांचे आणि जनतेचे रक्षण केले ते असाच रक्षण करणारा रावण होता . रावणाला श्रीलंकेचा राजा दाखविण्याचे कारण म्हणजे श्रीलंका (सिलोन ) हे बौद्ध धर्माचे केंद्रस्थान होते . म्हणून रावण हा श्रीलंकेचा राजा दाखविलेल आहे . बौद्ध साहित्यात 'लंकावतार सूत्र' हे अत्यंत महत्वाचे आहे . रामायण हे महाकाव्य आहे आणि हे महाकाव्य पाली भाषेतील जातक कथेतील 'दसरथ जातक ' या जातक कथेमधून आणि ब्राह्मणी स्वरूप देऊन रचण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे भगवतगीता हे दुसर तिसर काहीही नसून धम्मपदाची नक्कल आहे . ' विजयादशमी ' च्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवून बुद्धधम्माचा स्वीकार केला म्हणून ही विजयादशमी आहे . परंतु याच दिवशी ब्राह्मणी परंपरा शस्त्र काढून त्याची पूजा करतात .

' दिवाळी ' च्या दिवशी धम्मसेनापती महामोग्गलायन यांना ठार करून तुकडे तुकडे करण्यात आले कारण बौद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार धम्मसेनापती महामोग्गलायन यांनी केला होता म्हणून त्यांचा काटा काढायचा म्हणून हे कृत्य ब्राह्मणी संस्कृतीने कट रचून केले . आणि तो दिवस 'दिवाळी' म्हणून साजरा केला . नागपूर मधील रामटेक या ठिकाणी आश्विन पौर्णिमेला ' पितांबर ' जाळतात त्याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतात . 'पीत ' म्हणजे पिवळे व 'अंबर ' म्हणजे वस्त्र म्हणजेच याच दिवशी अनेक बौद्ध भिक्खू च्या कत्तली आणि खून यांनी केलेत आणि याच दिवशी धम्मसेनापती सारीपुत्र यांचे महापरीनिर्वाण झाले त्यांना मारून टाकण्यात आल म्हणून ते पितांबर जाळण्याची परंपरा निर्माण करतात .

आर्य नागार्जुन हे आयुर्वेदाचे श्रेष्ठ जाणकार होते तसेच बौद्ध धर्मीय ,आयुर्वेदाला जे मोठे स्वरूप प्राप्त झाले ते केवळ नागार्जुन मुळे ! परंतु इथली ब्राह्मणी संस्कृती आयुर्वेदाला फक्त नागार्जुन यांचे नाव देतात मात्र आचार ,विचार पूर्ण वैदिक आणि ब्राह्मणी परंपरेचे आहेत . योगा हि बौद्ध धम्माची देन आहे . पंतजली याने बौद्ध धम्माचा उपासक असल्याचा आव आणून हि विद्या शिकून घेतली नंतर बौद्धांचे विरोधक बनून ब्राह्मणी शासन निर्माण केले आणि योगविद्या ब्राह्मणी परंपरेने प्रसारित केली . योगविद्या हे दुसरे तिसरे काही नसून 'आनापानसतिचे' विकृतीकरण केले आहे . पाली हि साऱ्यांची भारतीय भाषांची जननी आहे , असे आचार्य बुद्धघोषाने म्हटले आहे . परंतु ब्राह्मणी परंपरेने संस्कृतला साऱ्या भाषांची जननी आहे अस म्हटलं आहे .

बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरे कपडे धारण करतात . हे कपडे आपण मंगलप्रसंगी धारण करतो . आपण पाहतो कि उच्चवर्णीयाकडे कोणी मृत झाले असेल तर ते पांढरे वस्त्र धारण करतात . धम्मामध्ये आपण शुभेच्छ्या देतांना 'भवतु सब्ब मंगल ' असे म्हणतो . पण ब्राम्हणी परंपरा याचेही विकृतीकरण करते मंगल या शब्दाचा अर्थ ब्राम्हणी परंपरेने मुला - मुलीना अडथळे आल्यास ' मंगळ आहे' असे म्हणतात . करुणा ,मैत्री , मुदिता आणि उपेक्षा हे 'ब्रम्ह ' आहे . हेच श्रेष्ठ आहे . परंतु ब्राम्हणी परंपरेने ब्रम्हा ला श्रेष्ठ म्हटले आहे . 'पूजयामि मुनिन्दस्स सिरीपादसरोरुहे ' म्हणजे येथे सिरीपाद म्हणजे 'श्रीपाद '. श्री म्हणजे गुणसंपन्न ,विद्यासंपन्न ,सर्वज्ञ असे जे बुद्ध म्हणजे मुनींचे जे इंद्र (प्रमुख ) असे जे आहेत . ज्यांचे चरण हे कमाळाप्रमाणे आहेत , त्यांची पूजा करतो . श्रीपाद हे बुद्धाचे नाव आहे . पालीमध्ये ' गणपती ' या शब्दाचा अर्थ गण म्हणजे भिक्षुंचा गण अथवा संघ व पती म्हणजे प्रमुख हे भगवान बुद्धाला उद्देशून म्हटले आहे पण यांनी मळाचा आणि हत्तीच्या डोक्याचा गणपती बनविलेला आहे .

अशाप्रकारे ब्राम्हणी परंपरेने बौद्ध संस्कृतीचे जे विकृतीकरण केलेले आहे ते सर्वांनी जाणायला हव आणि बदलत्या काळात बुद्धविचार रुजवायला हवेत . इतिहासकालीन वास्तव उलगडून इतरांना दाखवायला हव तर बौद्ध धम्माच्या वाटचालीस नवी प्रेरणा आणि दिशा मिळेल . यासाठीच हा माझा छोटा प्रयत्न तीन भागामध्ये दाखविण्याचा होता . आपणही याच अवलोकन करून प्रचार आणि प्रसार करावे हि विनंती !

!!! जयभीम ............... नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – २ !!!



मागील भागात थोडक्यात काही गोष्टी आपण बघितल्यात आता आणखी थोडा आढावा घेवूयात , बुध्दविहारे ,स्तूप ,मुर्त्या ,दर्शनीय स्थळे यांचेही विकृतीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे . ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी विहार स्थापित केले . ब्राह्मणांनी बौद्ध धम्माचा लोप केल्यानंतर या विहाराचे विकृतीकरण केले . अनेक बुद्ध मुर्त्यांचा नाश करून त्या विद्रूप केल्या कुठे शंकराच्या मुर्त्यामध्ये त्याचे रुपांतर केले . या ठिकाणी महाबोधी विहाराची प्रदक्षिणा केल्यानंतर दारापुढे उभे राहून हाताने मागे मूर्तीला दगड मारण्याची पद्धत इथल्या ब्राह्मन्वाद्यानी सुरु केले त्याचा परिणाम बुद्ध मूर्तींचे विद्रुपीकरण झाले . पण जेव्हा अनागरिक देवमित्र धम्मपाल भारतात आले त्यानंतर त्यांनी ही प्रथा बंद करण्यास भाग पाडले . भगवान बुद्धाला सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर प्रथम धम्मोपदेश तथागताने पाच भिक्खुना केला केला , विहाराच्या बाजूलाच पंचवर्गीय भिक्खुच्या मुर्त्या असताना त्याच ठिकाणी त्यांना पाच पांडव मुर्त्या म्हटलं जात आहे . या महाबोधी विहाराचे प्रबंधन त्या वेळपासून ब्राह्मणी परंपरेच्या हाती आहे ते आजपर्यंत . बंगालच्या शशांक राजाने तेथील बोधीवृक्षाला मुळासकट उपटून टाकले होते . आज जो बोधिवृक्ष तेथे दिसत आहे तो संघमित्रा श्रीलंकेला घेऊन गेली होती त्याची कलम तेथून आणून लावली त्याचा हा वृक्ष आहे आणि तोच हा बोधिवृक्ष आहे . शशांक राजाने त्याचठिकाणी महेश्वराची मूर्ती स्थापन केली त्यामुळे महाबोधी विहारापुढे शिवलिंगाची स्थापना दिसते .

