Sunday, 29 December 2013

देवाबद्दल पूर्वी ब्राह्मण काय म्हणत असत? ते म्हणत असत कि देव अस्तित्वात आहे . तो कोठे आहे ? असे विचारल्यास ब्राह्मण म्हणत असत कि तो दिसू शकत नाही . तुम्ही जर म्हणालात कि कमीत कमी ब्राह्मणांना तरी तो दिसू शकतो का ? जर दिसत असेल तर त्याचा आकार कसा असतो . तेव्हा ते म्हणतात देवाला आकारही नसतो . जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा ते म्हणतात त्याला स्पर्श करता येत नाही . ते म्हणतात देवाला आकारही नाही . जेव्हा तुम्ही विचाराल कि मग विश्वास कसा ठेवायचा ? तेव्हा ते म्हणतात कि देव हा अदृश्य स्वरुपात आहे . या सर्व गोष्टी वाईट असतील तर ब्राह्मणांना मूर्ख का बर म्हणू नये ? त्यांना शहाणे कसे म्हणायचे ? जर देवाला कोणी पाहू शकत नसेल , स्पर्श करू शकत नसेल किंवा तशी जाणीवही नसेल तर मग ब्राह्मणांना देवाबद्दल माहिती कशी ? लोक त्यावर अंधपणाने विश्वास ठेवतात हा मूर्खपणा नव्हे काय ?

देवाच्या निर्मिकाने देवाला कुठलाही आकार नाही सांगितले , कुठले हात पाय नाही सांगितले , देव हे फक्त तत्वज्ञान आहे आणि ते सर्व जाणीवेपलीकडे आहे असे अल्वार ,नयन्मार आणि महान यांनीही सांगितले . मग आजकालच्या देवांना आकार कसा काय प्राप्त झाला ? मंदिरामध्ये मुर्त्या ठेवून त्यांना देव संबोधणे कितपत योग्य आहे ? म्हणून देव निर्माण करणारा नीच आणि मूर्ख नव्हे काय ? देवाला विशिष्ट आकार कोणी दिला ? देवाला आपण पाहू शकत नाही आणि त्याला स्पर्शहि करू शकत नाही हे जर खरे असेल तर त्याला दिवसातून सहा सहा वेळा अन्न देण्यात काय अर्थ आहे . अशा गोष्टीवर अमाप खर्च करणारी माणसे अस्तित्वात आहेत म्हणून तर हि नीच माणसे त्यांना फसवीत आहेत .

देवाला अन्न ग्रहण ग्रहण करताना कोणी पाहिलं का ? देवाला जिवंत राहण्यासाठी सहा सहा वेळा अन्न ग्रहण करण्याची गरज आहे का ? कोण व्यक्ती आहे जो देवाच्या मुखात घास भरवतो ? देव अन्न पचन करतो का ? दिवसातून एखादवेळी तरी देव शौचास जाताना कोणी पाहिलं का ? कोणी त्याला लघवी करताना पाहिलं का ?खरोखर देव जागचा हलू शकत नाही मग या नैसर्गिक विधी तो कोठे उरकतो ? या विषयावर जो काहीच विचार करीत नाही आणि विचारतही नाही त्याला महान व आस्तिक समजले जाते . देवाला कशाचीही गरज नाही हे जर खरे असेल तर ब्राह्मण देवाचे लग्न वैगेरे कशासाठी लावतात ? त्यास पत्नी व मुले कशासाठी हवीत ? एका देवाला दोन पत्न्या आहेत तर काहींना हजारो पत्न्या आहेत देवांना हजारो पत्न्यांची गरज काय ? याविषयी ते विचारही करू शकत नाही आणि उत्तरही देऊ शकत नाही . ते इथेच थांबत नाहीत तर ते दरवर्षी देवाचा लग्न समारंभ साजरा करतात . जे लोक देवाच्या लग्नास भक्तीभावाने उपस्थित राहतात ते विचारही करीत नाही आणि विचारतही नाही कि मागच्या वर्षी झालेल्या लग्नाचं काय झाल ? काय त्या देवाची पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली ? का एखाद्या आजाराने मरण पावली ? का असा एखादा कायदा आहे कि देवाचे लग्न एका वर्षासाठीच कायदेशीर ठरविले जाते ? हे प्रश्न विचारण्याची कोणाला गरज वाटते का ? दरवर्षी देवाच्या लग्नाला उपस्थित राहणारे मूर्खच आहेत .

जर देव साक्षात सदगुणांची मूर्ती असेल तर तो असा विविध स्त्रियांशी सबंध कसा काय ठेवू शकतो ? महाकाव्यात ,ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शिव , विष्णू , कृष्ण इ . देवांनी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्यांना अनेक बायका असूनही अशा स्त्रिया ठेवण्याची गरज का भासली ? असा प्रश्न कोणी विचारतो का ? देवाच्या वर्तनावर आणि चारित्र्यावर अनेक कथा रचल्या आहेत . त्यांचे देव नालायक व्यक्तीसारखे वर्तन करीत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे . काही देवांनी तर इतरांच्या पत्नींशी बळजबरी केल्याचे वर्णन आढळते . हे देव माणूस म्हणून घेण्यास पात्र नाहीत . अशा निर्माण केलेल्या देवांचा धिक्कारच करायला हवा .

(साभार - पेरियार रामसामी यांनी मेत्टपलायम तमिळनाडू इथे दिलेलं भाषण )

- प्रवीण जाधव
!!! धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीच १४ ऑक्टोंबर नव्हे !!!

मागील माझ्या बौद्ध धम्माचे विकृतीकरण या सदराखाली मी दशहरा / दसरा या विषयी विस्तृत माहिती दिली आहे . रावण , दसबळी इ . जे मांडले गेले आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत असतील तर तो बौद्ध धम्माच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे . बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना मोठ करण्यात काहीही उपयोग नाही . ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण अथवा म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ ऑक्टोबर म्हणून नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत चूक आहे याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न मी करतो .

'दसरा' हा हिंदू चा सण त्याच दिवशी येतो म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा असे बरेच लोक सांगताना आढळतात पण बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करणे आवश्यक आहे . सम्राट अशोक वयाच्या २१ व्या वर्षी मगध च्या गादीवर बसला आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारत देशाचा अनभिषीज्ञ सम्राट बनला एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशावर युद्ध पुकारले , युद्धात लाखो माणसे मारली गेली , लाखो लोक जखमी झाले. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती वाटली नाही. विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता त्याचवेळी भन्ते निग्रोध चारीकेसाठी चालले होते . बुद्धं सरणं गच्छामीचा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला . अशोक म्हणतो , या भन्ते ,आपले स्वागत असो आपण वेळेवर आलात , मला आशीर्वाद द्यावा ,मी आता सम्राट झालो . त्यावर भन्ते म्हणाले , यात तू कसला आलास सम्राट , तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस , हे सारे कशासाठी ? तृष्णेपोटीच ना ! यात जनहित मुळीच नाही . या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतो ना , हे सारे तुझ्याचमुळे झाले , असे दुष्कर्म तू केलेले आहेस .