बुद्धगयेजवळ भगवान बुद्धाच्या दोन मुर्त्या आहेत त्यांचही विद्रुपीकरण ब्राह्मणांनी केलेलं आहे एका मूर्तीला ते 'तेल्याबाबा' तर दुसऱ्या 'ढेल्याबाबा' म्हणतात . कारण एका मूर्तीला तेल टाकल्याने तो प्रसन्न होतो त्याला तेल्याबाबा' तर दुसरीला ढेकूळ फेकून मारले कि तो प्रसन्न होतो म्हणून ढेल्याबाबा' अशाप्रकारे बुद्धमुर्त्यांचे विद्रुपीकरण इथल्या मनुवाद्यांनी केलेलं आहे . भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरीनिर्वाणादरम्यान ' चार दस्सनिय ठानानि ' सांगितले . ते म्हणजे जेथे त्यांचा जन्म झाला ते लुम्बिनी , ज्या ठिकाणी सम्यक संबोधि प्राप्त झाली ते बुद्धगया , जेथे धम्मचक्रप्रवर्तन केले ते सारनाथ व जेथे त्यांचे महापरीनिर्वान झाले ते कुशीनगर , ही चार ठिकाणे सांगितली . याच धर्तीवर त्यांनी ' चारधाम ' निर्माण केले .

जगन्नाथपुरी या ठिकाणी जगन्नाथाचे मंदिर आहे ते हिंदूंचे नसून ते मूळ बुद्धाचे आहे आणि हे एक बुद्धविहारच आहे अजूनही या मंदिरावर धम्मचक्र अंकित आहे . चीनी प्रवासी ह्युअन त्सांग याने या ठिकाणी पाच स्तुपांचा उल्लेख केला आहे . तिरुपती बालाजी हा दुसरा तिसरा कोणी नसून ते एक बौद्धविहारच आहे हे डॉ . जमनादास खोब्रागडे यांनी संशोधन करून प्रसिद्ध केले आहे . रामटेक येथील रामाचे मंदिर देखील रामाचे नसून ते बौद्धविहारच होते याचेही संशोधन सुप्रसिद्ध संशोधक चंद्रनाग नारनवरे यांनीही पुस्तकरूपात प्रकाशित करून सांगितले आहे . रामजन्मभूमी अयोध्याही संपूर्ण बुद्धानगरी होती . राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाने तेथे उत्खनन केले असता तेथे सर्व बुद्धकालीन अवशेष प्राप्त झाले आणि कुठलेच राम मंदिर नाही मिळाले पण इथल्या मनुवादी लोकांनी ह्या गोष्टी दाबून ठेवल्या विशेष म्हणजे आयोध्या शहराचे प्राचीन नाव 'साकेत ' असे होते आणि ती बुद्धनगरी होती . पंढरपूर चे विठ्ठल मंदिर हे बुद्धविहारच होते आणि पांडुरंग हे नाव भगवान बुद्धाचे होते हे डॉ . बाबासाहेबांनी म्हटले होते , या संदर्भात अनेक पुरावेही आज उपलब्ध आहेत . पवनी या ठिकाणी बुद्धकालीन दोन मोठे स्तूप सापडलेले आहेत . सांची पेक्षाही मोठा स्तूप येथे होता .यापैकी एका स्तुपावर जगन्नाथाचे मंदिर बांधलेले आहे . ज्या ज्या ठिकाणी बौद्धलेण्या होत्या त्या त्या ठिकाणी त्यांनी या सगळ्या लेण्यांना पांडवलेण्या म्हटले आहे . कार्ले येथे भगवान बुद्धाची लेणी असताना पण अगदी लेणीच्या लगतच एकविरा देवीची स्थापना करून कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यात येतो हा अतिशय घृणा आणणारा प्रकार इथल्या मनुवाद्यांनी केलेला आहे . बौद्ध धर्मावर हा ब्राह्मणांनी केलेला हल्ला आहे अस मी मानतो. रामटेकच्या नागार्जुन टेकडीवरही गुहेमध्ये नाग बसविलेला आहे . असे अनेक प्रकार अतिशय दुख देणारे आणि मनाला राग आणणारे आहेत .

ज्याप्रमाणे बौद्ध स्थळांचे विकृतीकरण केलेले आहे त्याप्रमाणे बौद्ध परंपरेचेही विकृतीकरण मनुवादी ब्राह्मणी संस्कृतीने केलेले आहे . आषाढी पौर्णिमा या दिवशी सिद्धार्थाने महामायेच्या पोटी प्रतीसंधी (जन्म ) ग्रहण केले . मुलीचे लग्न झाल्यावर आषाढी पौर्णिमेस मुलीला पतीच्या घरी ठेवीत नाहीत , माहेरी घेऊन येतात अथवा दुसरीकडे ठेवतात कारण काय तर 'आषाढी पौर्णिमा तिच्या अंगावरून जाऊ नये ' असे म्हणतात . याला कारण म्हणजे सिद्धार्थ गौतमाने आईच्या पोटात प्रवेश केला होता हा भावार्थ त्यात आहे म्हणून हिंदू ब्राह्मणी मनुवादी परंपरा हि आषाढी पौर्णिमा अशुभ मानते . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन करून धम्म प्रकशित केला . भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ गुरु आहेत म्हणून हि गुरुपौर्णिमा आहे . परंतु याही पौर्णिमेला ब्राह्मणी परंपरेने बुद्धाच्या ऐवजी व्यास आणि पन्तजलीला गुरु मानून गुरुपौर्णिमा साजरी करतात हे या गुरुपौर्णिमेचही विकृतीकरण केलेलं आढळत . याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाने प्राणीहिंसेचा निषेध केला ती प्राणीहिंसा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी देवी ,मातामाय ,मरामाय इ . यांना कोंबड्या ,बकऱ्यांचा बळी देऊन साजरा करतात .

बुद्धधम्माचे होणारे आणि झालेले विकृतीकरण याचे आकलन व्हावे आणि बौद्ध बांधवानी कृतीशील व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे . अधिक माहिती आपण पुढील भागात घेवूया .

!!! जयभीम....................नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! बौद्ध धम्माचे विकृतीकरण – १ !!!



मनुष्याला सुखाचा ,दु:ख मुक्तीचा , समता , स्वातंत्र्य ,न्याय ,बंधुत्व , शांती , मैत्रीवर आधारित बौद्ध धम्म तथागत भगवान बुद्धाने जगाला दिला पण इथल्या ब्राह्मणी संस्कृतीने स्वार्थाकरिता इतिहासात त्याचा रक्तरंजितपणे ह्रास केला परंतु बाबासाहेबांनी १९५६ ला पुनरुजीवन केले . धम्माचे विकृतीकरण ब्राह्मणी हिंदू संस्कृतीने कस केल त्याचा आढावा आपण घेऊया .