पुढे भन्ते तथागताचा मैत्री , अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात . अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो ," मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही ,युद्ध करणार नाही ,आजपासून मी धर्मशील होणार , मी बुद्ध धम्माला शरण जाणार तेव्हा अशोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतात . तो काळ म्हणजे इ . स . पूर्व २५४ आणि तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमीचा दिवस . तेव्हाच सम्राट अशोकाने एक जाहीरनामा आपल्या राजमुद्रेत अंकित करून दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे बौद्ध धम्माचे एक प्रतिक म्हणून अशोकविजयादशमी दसहारा हा उत्सव साजरा करण्यात आला . सम्राट अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले , अनेक लेण्या , स्तंभ उभारले . ८४००० स्तूप बांधले . लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली .बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला 'दसहारा ' नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट करून अशोकविजयादशमी , दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला तो सम्राट अशोकाचा नातू बृह्दत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत .

सम्राट अशोकाने ८४००० स्तुपासाठी अमाप पैसा खर्च केला इ . स . पूर्व २६७ ला सुरु झालेलं काम अगदी झपाट्याने इ . स . पूर्व २६५ ला पूर्ण झाले त्याचे कारण म्हणजे शहाणव्व कोटी सुवर्णमुद्रा खर्च करून हे बांधकाम पूर्ण केले . सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य ,संपत्तीवान राजा होता म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे ' भारत सोने कि चिडिया ' किवा ' सोन्याचा धूर भारतातून निघत होता ' असे लोक आजही अभिमानाने म्हणतात . पुढे पुष्पमित्र शुंगाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट ब्रूहदत्त उर्फ बुद्धरथ चा खून करून रक्तरंजित प्रतीक्रांती करून लाखो बौध्द धर्मियांच्या , भिक्खुंच्या कत्तली केल्या . एका भिक्खूचे डोके जो आणेल त्याला १०० सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या अर्थात सम्राट अशोकाच्या वंशांची संपतीची देखील लुट केली आणि बौद्ध धम्माच्या पाडवासाठी 'दसहारा ' जो सम्राट अशोकाने धम्म उत्सव सुरु केला होता त्याला आपले विकृत रूप देऊन धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पाडाव केला म्हणून आपल्यापरीने तोच सण सूडभावनेने साजरे केले . बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना आकर्षित करणाऱ्या होत्या कि बुद्ध मूर्तीची रथयात्रा , महोत्सव ,सण , उपोसथ इ स्वीकारून त्याचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले . मनु ला हाती धरून मनुस्मृतीची रचना केली , रामायण , महाभारत, भगवदगीता ,पुराणे इ . काव्ये निर्माण करून स्वतःला राम आणि मोर्य राजांना रावणासारखे दर्शवून बौद्ध धम्माला मोठा शह दिला . अनेक स्तूप ,विहारे, लेण्या बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले . काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली ज्यात पंढरपूर , तिरुपती , बद्रीनाथ ,जग्गनाथपुरी अशी मुळची बुद्ध विहारे बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले .

अर्थात बाबासाहेबांनी १९५६ या वर्षात येणारी अशोकविजयादशमी अर्थात दशहारा हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकाने तथागत बुद्धाने केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तनचे अनुष्ठान केले . म्हणून आपण अशोकविजयादशमी चे ऐतिहासिक महत्व आणि धम्माचे पालन करून अनुसरण करावे . जर १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर आपले नावाला आंबेडकरी म्हणवणारे , २२ प्रतिज्ञा न पाळणारे , गणपती , दहीहंडी , नवरात्र साजरा करणारे १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतील पण दसरा या दिवशी पुष्पमित्र शुंगाने ब्राह्मणी हिंदू परंपरेने सुरु केलेल्या सणाला आपट्याची पाने तोडत बसतील म्हणून हा मूळ आपला दशहारा अर्थात अशोक विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन साजरे करून परत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा एव्हढंच मला सांगाव वाटत .

!!! नमो बुद्धाय ……………जय भीम !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक
!!! जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!!

ब्राह्मण म्हणून द्वेष , चीड ,राग निर्माण करणे , केवळ एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणे ह्या घातक प्रवृत्ती आहेत . काही संघटना ह्या फक्त व्यक्तीद्वेषावर उभ्या राहत असतील तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतीय राष्ट्रवाद याला मुठमाती दिल्यासारखे होईल . परंतु जो ब्राह्मण निर्मित 'मनुवाद' जोपासत असेल तोच खरा जातीयवादी आहे मग तर कुठल्याही जाती , धर्माचा असेना . माझे अनेक मित्र , मैत्रिणी ब्राह्मण आहेत तेही बाबासाहेबांचे विचार जोपासतात , आज इतके ब्राह्मण समाजातले लोक आहेत त्यांनी मनुवादाला मूठमाती दिलेली आहे . जेव्हढ बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजातील लोक वाचत नाहीत त्यापेक्षा अधिक अभ्यास काही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलेले ब्राह्मण करीत आहे याचा अर्थ सर्वच ब्राह्मण चांगले किंवा सर्वच ब्राह्मण वाईट असा होत नाही . बाबासाहेबांच्या संकल्पेनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतीयत्वाची कल्पना दूर करून काही संघटना आणि लोक केवळ ते जन्माने ब्राह्मण आहे म्हणून जातीय द्वेष निर्माण करून जातीयतेचा हा पेटता निखारा तसाच तेवत ठेवतात . समाज प्रबोधनासाठी ३३ कोटी देवांना लाथ मारणारे अभिनेते ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम लागू , ब्राह्मणवाद हा चुकीचा आहे अस सांगणारे प्र . के . अत्रे असो कि पु . ल . देशपांडे किवा अंधश्रद्धेविरुद्ध लढताना गोळ्या खाऊन मरणारे नरेंद्र दाभोळकर या सारखे अनेक लोक ब्राह्मणच आहेत . जर नुसता ब्राह्मण नावाने द्वेषसत्र सुरु ठेवले तर जो प्रामाणिक काम करणारा काही ब्राह्मण वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारख होईल . गांधी , जिना पेक्षाही श्रेष्ठ न्यायमूर्ती रानडे आहेत असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग रानडे सारखी महापुरूषे हे त्यांच्याच ब्राह्मणव्यवस्थेशी झगडत होते . मुळात जो ब्राह्मणवाद पाळणारे कोणीही असो मग तेच खरे देशाचे दुश्मन आहेत असे मला वाटते .

ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रमाणात जातिवाद आणि ब्राह्मणवाद ब्राह्मणवादाच्या सावलीत वाढणाऱ्या काही जातीत तो अधिक आहे . स्वतःच्या जाती ब्राह्मण व्यवस्थेमध्ये शुद्र असूनही इतर जाती धर्माला कानिष्टतम दाखविणाऱ्या या जाती खरा ब्राह्मणवाद पाळत आहेत आणि अगोदर अनेक हजारो वर्षापासून जातीपातीच्या उतरंडी खाली जगण्यातच धन्यता ह्या काही मानात आलेल्या आहेत . महाराष्ट्रामध्ये खासकरून मराठा समाजाकडून अनेक कालखंडापासून इतर मागाससमाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे . याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज दोषी नाही परंतु अलीकडच्या काळात मराठा समाजामध्ये याचे प्रमाण बहुतांश आहे . समाजप्रबोधनाचा ठेका घेतलेल्या काही संघटना विशेष करून मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड यांची मानसिकता फक्त ब्राह्मण द्वेष निर्माण करणारी अधिक वाटते . एक नंबर च्या खुर्चीवर असलेला ब्राह्मण समाज केव्हा खाली येउन त्यावर आपला नंबर केव्हा लागतो हेच या संघटनांच्या कृतीतून अधिक भासते . मागासवर्गीयांवर जेव्हा ज्या समाजाकडून अन्याय , अत्याचार होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना त्यांच्या समाजात जाऊन याच प्रबोधन करतात का ? मागास समाजावर जेंव्हा अत्याचार , खून , बलात्कार इ . वाईट गोष्टी होतात त्यावर कधी मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड कधी तोंडातून ब्र काढतात का ? मग रस्त्यावर उतरून न्याय हक्क मिळवून देणे तर दूरची गोष्ट आहे . मूलनिवासी , बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा , अम्बस सारख्या संघटना फक्त पैसा गोळा करणे आणि समाजप्रबोधनाच्या नावाखाली भाषणे देणे या व्यतिरिक्त गेल्या २५ - ३० वर्षापासून काहीही करीत नाहीत . मराठा संघटनाना अन्याय ,अत्याचार फक्त आपल्या समाजावर दिसतो ,अशा जबाबदार लोकांची जबाबदारी हवी कि समाजाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करणे . निव्वळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या संघटना आणि विनायक मेटे सारखे लोक फक्त समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतात . अन्याय अत्याचार जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढ्याच ह्या संघटना प्रबोधनाच्या नावाखाली अन्याय , अत्याचारावर मूकपणा बाळगणारे जबाबदार आहेत .

अन्याय , अत्याचार जिथे झाला तिथली परिस्तिथी न जाणता आपणही पेपर , टीव्ही मधून येणाऱ्या बातम्यांना हवा देऊन फक्त संघर्षाचे आणि जातीयतेचे विष पेरत असतो . समाजातील काही लोक फक्त मोठेपणा दाखविण्यासाठी सदर प्रकरणाला हवा देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करतात . ज्या कुटुंबावर , समूहावर अन्याय अत्याचार झाला त्या कुटुंबाला कायदेशीर साथ देणे , गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटणे , त्या कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे , परत असले अन्याय , अत्याचार होऊ नये म्हणून तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे , जाती ह्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी जातीअंताचा लढा सुरु ठेवणे ,हि आपली आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी असली पाहिजे . तथागत भगवान बुद्ध ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार स्वातंत्र्य , समता , बंधुता , शांती , अहिंसा ,मैत्री , प्रेम या तत्वांचे रुजुनीकरण होण्यासाठी झटणे तेव्हाच अन्यायग्रस्त समाजाला आणि त्यादृष्टीने तशी व्यवस्था निर्माण होण्याला न्याय देण्यासारखे होईल .

!!! नमो बुद्धाय ……… जयभीम !!!
- प्रवीण जाधव
 
!!! निराश मनोवृत्ती समाजपरिवर्तन कशा करतील ? !!!


रिपब्लिकन चळवळीला ५७ वर्ष झालीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष राजकिय पटलावर शुन्य असला तरी सामाजिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहे हे अनेक सामाजिक चळवळीतून अनेक सामाजिक आंदोलनांची लढे करण्यात यशस्वी झाला आहे . रिपब्लिकन पक्षाने राजकीय पटलावर सुरु केलेली घौड दौड अतिशय यशस्वीपणे सुरु केली याची फळे सुरुवातीला महाराष्ट्र , उत्तरप्रदेश ,पंजाब आणि बंगाल प्रांतात यशस्वीपणे पक्ष संघटन आणि राजकीय यश सुरुवातीला या पक्षाला मिळाल अर्थात याच कारण दादासाहेब गायकवाड सारख्या नेत्याला समोर करून सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी तितकीच साथ दिली होती परंतु फुटीचा शाप आणि स्वार्थीवृत्तीमुळे नेत्यांनी पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले . भैय्यासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आनण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले . दादासाहेबांचे आजारपनाचा काही स्वार्थी नेत्यांनी आणि कॉंग्रेस नेत्यांनी घेऊन रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्वच संपून टाकले . रा . सु . गवई नी तेंव्हापासून धरलेली कॉंग्रेसची वाट धरली ती आजवर सुटलेली नाही . अनेक वेळा नेते एकत्र आले आणि फुटले स्वार्थी हेतूनी स्वतःचे पोट समाजाच्या पोटापेक्षा मोठे समजणारे नेते कधी याच्या दावणीला कधी त्याच्या दावणीला दिसले .