हिंदू पुराण आणि ग्रंथात बुद्धाचे विकृत स्वरुपात वर्णन आढळून येते . जसे आयोध्याकांडामधील श्लोकात रामाने बुद्धाला म्हटले आहे , " यथा ही चोर : स तथा हि बुध्दस्त तथागत नास्तिकमत्र विद्धी !"
अर्थात - जसा चोर तसा बुद्ध तथागत नास्तिक आहे असे रामाने बुद्धाच्या संदर्भात म्हटले आहे . माझा इथे सरळ प्रश्न आहे हिंदुत्ववाद्यांना जर रामायण बुद्धाच्या अगोदर होऊन गेल असेल आणि ५००० वर्षाअगोदर असेल तर बुद्धाविषयी एव्हढी घृणा रामाला का होती ? रामायण म्हणजे दुसर तिसर काही नसून बौद्ध संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती यांच्यातील संघर्ष आहे . बुद्धाचा नवव्या अवतारामध्ये दाखवून विकृतीकरण केलेलं आहे . नवव्या अवतारानंतर दहावा अवतार विष्णू कशासाठी घेणार आहे ते अनुभागवत पुराणात लिहील आहे . त्यात अस लिहील आहे कि विष्णू जो दहावा अवतार घेणार आहे तो आणि त्याचे आक्रमण किटकामध्ये बौद्धांच्या विरोधात होईल असे म्हटले आहे . बृह्न्नारदीय पुराणात बौद्ध विहारत प्रवेश हा मोठा अपराध समजण्यात आला आहे . बंगालचे स्मृतिकार शूलपाणीने असे घोषित केले आहे कि बौद्धावर नजर पडल्यास मोठे पाप होते . एव्हढ बौद्ध धर्माचे विकृतीकरण केलेले आहे .
कुमारील भट्टाने बौद्ध भिक्खूच्या सहवासात राहून बौद्ध विरोधी कार्य केले . शंकराचार्याने भगवान बुद्धाला 'असंबद्ध प्रलापी ' म्हटले आहे . तसेच मनुष्यांना मूढ करून त्यांना धर्मबाह्य मार्गाने नेण्यासाठी बुद्ध अवतीर्ण झाला असे म्हटले आहे . भिक्षु म्हणून ज्यांना दहा वर्षे झालेली असतात त्यांना 'थेर ' म्हणतात . हे बौद्ध भिक्षुकरिता आपण आदरार्थी संबोधतो . परंतु हिंदू संस्कृतीने तो शब्द बदलवून ' थेरडा ' असे केले आहे . 'थेर ' याच शब्दाला अजून 'धेड ' इथल्या ब्राह्मण संस्कृतीने केले आहे . ब्राह्मण संस्कृतीचे पालन आज बसपा ,बामसेफ सारखे पक्ष अर्थात कांशीराम पासून मायावती , वामन मेश्राम इथल्या बौद्ध लोकांना शिव्या देण्यासाठी 'धेड ' 'गुजरे ' 'भडवे ' 'दलाल ' असे असम्यकपणे वापरून बौद्ध संस्कृतीचा अपमान केलेला आहे . परत 'भिक्खू ' या शब्दाचे विकृतीकरण इथल्या हिंदू संस्कृतीने भिकारी असे केलेले आहे त्याचप्रमाणे भिक्षुणीलाही दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर आदराने ' थेरी ' असे म्हणतो पण या शब्दाचेही ' थेरडी ' असा विपर्यास केलेला आहे .
सिद्धार्थाला ज्या बोधीवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली ते झाड म्हणजे बोधीवृक्ष . पण हिंदू संस्कृती असे सांगते कि पिंपळाच्या झाडाखाली कोणी जाऊ नका कारण तेथे 'मुंज्या ' राहतो अस स्वरूप त्यांनी प्रचलित केल . सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रथम धम्मोपदेश देऊन धम्मचक्रप्रवर्तन केल , धम्मचक्रप्रवर्तन हे बौद्धांसाठी आदराचे आहे . कृष्णाच्या हाती धम्मचक्राच्या ऐवजी 'सुदर्शनचक्र ' दाखविले आहे . बौद्ध धम्माचे 'निब्बाण ' हे अतिउच्च पद आहे . निर्वांणप्राप्ती हे धम्माचे मुख्य ध्येय आहे . परंतु निब्बाण याचेही विकृतीकरण करून निर्वाण म्हणजे तुमचा अंत आहे .