जेव्हा जेव्हा कॉंग्रस अडचणीत येते सत्ता हातातून निसटू लागते तेव्हा कॉंग्रेस धार्जिण्या रिपब्लिकन नेत्यांना हाताशी धरून रिपब्लिकन ऐक्याची बोंब इथल्या कॉंग्रेस कडून उठवली जाते ८० च्या काळात प्रकाश आंबेडकरांचा उदय त्या वेळी तुकड्या तुकड्या मध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीला भारिप अर्थात भारतीय रिपब्लिकन पक्ष या माध्यमातून एकत्र आणण्यात यशस्वी होत होते . त्या नंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाने लढविलेली निवडणूक पक्षाचे नवीन तरुण मंडळी निवडून आली नाही पण राजकीय पटलावर आपला ठसा आणि घेतलेली मते लक्षणीय ठरली . अर्थात हि वाटचाल फक्त प्रकाश आंबेडकरांची एकट्याची नव्हती तर संपूर्ण आंबेडकरी समाज एकोप्याने आणि स्वाभिमानाने पुढे जात होती . राजकीय परिवर्तनाची ती नांदी होती पण पुढे कॉंग्रेस ने चळवळ जेव्हा हवी असेल तेव्हा काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून रिपब्लिकन चळवळीला खिंडार पाडले . जेव्हा कॉंग्रेस अडचणीत आली तेव्हा ९ शेंबड्या पोरांना उपोषणाला बसवून रिपब्लिकन ऐक्य हे गोंडस नाव देऊन , प्रकाश आंबेडकरांनी मजबूत केलेली रिपब्लिकन चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम केले . ऐक्यामुळे इतर कोणाचे नाही पण प्रकाश आंबेडकरानी सुरु केलेल्या स्वाभिमानी चळवळीचे राजकीय पटलावर मोठे नुकसान झाले . प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात समाज आगेकूच करीत असताना रामदास आठवले रिडल्स असो वा इतर आंदोलने असो प्रकाश आंबेडकरासोबत होते . पण आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन आणि आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करणारा 'शरद पवार ' याने रामदास आठवले ला फोडून रामदास आठवले सारख्या नेत्याला हाताशी धरून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आगेकूच करणारी आंबेडकरी चळवळ आणि प्रकाश आंबेडकराना शह देण्याचा प्रयत्न केला . रामदास आठवले लाचारीने शरद पवार सोबत २० वर्ष राहून रिपब्लिकन चळवळ राजकीय पटलावर शुन्य करून टाकली .आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन शरद पवार पासून फारकत घेऊन शरद पवाराच मित्र आणि आंबेडकरी चळवळीचा महादुश्मन असलेल्या बाळ ठाकरे चरणी लीन होऊन आज सत्तेचा तुकड्यासाठी कधी उद्धव ठाकरे तर कधी गोपीनाथ मुंडे ला 'जोहार माय बाप जोहार' करताना दिसत आहेत आणि तिकडून काही हाती मिळत नाही हे दिसत असताना पडद्यामागून प्रकाश आंबेडकराना 'ऐक्याचे ' साकडे घालताना दिसत आहेत . इतर गटाचे नेते शांत बसून येणाऱ्या तुकड्याची वाट पाहत आहेत . इथे खरोखरच समाजाने आणि आंबेडकरी तरुणांनी स्वतः तटस्त राहून शिव्या हाकण्याचा जो कार्यक्रम फेसबुक वरून चालतो तो थांबवून निदान आपल्या भागात समाजाला जागृत करून खऱ्या रिपब्लिकन चळवळीला मजबूत कराव .

आज बरेच निराशावादी लोक हे रिपब्लिकन चळवळीला हे व्हायला हव होत हे करयला हव होत , आपण एव्हढे निराश झालो का ? घरात बसून समाजपरिवर्तानाच्या गप्पा करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या वारसाएव्हढे कर्तुत्व बजावले आहे का ? किंवा समाज परिवर्तनाच्या गोष्टी करून जे वास्तव आहे , जे प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचाराने आंबेडकर घराणे काम करत आहे त्यांना शह देण्याचे प्रयत्न पडद्याआडून होत आहेत . रिपब्लिकन चळवळीला अपयश आले आहे आणि आम्हीच ती उभारू आमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही ? चळवळीला नेताच राहिला नाही अशा वल्गना करणाऱ्यांनी उद्याच नवीन दुकान उघडण्याचे कंत्राट स्वतःकडे आहे आणि आम्हिच याचे वाली आणि आम्हीच या चळवळीचे प्रेषित आहोत हि भूमिका घेतात . बाबासाहेबांच्या विचारांनी बहुजन शेतकरी , शेतमजूर ,कष्टकरी , कामगार या लोकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी उभी करण्यात बाळासाहेब आंबेडकर यशस्वी होत आहेत तर ती एक उल्लेखनीय आणि अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल . या वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हढे सामाजिक मुद्दे ,लढे , सभा इतर कोणी नेत्यांनी घेतले किंवा लढले नाही . एव्हढे सारे कर्तुत्व असताना समाजात नेता नाही म्हणणारे आणि गढुळ वातावरण निर्माण करणारे स्वयंघोषित फेसबुकी विचारवंत चळवळीचे खरे मारक आहेत .

आज रिपब्लिकन चळवळीत बाळासाहेब आंबेडकराइतका प्रगल्भ , अभ्यासू नेता नाही , अन्य नेते कुठे असतात त्यांना माहिती पण निवडणुकीची तुतारी वाजायला लागली कि अनेक स्वयघोषित नेते ऐक्याची हाक देताना दिसतात . एखादा भिकारी भिक मागून थकेल पण रामदास आठवले अजिबात थकत नाहीत , उद्धव ठाकरे ची भेट होत नाही हे हेरून लक्ष्मीपूजनाच्या शुभेछ्यांच्या नावाखाली एका राज्यसभेच्या जागेची मागणी करून लाचार शब्दालाही लाज वाटेल इतका लाचारपणा चालवलेला आहे त्यांचा संसार त्यांना लखलाभ असो पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक चळवळ चालविणाऱ्या बाबासाहेबांच्या रक्ताला बदनाम आणि शह देणाऱ्या लोकांची निराशावादीवृत्ती हि तुमच्या स्वतःची आहे समाजाची नाही . आज चळवळ सक्षमपणे अभ्यासूपणे पाहले असता बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेता आजवर चालवत आहेत , अकोला ,औरंगाबाद ,चंद्रपूर , नागपूर सहित अनेक ठिकाणी स्वबळावर लोकप्रतिनिधी बाळासाहेबांनी निवडून आणलेत , इतरांच काय ? कवाडेचे काय अस्तित्व ? गवई कुठे आहेत ? आठवले स्वबळावर लढले का ? समाजाने नेत्यांचा विचार करायचा कि ३ कोटीच्यावर असलेल्या समाजाचा विचार करायचा . चळवळीला बाबासाहेबांच्या रक्ताचा नेता आहे तो कधीच सांगत नाही कि मी तुमचा नेता नाही पण कृतीतून कार्य करणाऱ्या नेत्याची ओळख होते . रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा वाजविणारे आणि निराशावादी फेस्बुकी विचारवंत फक्त ऐक्याच्या आडून आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करतात , स्वतःचे कर्तुत्व अस्तित्व ? ओळखून समाजात दुही आणि संभ्रम निर्माण करणारे लोक समाजाच्या भविष्याच्या विचार न करता , इथल्या प्रस्थपित व्यवस्थेवर न बोलता फक्त आंबेडकर द्वेष निर्माण करून, जो पुढे जात आहे त्याचे पाय ओढण्याचे काम करतात .