बुद्ध , धम्म आणि संघ हे बौद्धांचे त्रिशरण आहे आणि तीन हा शब्द बौद्धांसाठी महत्वाचा आहे परंतु ब्राह्मणी हिंदू परंपरेने तीन हा आकडा अशुभ मानला म्हणजेच बुद्ध , धम्म आणि संघ यांना शरण जाणे हे अशुभ आहे . 'तीन तिगाडा काम बिघाडा ' या वाक्प्रचार वापरतात . या तिन्हीना शरण गेले कि तुमचे काम बिघडते असा अर्थ ध्वनित होतो . मृत्युनंतर स्मशानात प्रेताला जाळण्यासाठी लाकडाच्या ढिगाला ठेवतात त्याला 'सरण ' अस म्हणतात . हे सरण कोणते सांगितले हे विचारणीय आहे .
धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ मार्ग आहेत . आठ हा शब्द हा शब्द अष्टांगिक मार्गाला विकृत करण्यासाठी अशुभ या दृष्टीने इथल्या हिंदू संस्कृतीने उपयोगात आणला . भगवान बुद्धाने उत्तम मंगल काय हे मंगलसुतामध्ये सांगितले आहे . पण ब्राह्मणी परंपरेने 'मंगलसुत्र ' म्हणजे स्त्रियांनी लग्नानंतर आपल्या पतीच्या नावाने घातलेला दागिना बनविले आहे . जयमंगल 'अठ्ठगाथा ' आपले मंगल होवो अशी भावना व्यक्त करण्यासाठी म्हटल्या जातात तिथे हिंदू संस्कृतीमध्ये मंगलाष्टके म्हणतात . हि मंगलाष्टके म्हणजेच जयमंगल अठ्ठगाथेचे केलेले विकृतीकरण आहे .

धम्मबांधवांनी बौद्ध धम्माचा अधिक अभ्यास करून इथल्या ब्राह्मणी हिंदू संस्कृतीच केल जाणार विकृतीकरण थांबवावं मूळ बौद्ध धम्माच पालन करून करून सम्यक संमार्गाने आपले कार्यप्रवण करावे हेच मला नमूद करावे वाटते . पुढील भागात आपण अधिक आढावा घेऊ.

!!! जयभीम ................नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक

!!! आजच्या अर्थव्यवस्थेला आपणच जबाबदार पंतप्रधान नव्हे !!!



आजच्या २१ व्या शतकात जागतिगीकिकरणाचा जेव्हढा फायदा झाला अर्थात तेव्हढंच इथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना नुकसान झाल आहे पण आपणही व्यक्तिगत निर्णय घ्यावा कि जागतिगीकरणात (Globalization ) मध्ये किती राहायचं आणि किती नाही . अर्थात आज रुपयाची किंमत घसरत आहे .डॉलरला ज्यादा भाव आहे ,मी IT क्षेत्रात असल्यामुळे अमेरिकेमधून येणाऱ्या कामाचा IT क्षेत्राला फायदा होईल परंतु इथला माझा तळागाळातील माझा समाज यात भरडला जाईल. जर रुपयाची पत घसरली तर देशांतर्गत किंमती वाढून पेट्रोल ,डीझेल चे भाव वाढून सर्व उत्पादनावर परिणाम होऊन देशात महागाई वाढते म्हणून रुपया कसा मजबूत करता येईल हे आपण बघूया . या आर्थिक स्थितीला जर कोणी पंतप्रधानाला दोष देत असेल तर तो पूर्णता: मूर्खपणा होईल आपल्या सर्वांच्या हातात आहे आपली आणि देशाची आर्थिक बाजू आपण कशी मजबूत करतो ते .

१९७० मध्ये १ $ (डॉलर ) = ४ रुपये होती . आजच्या घडीला डॉलरचा भाव ६७ -६८ रुपयाच्या पार होतांना दिसत आहे . डॉलर हा अधिक मजबूत तर रुपया अधिक कमजोर होत आहे . जागतीगीकरणात सरकारचे हात बांधले असतील कारण त्यात परकीय गुंतुवणूक आहे परंतु आपले हात मोकळे आहेत ,आपण हे बदलवू शकतो ते कसे बघा .

१ ) पेट्रोल ,डीझेल चा काटकसरीने वापर करणे , स्वतःचे पोट भरणारे नायक , चित्रपट निर्माते यावर पैसे उधळू नका .

२ ) थंड शीतपेय ७० - ८० पैशात निर्माण होतात पण आता १५ ते २० रु . ते विकतात असे पेय पिण्याचे टाळा त्याऐवजी निंबू ज्यूस , लस्सी असे देशी पेय प्या .

३ ) साबण - lux,lifebuoy,rexona,liril,dove,pears,hamam,lesancy,camay,palmotive यांच्याऐवजी स्वदेशी cinthol,santoor,medimix, neem असे साबण वापरावे .

४ ) टूथपेस्ट - colgate,close up,pepsodent,cibaca यांच्याऐवजी स्वदेशी Neem, babool, vicco, dabur, promise असे
टूथपेस्ट वापरावे .

५ ) टूथब्रश - colgate, close up, oral-b,pepsodent,forhans यांच्याऐवजी स्वदेशी prudent,ajanta,promise वापरावे .

६ ) शेविंग क्रीम - palmotive,old spice,gillete यांच्याऐवजी स्वदेशी godrej ,emami, vjohn वापरावे .

७ ) ब्लेड - seven-o-clock,365,gillete यांच्याऐवजी स्वदेशी supermax,topaz,laser,ashoka वापरावे .

८ ) टाल्कम पावडर - ponds,old spice,johnson,shower to shower यांच्याऐवजी स्वदेशी santoor,gokul,cinthol,boroplus वापरावे .

९ ) मिल्क पावडर - anikspray,milkana, everyday milk, milkmaid यांच्याऐवजी स्वदेशी indiana,amul,amulya' verka वापरावे अर्थात जे लोक दुधाऐवजी पावडर वापरतात त्यांनी .

१० ) शाम्पू - halo, all clear,nyle sunsilk,head and shoulders, pantene यांच्याऐवजी स्वदेशी Nirma, Velvette इत्यादी वापरावे .

११ ) मोबईल कनेक्शन - vodafone, docomo इ . ऐवजी स्वदेशी bsnl,airtel,reliance वापरावे .

१२ ) बाहेरील जेवण - macdonld, subway, pizza hut, kfc ऐवजी स्थानिक उपहार गृह ,हॉटेल मध्ये जेवावे अर्थात सामान्य लोक macdonld, subway, pizza hut, kfc कडे जात नाही पण मध्यमवर्गीय लोकांनी ते टाळावे .

१३ ) मोबईल फोन - samsung,apple, htc, sony, nokia ऐवजी देशी बनावटीचे फोन अर्थात micromax, karbonn,virgin इ . वापरावे .

१४ ) टु व्हीलर गाडी - honda, yamaha यासारख्या विदेशी गाड्याऐवजी hero, royal enfield सारख्या देशी बनावटीच्या गाड्या घ्याव्या .

१५ ) फुटवेयर - nike, reebok,adidas,converse ऐवजी स्वदेशी bata, chavda इ देशी पायातले चप्पल, बूट इ वापरावे .

१६) जीन्स आणि शर्टस - lee,levi's,U.s. Polo, pepe, benetton ऐवजी स्वदेशी spykar, k-lounge वापरावे .

१७ ) घड्याळ - tommy, Citizen,zodiac,tissot ऐवजी स्वदेशी titan, sonata ,fasttrack अशा घड्याळ वापराव्यात .

असे अनेक उत्पादने आपण स्वदेशी वापरून देशाची आर्थिक पत सुधारून आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेली रुपयाची किंमत परत आणू शकतो . Hindustan Liver किंवा Uniliver यांचीही उत्पादने टाळावीत कारण याही परकीय कंपन्या आहेत . हा दोष पंतप्रधान किवा सरकारचा नाहीये तो दोष आपला आहे . स्वतःमध्ये अनेक गोष्टी तपासून पहा आणि देशाचा स्वाभिमान परत मिळवा .

!!! जय भीम .............. नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव ,संचालक, एपीएस इन्फोटेक,पुणे