स्वतः किती परिवर्तन करू शकतो याची ग्वाही देण्याइतपत आपण मोठे नाही आहोत , जे वास्तव आहे , ज्यामागे समाजमानस आहे त्याला नाकारून आणि निराशावादी वृत्ती समाजात पसरवून समाजाचे परिवर्तन कधी होत नसते .

!!! जयभीम ...... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
!!! कोलंबसाच्या पूर्वी अमेरिकेचा शोध बौद्ध धर्मियांनी लावला !!!

भारतापासून हजारो कोसो दूर असलेल्या जावा , अमेरिका वैगेरे देशातून कोलंबस पोहोचण्यापूर्वी बौद्ध धर्माने प्रवेश केला होता . जावा बेटापर्यंत बौद्ध धर्म कसा पोहचला याची संपूर्ण हकीकत उपलब्ध नाही पण भगवान बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या तेथे सापडल्या आहेत . यावरून अमेरिकेत बौद्ध धर्मप्रचारकांचा प्रवेश हा कोलंबसाच्या पूर्वी हजारो वर्षाअगोदर झाला होता तेथे सप्रमाण देऊन अनुमान लावता येईल . या संबंधाने अमेरिकेतील मासिकात " कोलंबसाच्या पूर्वी अमेरिकेचा शोध " या शीर्षकाखाली एक लेख प्रसिध्द झाला होता . " Buddhist discovery of America in the Harper's Magazine for July 1901 " १४४० वर्षाच्या पूर्वी बौद्ध भिक्षु अमेरिकेत गेले होते आणि तेथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला होता .

प्रोफ . फ्रायर असे म्हणतात कि अनेक प्रमाणावरून सिद्ध झाले आहे कि , " पाच बौद्ध भिक्षु रशियाच्या उत्तर सीमेवरील कामश्चाटकाद्वीपकाल्पातून प्रशांत महासागर ओलांडून अलाक्साच्या बाजूने अमेरिकेत उतरले आणि दक्षिण मेक्सिको पर्यंत जाऊन पोचले होते . " या मार्गाने अमेरिकेत उतरणे अशक्य नाही . हा मार्ग किती सोपा आहे हे समोर नकाशा समोर ठेवून पाहले असता हा अत्यंत सोपा मार्ग आहे . मेक्सिकोमधल्या मूळ रहिवाशांचा प्राचीन इतिहास , त्यांचा धर्म , आचार विचार व प्राचीन कीर्तीची अवशिष्ट चिन्हे ह्या सर्व गोष्टी सत्यत्वाची साक्ष देतात . चीनच्या प्राचीन ग्रंथात फुसम नावाच्या एका प्राच्य देशाचा उल्लेख आहे . हे नाव त्या देशातल्या एका वृक्षाच्या नावावरून पडलेले असावे . मेक्सिकोमध्ये ' आगुये ' किंवा 'मागुये' नावाचा जो वृक्ष आहे त्यामध्ये व फुसम या वृक्षामध्ये बरेच साम्य आहे . चीनी भाषेत हु-एन-त्संग याने जो प्रवासवर्णन लिहिलेला आहे तो काल्पनिक नसून त्याला जे आढळले त्याने सर्व हकीकत आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेलं आहे . इ . स . ४९९ मध्ये चीनी राजा यु आन याच्या कारकीर्दीमध्ये तो फुसम येथून किंचेन येथे गेला होता . तो राज्यक्रांतीचा काळ असल्यामुळे राजदर्शनाचा योग त्याला घडला नाही . पण राज्यक्रांतीची गडबड शांत झाल्यावर तेथील नव्या राजाची भेट त्याने घेतली आणि फुसम येथून आणलेल्या चमत्कारिक वस्तू राजाला नजर केल्या . या वस्तूमध्ये एक विचित्र प्रकारचे कापड होते . हे कापड रेशमासारखे मऊ होते , त्याचे सुत बारीक असून इतके मजबूत होते कि एखादी जड वस्तू त्याला बांधून ठेवली तरी ते फाटत नसे . मेक्सिकोमधल्या 'आगवे' नावाच्या वृक्षापासून अशाप्रकारचे वस्त्र तयार होते . दुसरी नजर केलेली वस्तू म्हणजे सुंदर आरसा होती . अशाप्रकारचे आरसे मेक्सिकोच्या सीमेवरील लोकात दृष्टीस पडतात . राजाज्ञेवरून हु - एन याने आपला प्रवासवृतांत लिहिला .

पूर्वी फुसमच्या लोकांना बौद्ध धर्माची माहिती नव्हती पण इ . स . ४५८ मध्ये सुंग वंशातील ता - मीन राजाच्या कारकिर्दीत काबुलाहून पाच बौद्धभिक्षु फुसम येथे गेले व तेथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला . तेंव्हा बहुसंख्य लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तेंव्हापासून तेथील लोकांच्या नीतिमत्तेत सुधारणा झाली . हे बौद्ध भिक्षु कामश्चाटकाद्वीपकाल्पातून कोणत्या मार्गाने गेले व वाटेत किती अंतरावर त्यांना कोणकोणती स्थळे लागली , तेथील लोकांचे आचार विचार कसे होते याची सर्व हकीकत प्रवासवृत्तात आहे . फुसम वृक्षाच्या सालीपासून तंतू कसे काढतात आणि त्यांचे वस्त्रे कसे विणतात किंवा त्यापासून कागद कसा तयार करतात याचे विस्तृत वर्णन लिहून ठेविले आहे . तेथे जी फळे होतात जी प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे तीच फळे मेक्सिको मध्ये होतात . त्या देशात तांबे सापडते , पण तेथे लोखंडाच्या खाणी नाहीत व सोने , चांदी यांचा व्यवहार नाही असे म्हटले आहे . तेथील लोकांची राज्यपद्धती , आचारविचार ,विवाह , प्रेतसंस्कार ,नगररचना , सैन्य , शस्रास्रे यांचा अभाव वैगेरे संबंधाने त्या प्रवाशाने केलेली वर्णने आणि अमेरिकेच्या मूळ रहिवासी विशेषत: मेक्सिकोच्या सीमेवर राहणारे लोक यांच्यामध्ये जबरदस्त साम्य आढळते . मेक्सिकोमध्ये एक दंतकथा लोकामध्ये अशी आहे कि एक श्वेतकाय परदेशी पुरुष तेथे गेला होता व पापांचा परिहार करावा , न्याय व सत्य यास धरून व्यवहार करावा , शिष्टाचार ,मिताचार ठेवावा वैगेरे गोष्टींचा उपदेश तो करीत असे . त्याच्या स्मरणार्थ म्यागडालीना या गावामध्ये त्याची एक पाषाणमूर्ती ठेवण्यात आली होती . तिचे नाव उइ- सी- पेकोका असे होते . त्यामुळे हेच ते पाच बौद्ध भिक्षु असावेत . स्पानिश लोकांनी अमेरिका खंड जिंकला तेंव्हा लोकामध्ये प्रचलित असलेली धर्ममते , आचार ,संस्कार , त्यांचे शिल्प , घरे बांधण्याची तऱ्हा ,काल गणनेची पध्दती इ गोष्टी ज्या आशिया खंडातील बौद्ध धर्म यांच्यात बरेच साम्य होते यावरून हेच सिद्ध होते कि दोन देशातील दळण वळण असल्याशिवाय अशाप्रकारचे साम्य निर्माण होऊ शकत नाही .

परत आणखी एक प्रमाण देता येईल ते भाषाविषयक होय , भगवान बुद्धाचे नाव गौतम व वंशाचे नाव शाक्य . गौतम आणि शाक्य हि दोन्ही नावे मेक्सिकोमधील नावांशी मिळतीजुळती आहेत . उदाहरण ' ग्वातिमाला ' हे नाव 'गौतमालय ' याचा अपभ्रंश आहे . पुरोहिताचे नाव 'ग्वातेमोट - निज ' हे नाव गौतम या नावावरून निघालेले दिसते . यास्काका , जाकाटेकास , शाकाटापेक , जाकाटलाम , शाकापुलास इ . नावांशी 'शाक्य' या नावांशी साम्य आढळून येते . पालेस्के येथे एक प्राचीन बुद्धमूर्ती आहे . तिचे नाव शाक-मोल अर्थात शाक्यमुनी . कोलोराडो नदीच्या ओघात एक बेट आहे , त्यात एक पुरोहित राहत होता त्याचे नाव गोतुशाक्का म्हणजेच गौतम शाक्य असे होते .

आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे कि अमेरिकेमध्ये अश्या कित्येत वस्तू आहेत कि त्यावरून तेथे बौद्ध धर्म प्रचलित होता याला उत्कृष्ट प्रमाण सापडते . ध्यानस्थ बुद्धाच्या मूर्ती , भिक्षु वेशातल्या मूर्ती , हत्तीचे पुतळे (मेक्सिकोमध्ये हत्ती हा प्राणीच नसता तेथे त्याच्या मूर्ती कशा आल्या ?) . चीनमधील प्यागाडो बुद्धमंदिर सारख्या आकृतीची देवालये , तटावर चित्रे कोरण्याची पद्धती , कोरीव शीला , स्तूप , विहार या सर्व गोष्टी याचेच प्रमाण दाखवितात कि कोलंबसाच्या हजारो वर्षाअगोदर तेथे बौद्ध धर्मीय लोक पोहचले होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार तेथे केला होता .

(अधिक माहितीसाठी www.sacred-texts.com/earth/fu/ या वेबसाईट वर जाऊन अभ्यास करावा)

!!! जयभीम ..... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
     !!! भिडेवाड्याच्या शोधात …………… !!!

थोर महापुरुष महात्मा फुले विषयी त्यांच्या साहित्यातून बराच काही वाचाल होत पण त्यांनी १५ मे १८४८ ला भिडेवाडा येथे सुरु केलेली देशातील पहिली शाळा विषयी बरच कुतूहल होत . तो भिडेवाडा किती महान असेल या महापुरुषाचा सहवास लाभलेला म्हणून काही वर्षापूर्वी मी आणि माझा अभियंता मित्र राहुल जाधव भिडेवाडा शोधण्यासाठी निघालो . राहुल ला फक्त एव्हढंच माहित होत कि बुधवारपेठे मध्ये कुठेतरी आहे म्हणून ! बुधवारपेठेतून आम्ही पायी चालू लागलो . चालताना जणू तो काळच त्या रस्त्यामधून flashback झाल्यासारखे झाले . शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट पेशव्यांनी करून नुसता माज पेशव्यांनी वाढवला असेल , जातीयतेचा उत निर्माण करून इथल्या शुद्र समाजावर अन्याय अत्याचार याच रस्त्यावर हे पेशवे करीत असतील , इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये महात्मा फुले , सावित्रीबाई फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धाराचा जो वसा घेतला असेल तो किती किती महान आहे . ब्राह्मणी कामांध चेहरे , शेण गोटे खाऊन सगळ्या अडचणींना तोंड देऊन सावित्रीमाई ने जो स्त्री जातीचा उद्धार केला त्याची सर बदकावर बसून बदकाला त्रास देणाऱ्या काल्पनिक सरस्वतीला कुठून येणार असे अनेक विचार मनात येउन चालत होतो भिडेवाड्याच्या शोधात ! रस्त्याने चालताना अचानक देहविक्री करणाऱ्या स्त्रिया नजरेस पडल्या . मनात वाटल , पेशव्यांनी अनैतिकपणाचा किती अंत केला असेल . परराज्यातून स्त्रिया लुटून आणून त्यांना उपभोगुन त्यांना या गलिच्छ व्यवसायात ढकलुन अत्याचाराचा हा हा कार माजविला असेल . ज्या ब्राह्मण पेशव्यांनी असले घाणेरडे कृत्ये केले तिथे माझा महात्मा या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांच्या अनौरस मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून त्यांना सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई ने केले खरच त्याला तोड नाही . जेव्हढा आदर आई वडिलांसाठी असेल त्याहुनी अधिक आदर फुले दांपत्याविषयी अधिकाधिक वाढत होता , प्रत्यक्ष तो काळ अनुभवतोय कि काय हे पाहून मन भरून आले .

चालताना अनेकांना हा प्रश्न होता कि भिडेवाडा कुठे आहे ,पण तिकडून उत्तर यायचं कि भिडेवाडा काय आहे ? आमच हेच उत्तर ठरलेल असायचं कि मुलींची पहिली शाळा महात्मा फुलेनी भिडेवाड्यामध्ये सुरु केली होती . अनेकांची महात्मा फुले बद्दलची अनास्था पाहून मन नाराज होत होत, दुपारची वेळ झाली होती . समोरच एक हॉटेल दिसलं वाटल अगोदर आता काहीतरी खाऊन घ्याव . बिलाचे पैसे द्यावे आणि हॉटेल मालकाला विचारावं कारण याला कदाचित माहित असेल पण कसलं काय त्यालाही काही माहित नव्हत . समोर असलेल्या पोलिस चौकीमध्ये बसलेल्या पोलिसालाही आम्हाला हेच विश्लेषण द्यावे लागले मग त्याने आम्हाला योग्य पत्ता दिला . येउन भिडेवाड्याजवळ आलो तर त्याची स्थिती पाहून मन हेलावून गेल कारण जीर्ण झालेला हा भिडेवाडा खूप मोडकळीस आलेला होता , त्यामध्ये अतिक्रमण करण्यात आलेले दुकाने पाहून तर मनात अधिक राग निर्माण झाला.

फुले ,शाहू , आंबेडकर याचं नाव घेऊन येणार सरकारसहित महात्मा फुले , सावित्रीमाई फुले मुळे शिकलेले पण स्वतःची ओळख नसलेले आणि तेव्हढेच हुकलेले लोक पाहून या महात्म्याची होणारी हेळसांड खूप वेदानादाई होती .दुसर एक आश्चर्य म्हणजे भिडेवाड्याच्या विरुद्ध दिशेला पाहल तर "श्रीमंत दगडूशेठ हलवाई चा गणपती " नटून थटून आलेल्या स्त्रियांनी आणि मुलीनी घेरलेला दिसला . ज्या महापुरुषाने ,सावित्रीमाईने अतोनात हाल सोसून या समाजासाठी झिजले खासकरून सावित्रीमाई ! मुली शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे म्हणून आयुष्य वेचले. मुली शिकल्या प्रत्येक क्षेत्रात पुढे गेल्या . दगडू गणपतीच्या दर्शनासाठी मरत असलेल्या नटलेल्या मुलींची सावित्रीबाई विषयी असलेली अनास्था बघून मनात आक्रोश निर्माण होत होता पण आजही दगडू चा गणपती अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि अडगळीत पडलेला भिडेवाडा शेवटची घटका मोजीत आहे . दगडू गणपती ला मिळणाऱ्या देणग्या पाहल्या असता दिवस अपुरा पडतो , त्या देणगी देणारामध्ये रामदास आठवले चे नाव वाचून तर पारा अधिक चढतो पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करून फुले शाहू आंबेडकरांचे विचार प्रसार करू हे ध्येय केंव्हाचेच उरी बांधले होते .

भिडेवाड्याचे फोटो काढत असताना दगडूगणपतीच्या रांगेतले आमच्याकडे येउन हे का गणपतीचे फोटो न काढता या पडक्या वाड्याचे फोटो काढत आहेत म्हणून विचारात होते त्यावर त्यांना या वाड्याचे काय महत्व आहे हे सांगितल्यावर तेच महानग महानगी भिडेवाड्याचेही फोटो काढू लागली … हा खूप मोठा विरोधाभास होता .

आज भिडेवाडा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यावर अतिक्रमण झालेले आहे ,शासनासह सर्वांनी या कडे दुर्लक्ष केल्यामुळे तो उपेक्षेचे केंद्र झालेला आहे एव्हढंच काय तर भिडेवाडा हा आज दारूचा अड्डा झालेला आहे , सर्वांच्या दुर्लक्ष्यामुळे ऐतिहासिक भिडेवाड्याची हि दुरवस्था झालेली आहे . भिडेवाडा बचाव समिती यासाठी कित्येक वर्षापासून लढा देत आहे पण आता महात्मा फुलेंच्या वंशजांनी हा वाडा सर्व जनतेमिळून ताब्यात घेण्याचे ठरविले आहे त्याची उपेक्षा थांबविण्यासाठी हेच आंदोलन आता हाच मार्ग बाकी आहे .

आज २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले चा स्मृतीदिन खरच आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून निदान महाराष्ट्र शासनाने तरी पाळावयास हवा . महात्मा ज्योतिबा फुलेंचे कार्य सर्व समाजापर्यंत पोहचावे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हीच क्रांतीबाला वाहिलेली श्रद्धांजली ठरेल .

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त या महान क्रांतीबाला कोटी कोटी प्रणाम !!!

- प्रवीण जाधव
                   !!! आंबेडकरी तरुण जागृत होत आहे ...........!!!

राजकारण हे एक माध्यम असू शकते समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राजकारण म्हटलं कि अनेकांच्या कपाळाला आढ्या पडतात किंवा एकप्रकारे राजकीय अस्पृश्यता निर्माण झालेली आहे त्यामुळेच कि काय राजकीय परिवर्तन करणे नेहमीच अवघड राहिलेलं आहे . सामाजिक बदलला समाज चुटकीसरशी भूमिका घेऊन स्वीकारतो तिथे राजकीय बाबतीत उदासीन राहतो . राजकीय भूमिका घेणे म्हणजे दिवस रात्र पक्षाचा कार्यकर्ता होणे असा अर्थ होत नाही किंवा आपण कोणाच्या अधिपत्याखाली जातोय हि भूमिका खूप चुकीची आहे . राजकीय भूमिका घेण्यासाठी कुण्या पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता होणेही गरजेचे नाही पण स्वतःची राजकीय भूमिका घेणे सर्वात जास्त महत्वाचे आहे . मतदानाचा मिळालेला अधिकार हा फक्त सुट्टीचा दिवस साजरा करणे आणि मौजमजा करण्यासाठी सहलीला जाणे असेल तर तो लोकशाहीस मारक ठरण्यासारख आहे . त्यामुळेच कि काय नेहमी मतदानाच प्रमाण हे सरासरी ५० % च्या आत असते . याला एकाच कारण म्हणजे राजकीय अस्पृश्यता पाळणे आणि " माझा तो भाग नव्हे " हे भूमिका घेणे . कदाचित यामुळेच प्रस्थापित मनुवादी पक्ष या देशातील बहुजन समाजाला आपल्या प्रसार माध्यमातून संमोहित करून एका निरपेक्ष विचारापासून आणि भूमिकेपासून दूर घेऊन जातो आणि बहुजन आंबेडकरी समाज याला नेहमी बळी पडतो .

आज आम्ही व इतर तरुण वर्ग राजकारणाची स्पष्ट भूमिका घेत आहोत हि नक्कीच बदलाची आणि परिवर्तनाची नांदी असेल दुसऱ्या पिढीने जी संभ्रमतेची भूमिका घेतली त्यामुळेच कि काय आंबेडकर चळवळ दिशाहीन झालेली आहे . गटा तटाच्या खाईत रिपब्लिकन चळवळ वाटली गेली किंवा स्वार्थी लोकांच्या सूळसुळाटामुळे विखुरली जरी गेली तरी संभ्रमित भूमिका घेणारी दुसरी पिढी यालाही तितकीच जबाबदार आहे . स्पष्ट राजकीय भूमिका न घेतल्यामुळे किंवा आपला आणि परका कोण हे न कळाल्यामुळे म्हणा समाज नेहमीच कॉंग्रेस सारख्या मनुवादी पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आहे त्याला तोही तितकाच जबाबदार आहे . उदाहरण द्यायचं झाल तर महाराष्ट्रात कोणत्याही भागाच उदाहरण घ्यायचं झाल तर आंबेडकरी समाज लाखाच्या घरात असतो तिथे जरी रिपब्लिकन गट तट पक्ष ५ जरी असले तरी कोणत्याही एका पक्षाला मतदान होत का ? जरी रिपब्लिकन चळवळ विखुरलेली असली तरी १ लाखाच मतदान असलेला उदाहरणादाखल एक भाग घेतला तर तिथे ५ - १० गट जरी असले तिथे हेच एक लाख २० -२० हजार स्वरुपात आंबेडकरी पक्षांना जातात का ? तर याचे उत्तर आजीबात नाही तिथे एकाच आंबेडकरी पक्षालाही समाजाचे एकगठ्ठा मते मिळतही नाही आणि ती divide होतही नाही तिथे ५ ते १० हजाराच्या आसपास मते मिळतात तेही एकूण समाजाच्या एकूण मताच्या ६ ते ८ % च्या आसपास इतर समाज मते देईल तो भाग तर दुरची गोष्ट आहे . मग उरलेली मते कुठे जातात तर ती कॉंग्रेस किंवा तत्सम पक्षांना जातात याच कारण हेच कि राजकीय भूमिका विचारसरणीचा अभाव ,समाजाच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन निवडणुकीकाळात मोठी वाटणारी रक्कम पण जीवनाचा काहीही बदल न होणारी रक्कम दिली जाते . ६० वर्षापासून हाच प्रकार चालत आलेला आहे , आर्थिक परिस्थितीने मजबूर असलेल्या समाजाच काही क्षणासाठी समजून घेऊ शकतो पण थोडेफार आर्थिक स्थैर्य आलेला समाजही अशा गोष्टीना बळी पडताना आम्ही स्वतः बघितलेलं आहे ,हि खरच खूप मोठी शोकांतिका आहे , आंबेडकरी चळवळी साठी आणि राजकीय परिवर्तनासाठी ह्या प्रवृत्ती समाजातून काढून टाकणे महत्वाचे आहे .

आज आम्ही भारिप बहुजन महासंघ पक्षात अनेक उच्चशिक्षित तरुण येत आहेत स्पष्ट भूमिका घेत आहेत ते केवळ राजकारण करण्यासाठी नव्हे किंवा कोणाला निवडणुकीमध्ये उभेही राहायचे नाही आम्हाला केवळ आता आपल्या आंबेडकरी बहुजन लोकांना सत्तेत बसवायचं आहे हा संकल्प उराशी बांधलेला आहे हव तर आमचा हा २०१४ साठी एक contract समजला तरी चालेल पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांच्या विचारसरणीचा पक्ष म्हणून आणि आंबेडकरी प्रतिनिधी सत्तेत पाठवणे हेच आमचे आता भारिप च्या platform वरून स्वप्न आहे . इतरही पक्षात कोणी तरुण वर्ग जात असेल तर तीही एक स्पष्ट भूमिका आहे ,निदान या पिढीची तरी आणि त्याचे स्वागत केलेच पाहिजे याशिवाय आता बदल आणि परिवर्तन होणे शक्य नाही . मी तर म्हणेल आजचा तरुण जेव्हढा अभ्यासक झालेला आहे जो योग्य आणि अयोग्य हा फरक करू शकतो हा आंबेडकर चळवळीसाठी मी नेहमी म्हणतो कि हा सुवर्णकाळ आहे . समाजातील जशी संभ्रमित भूमिका जबाबदार होती तशी जेष्ठ आंबेडकरी साहित्यातील मंडळीहि तितकीच जबाबदार होती . एक कोणतीही राजकीय दिशा त्यांनी दाखवली नाही कि या सर्व गटातटाच्या झुंडीतून हाच तुमचा योग्य नेता आहे आणि सर्व समाजाचे एकरूपाने याच्या मागे राहावे मग तो नेता कोणीही असो अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे स्वतःच्या परिघाबाहेर न गेल्यामुळे तो सीमित राहिला . आज महाराष्ट्रात थोडस का होईना जे यश भारिप ने मिळवल आहे आणि मिळवत आहे आणि ते इतरांच्या तुलनेत आणि मनुवादी प्रस्थापित पक्षांच्या गर्तेत मोठ आहे . भारिप च मुठीभर यश काढून टाकल तर महाराष्ट्रात आंबेडकरी विचारसरणीच्या इतर पक्षांचही यश शून्य आहे हे विसरता येणार नाही . म्हणून स्पष्ट राजकीय भूमिका २०१४ समोर ठेवून येणाऱ्या आंबेडकरी तरुणाईच स्वागत सर्वांनी करायला हव .जर राजकीय बदलात शामिल होणाऱ्या तरुणाई च आपल्याच समविचारी लोकांनी खच्चीकरण केल तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही . कोणी भारिपचा हाती झेंडा घेतला म्हणजे तो परका ठरत नाही किंवा तो अस्पृश्य होत नाही फक्त मानसिकता बदला एक स्पष्ट राजकीय भूमिका घ्या , आम्ही हेही म्हणत नाही कि आम्हीच सर्वोत्तम आमचेच नेतृत्व माना अस आम्ही म्हणत नाही पण परिवर्तनाच्या या लढाईला निश्चित साथ द्या .

३ कोटी असलेल्या समाजामध्ये ५० % पेक्षा जास्त असणाऱ्या तरुणांनी एक स्पष्ट भूमिका घेऊन ३ कोटी लोक ८० ते ९० लोकप्रतिनिधी सत्तेत पाठवू शकतात हे लक्षात ठेवा .

" भिक नको सत्तेची .......सत्ता हवी हक्काची "

!!! जयभीम ..............नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव