Wednesday, 5 August 2015



                                            !!! कंचनी चा महाल !!!

माझ शालेय जीवन मेहकर पासून जवळच ११ कि .मी . असलेल्या सुलतानपूर या गावी गेल . रविवारची सुट्टी आणि मेहकर चा बाजार असल्यामुळे नेहमीच वडिलांसोबत ,मित्रांसोबत येण दर आठवड्याला सुरु असे . तो बहुदा २०
वर्षापूर्वीचा काळ असेल एकदा काही मित्रासोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलो परंतु दुपारचा शो सुरु होऊन बराच वेळ झाला होता मग आता काय करावे तर आम्ही मेहकर मध्ये हुंदडायला लागलो सायकलवर फिरण्याचा आनंद घेऊ लागलो ,मेहकर शहराच्या थोड बाहेर एक पडकी ऐतिहासिक  वास्तू आम्हाला  दिसली मला त्याबद्दल  कुतूहल निर्माण झाल परंतु ही वास्तू कसली याची माहिती कोणालाच नव्हती .पुढे शहरात शिक्षणासाठी आल्यावर महाविद्यालयीन जीवनात या वस्तूबद्दल मी वर्तमानपत्रातून वाचाल तेंव्हा यावर माझ प्रेम अधिक घट्ट झाल . ती ऐतिहासिक वास्तू म्हणजे " कंचनीचा महाल " साहित्य क्षेत्रातील याच मातीतून जन्मलेल्या ना .घ .देशपांडे यांची कलाकृती साहित्यक्षेत्रात अजरामर झाली ती म्हणजेच कंचनीचा महाल !

ना.घ .देशपांडे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा २१ ऑगस्ट १९०९  रोजी झाला .बालवयातच कवितेचा छंद ना .घ .देशपांडे यांना लागला होता .पुढे एल .एल .बी .करून देशपांडे यांनी वकिली व्यवसायाला मेहकर सत्र न्यायालयात सुरुवात केली .बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली शीळ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून भावगीत हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली शीळ याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली अभिसार हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याशिवाय कंचनीचा महाल (चार दीर्घकवितांचा संग्रह) व गुंफण (शीळ काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. यापैकी मेहकर बाहेरील जी ऐतिहासिक वास्तू उभी आहे त्याला समर्पित असलेल्या आपल्या भावना ना .घ .नी आपल्या  कंचनीचा महाल या दीर्घकाव्य संग्रहात विषद केलेल्या आहेत .
मेहकर जवळील एक पडीक वास्तू जीला कंचनी महाल आपण म्हणतो त्यामागे एक इतिहास म्हणा कि आख्यायिका आहे .यामागे काही भ्रामक जरी असले तरी कंचनी ही एक रूपवान सौदर्यवती लावण्यवती राहिलेली असेल यात शंका नाही .असे म्हणतात .ती अतिशय सुंदर आणि रूपवान होतीच तिला तिच्या रूपाचा अहंकार होता .घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले कमळजा देवीचे देऊळ! तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली आणि त्यामागील आख्यायिका अशी आहे कि कंचनी तो दिवा पाहते आणि लगेच तिची शिळ होऊन ती खाली कोसळते .याच आख्यायिका आणि कंचनी भोवती फिरणाऱ्या कथेला ना .घ .देशपांडे यांची अतिशय सुंदर काव्य रुपात देऊन साहित्यात अजरामर केले .माझ्या दृष्टीने कदाचित कंचनीचा घातपात झाला असेल ती रूपाने धनवान होतीच परंतु तिचा महाल पाहून ती धनवान असेलच याची खात्री पटते परंतु ना.घ .देशपांडे ने यालाच नवीन आयाम दिला त्या काव्यओळी अशा

" अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ...क्रमश :  "

ना.घ .देशपांडे यांची कविता मनाला भुरळ घालून कंचनी बद्दल भुरळ घालतेच परंतु ना.घ .देशपांडे यांचा साहित्यक्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन वेगळीच वाट निर्माण केली अशी स्तुतीसुमने ना.धो .महानोर सारखे कवी साहित्यिक वाहायला मागे नाही राहिले . आज कंचनीचा महाल ची ओळख करून देणारे ना.घ .देशपांडे आणि तो पडका महाल सरकार ,पुरातत्व विभाग यांच्याकडून दुर्लक्षित आहे .या महालाचा संवर्धन करणे महत्वाचे आहे . तसेच काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे.त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला. अशा या कृतीशील आणि साहित्यक्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या ना .घ . चे स्मारक मेहकर परिसरात व्हावे आणि त्यांची प्रेरणा असलेला कंचनीचा महाल वाचवायला हवा .

                                     -  प्रविण जाधव


Sunday, 19 July 2015


          !!! विठ्ठल म्हणजे बुद्धच !!!

२५०० वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने क्रांती करून अखिल मानव जातीला बौद्ध धम्म दिला . अनिष्ट चालीरीती अंधश्रद्धा काल्पनिक देव आणि अमानवीय असलेले वेद यांचा भरणा असलेला वैदिक धर्म हा बुद्धानंतर नामशेष झाल्यासारखा झाला .संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर बौद्ध धम्म आणि बुद्धाची लोकप्रियता इतकी वाढली कि सर्व लोक बौद्ध धम्मात सहभागी होऊन बुद्ध ,धम्म आणि संघाला अभिप्रेत असणार्या मानवधर्माकडे आकृष्ट होऊ लागली .

       यज्ञामध्ये प्राणीहत्या आणि जीवाचा बळी देण्याला बुद्धाने विरोध केला त्यामुळे समस्त मानवजातीला वैदिक धर्माचा तिटकारा वाटू लागला त्यामुळे वैदिक धर्म बहुजन लोकापासून बुद्धाच्या काळात दुरावला . पुढे अनेक शतकापर्यंत बुद्धाची प्रसिद्धी आणि बौद्ध धम्म यांचा प्रचार प्रसार सम्राट अशोक ,कनिष्क ,हर्षवर्धन सारख्या राजांनी केल्यामुळे जनमानसात याचा प्रचंड प्रभाव पडला . अगदी पुष्पमित्र शुंगाने प्रतिक्रांती जरी केली अनेक भिक्खूची कत्तल केली तरीही  सामान्य लोकांना आपल्याकडे ओढण्यासाठी बुद्धाची पूजा ,रथयात्रा , बौद्ध सन इ .गोष्टी सुरूच ठेवल्या होत्या . इ .सनाच्या ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म लोकांच्या मनात आणि सम्राट अशोक कानिश्काच्या निर्माण केलेल्या विहार ,लेणी ,स्तंभ या स्वरुपात अस्तित्वात होता . काही ठिकाणी बंगाल ,सिंध आणि ओरिसा प्रांतात तर ११ आणि १२ व्या शतकात बौद्ध धम्म टिकून होता परंतु नेमक अस काय झाल कि बौद्ध धम्म नष्ट करण्यात बर्याच अंशी यश वैदिक परंपरेला आल परंतु भगवान बुद्ध व्यक्ती रुपात ते नष्ट करू शकले नाही ? याच कारण बुद्ध हा जगात पोहचला होता परंतु प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसला होता . पुढे वैदिक धर्माने हा बुद्धाचाच धर्म आहे म्हणून लोकांच्या मनात आचरणात वैदिक गोष्टी भरून दिल्या .

                     ८ व्या शतकात शंकराचार्याने बौद्ध धम्माच्या समूळ उच्चाटनासाठी अनेक पाऊले उचलली बुद्धाला विष्णूचा अवतार दाखवून जे मुळचे बौद्ध होते त्यांना आपल्याकडे आकर्षित केल आणि ज्या मुस्लीम आक्रमणांनी थोडाफार बौद्ध धर्म विहार ,लेणी,स्तंभ रुपात होता त्याचे आतोनात नुकसान मुस्लीम शासकांनी केले .याचा फायदा घेऊन शंकराचार्याने पुराणे ,मनुस्मृती ,महाभारत ,रामायण या सारख्या गोष्टी करून मुळच्या बौद्ध असलेल्या भारतीय लोकांना वैदिक धर्माच्या गोष्टी घालवून स्वताला मुस्लीम शासकांनी " हिंदू" म्हणून दिलेली शिवी ही स्वीकारली कारण बुद्धाचे विचार धम्म त्यांना हद्दपार करायचा होता . ज्या बुद्धाच्या काळात प्राणीहत्या करून मासभक्षण वैदिक ब्राम्हण करत होते त्यांनी या काळात शाकाहार स्वीकारून आपण सर्व " हिंदू " आहोत म्हणून ८ व्या शतकापासून प्रतिक्रांतीला सुरुवात केली ,जे विहार लेणी होत्या त्यावर ताबा मिळवून तेथे वैदिक अर्थात नंतर हिंदू नाव देऊन आपल वर्चस्व मिळवून भिकारेपनाचा कळस गाठला . शैव आणि वैष्णव पंथ निर्माण केले .वैष्णव पंथ तर बौद्ध धर्माचे भग्न रूप आहे . यापासून समांतर वारकरी संप्रदाय निर्माण झाला . बौद्ध धर्माचे नाव घेण्याला इतकी भीती होती कि त्यामुळे असे पंथ निर्माण झाले परंतु बुद्धाची महिमा प्रसिद्धी कोणीच संपवू शकले नाही म्हणून बुद्धाला विष्णूच्या अवतारात त्यांना दाखवावच लागल .
पंढरपूर चे विहार विठ्ठल मंदिर , तिरुपती चे विहार बालाजी ,ओरिसा पुरी चे विहार जगन्नाथचे मंदिर , केदारनाथ ,अमरनाथ अशा अनेक ठिकाणचे विहारे बळकावून तेथे भग्न काल्पनिक देवांची निर्मिती करण्यात आली .पंढरपूर चे विठ्ठल मंदिर तर अनेक पुराव्यांनी सिद्ध होते कि ते प्राचीन बुद्ध विहार होते आणि विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच आहे ."पंढरपुरची मूर्ती वास्तवात बुद्ध मुर्तीही आहे. यावर मी एक प्रबंध लिहित आहे. जो कि पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढर्या कमळास पाली भाषेत पांडुरंग म्हणतात, याचा अर्थ पांडुरंग दूसरा तिसरा कुणी नसून बुद्ध आहे" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या  "Who is Pandurang" हा शोध निबंध मार्च १९५५ मध्ये लोणावळा येथे लिहावयास घेतला होता.  विठ्ठल मंदिरात खांबावर बुद्धाच्या ध्यानस्थ मुर्त्या आढळतात . अनेक संत कवींनी विठ्ठल म्हणजेच बुद्ध आहे आपल्या काव्यातून सिद्ध केले आहे . पंढरपूर ची यात्रा आषाड एकादशी ला भरविण्याच कारण कि बुद्धाने आपला प्रथम धम्मोपदेश पंचवर्गीय भिक्खू ला दिला होता .पालीभाषेत पांडुरंग या शब्दाचा अर्थ 'पांढरे कमळ' असा होतो. म्हणजे ज्याने पांढरे कमळ धारण केले आहे असा तो. बौद्ध वांगमयत पांढर्या कमळाला अनन्य साधारण महत्व आहे हे बौद्ध अभ्यासकांना ठाऊकच आहे. आणि याला सबल पुरावा म्हणजे अजंठा येथील बुद्ध लेणी. या लेणीत एक चित्र पद्मपाणी बुद्धाचे आहे, ज्याने पांढरे कमळ हाती घेतले आहे. वर दिलेला एक फोटो अजिंठा लेणीमधील आणि दुसरा विठ्ठलमंदिरातील मूर्तीचा आहे बुद्धाच्या ह्या मूर्तीवर थोडाबदल करून आला जरी असला तरी पूर्ण मूर्ती ते बदलू शकले नाहीत .


लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
न बोले बौद्ध रूपे ठेविले जधनी हात ||
नववा वेसे स्थिर रूप तथा नाम बौद्ध रूप |
संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||
                                                 - संत एकनाथ

बौद्ध अवतार माझिया उदृष्ट | मौन मुखे निष्टा धरियेली ||
मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी | बौद्ध ते म्हणोनी नावे रूप ||
                                         - संत तुकाराम

कलयुगी बौध्द रुप धरी हरी । तुकोबा शरीर प्रकटला ।।
                                  - संत बहिणीबाई

गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू ।
आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ॥
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ।
ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी ॥
                           - संत नामदेव
 अशी अनेक पुरावे आहेत कि जी बौद्ध विहार आणि विठ्ठल हाच बुद्ध आहे हे अंधपाणाचे प्रदर्शन करणार्यांनी इतिहासाची पाने दवडून वाचावी कि आपण मागील काळाचे मुळचे बौद्ध होतो .
                                           ले .- प्रविण जाधव 



Saturday, 11 April 2015


                                             !!! औद्योगिकरण आणि बहुजन समाज !!!

भारताने स्वतंत्र झाल्यापासून भारतीय संविधानानुसार जो औद्योगिक विकास केला तो संथगतीने का होईना पण आज २०१५ मध्ये औद्योगीकरणाच्या बाबतीत विकसित झाला आहे .याच कारण कि इंग्रजांची औद्योगिक धोरणे आणि त्यांच्या कार्यकाळात ज्या पायाभूत सुविधा अगोदरच तयार होत्या त्यामुळे रस्ते ,रेल्वे मार्ग सागरी मार्ग या मधून व्यापार आणि दळवळणास अधिक गती मिळाली त्याचा उपयोग स्वातंत्र्य काळात अधिक मिळाला ,त्याही पेक्षा भारतात व्यापार वाढीस खरी चालना कोणी दिली असेल तर सम्राट अशोकाने ,सम्राट अशोकाच्या काळात भारत एक संपन्न आणि जगातील महासत्ता होता .त्याकाळात कृषी क्षेत्र मुख्य असल तरी त्यावर आधारित उद्योगाला अशोकाच्या काळात चालना मिळाली .त्यात अनेक प्रकारचे कापड बनविले जाई आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविले जाई ,मासेमारी इ व्यवसायाबरोबर शिल्पकलेला जास्त महत्व होत त्याचा व्यापार विदेशातही चालत असे आणि चलन व नाणी याचं नियंत्रण त्यावेळी नियुक्त अमात्य (महामंत्री ) करत असे म्हणून अशोकाच्या काळात भारत "एक सोने कि चिडिया " असा देश होता . कालपरत्वे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झाल्यामुळे विशिष्ट वर्ग आणि शासक यांच्या हातात अर्थव्यवस्था गेली तदननंतर डॉ .बाबासाहेबांनी अर्थव्यवस्थेला सामाजिक न्यायाच रूप देऊन घटनेत बद्ध केल .परंतु स्वातंत्र्यानंतर येणार्या सरकारने भांडवलशाही व्यवस्था हे रूप देऊन निवडक उद्योकाकडे याची मक्तेदारी दिल्याने विशिष्ठ वर्गाचाच विकास साध्य झाला परंतु तळांगळातील शोषित पिडीत बहुजन समाज एक तर सरकारी यंत्रणेचा नोकरदार बनवून राहिला आणि खाजगी क्षेत्रात कामगार म्हणून खाजगी उद्योग क्षेत्रात त्याने जुळवून घेतले याचा असा परिणाम झाला कि बहुजन समाज खास करून sc st obc हा वर्ग उद्योगाचा भाग झाला परंतु कामगार नोकरदार म्हणून !
डॉ .बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना सामाजिक अभिसरण लक्षात घेऊन लिहिली "शिका संघटीत व्हा संघर्ष करा " या मूलमंत्रासोबतच सामाजिक क्रांतीशिवाय राजकीयक्रांतीला महत्व दिले.काहींनी शासनकर्ती जमात बनण्याचा अर्थ राजकीय क्रांतीशी लावून आर्थिक ,सामाजिक क्रांतीकडे पाठ फिरविली .त्याचा असा परिणाम झाला कि जी अर्थव्यवस्था मागासवर्गीय तळांगळातील लोकांच्या हाती असायला हवी होती तो वर्ग नोकरी कामात व्यस्त झाला आणि ३ % वर्गाच्या हाती उत्पादन आणि औद्योजकता गेल्यामुळे भारताची उत्पादन क्षमता केवळ ६ % राहिली तर त्याच लोकसंखेच्या थोड्याफार पुढे असलेला चीन हा देश उत्पादन वाढीत ७६ % वर पोहोचला हा फरक विकसित चीन मध्ये आणि विकसनशील भारतामध्ये राहिला .
आज बहुजन SC ST OBC जर उद्योजकतेकडे वळून औद्योगीकरणाचा भाग झाल्यास नक्कीच अर्थव्यवस्थेत बदल होईल ,देशाचा आणि समाजाचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल . उद्योग व्यवसाय कडे वळताना मुख्य भांडवल हि अडचण येणे हा पहिला प्रश्न सर्वासमोर निर्माण होतो पंरतु सरकारच्या योजना काही काही वित्त सहाय्य मंडळे यांचा विचार केल्यास ,कमी भांडवलातून आणि संघटीतरित्या ५ ते १०० लोकसमूह बनवून उद्योग व्यवसाय निर्मिती होऊ शकते आणि ते सोयीस्कर राहते .उद्योग व्यवसायाचे मुख्य दोन भाग पडतात . १ ) Manufacturing (निर्मिती )
२ ) Service (सेवा )
निर्मितीचे परत १ ) Micro (सूक्ष्म ) ज्यात कमीत कमी २५ लाखाहून उलाढाल
२ ) small (लघु ) ज्यात ५ लाख ते ५ कोटी पर्यंत उलाढाल
३ ) Medium (मध्यम )
ज्यात ५ कोटी ते १० कोटीच्या वर उलाढाल होते असे उद्योग
सेवा क्षेत्रात सारख्याच प्रकारच्या उद्योगांची विभागणी होते .सर्वात महत्वाच नियोजन कुठला उद्योग व्यवसाय ,आवड ,कला ,कुवत आर्थिक इ बाबींचा विचार केला जातो .सबंधित उद्योगांच कागदोपत्री नियोजन त्यासबंधी लागणारी कागदपत्रे परवाने करारपत्रे इत्यादी बाबींचा विचार करणे गरचेजे असते .तसेच सुरु करण्यात येण्यार्या उद्योगाची चाचपणी मार्केट रिसर्च उत्पादनाची किंमत नफा तोटा याचा पायभूत विचार करणे गरजेचे आहे .
आपल्या व्यवसायाच्या आखणीनुसार वित्त सहाय्य करणाऱ्या संस्था मंडळ यांच्याकडे उद्योगाच्या लागणाऱ्या भांडवल व प्रोजेक्ट रिपोर्ट योग्य रीतीने सादर करणे आवश्यक आहे . काही महिला उद्योजकासाठी सिडबी ,सिडो (small industries development organization), SEWA (Self employer women association ) तसेच नाबार्ड ,इतर बँका वित्तीय संस्था उद्योगासाठी वित्त पुरवठा करतात .अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून उद्योजक व्यवसायाकडे वळून नोकरी घेणार्या पेक्षा नोकरी देणारे होणे केंव्हाही चांगले . तसेच बहुजन समाजातील बेरोजगार शिक्षित तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळवून आर्थिक विकास साधण्यासाठी adv .प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील "गाव तेथे उद्योग" या पूर्तीसाठी भारिप बहुजन महासंघ अगोदरच २० उद्योगांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे .बहुसंख्य तरुण वर्ग या कडे वळला पाहिजे यासाठी हा प्रयत्न .
- प्रवीण जाधव 
प्रकल्प समन्वयक ,
भारिप उद्योजक विभाग

(पुढील भागात कृषी क्षेत्रास पूरक उद्योग आणि त्यांची माहिती )

!!! जात निर्मूलनाचा लढा बुद्धाकडे नेणारा !!!
२०१३ रोजी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." आणि "राजकीय आरक्षण रद्द कराव " हि भूमिका मांडली . रिपाइं नेते रामदास आठवले यांनी ही भूमिका 'दलित विरोधी' ठरवली होती , तर जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी ) यांनी तिला 'भारतीय संविधानाला छेद देणारी' ठरवून प्रकाश आंबेडकरांवर राखीव जागा संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता . खासदार रामविलास पासवान यांनी ती 'पूर्णत: चुकीची' ठरवतानाच 'जोपर्यंत जातिव्यवस्था व जातीयवाद अस्तित्वात आहे, तोपर्यंत दलित आदिवासींना राजकीय आरक्षणाची गरज आहे,' असे म्हटले होते .
" Annihilation of Caste " डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी जात निर्मुलनाबद्दल अत्यंत मौल्यवान विचार मांडले . जात नष्ट होणे म्हणजेच बुद्ध तत्वज्ञान स्वीकारणेच होय . वैदिक धर्माने निर्माण केलेली जातीयव्यवस्था हि विषमतावादी आणि मानवताविरोधी होती त्यात मानवांचे जातीनिहाय भाग पाडून वर्णव्यवस्था निर्माण करून भेदाभेद करून मानवाला पशुसमान वागणूक देऊन विशिष्ट वर्गाच्या हाती सत्ता संपत्ती चे अधिकार दिले .त्या विरुद्ध पहिला बंड तथागत भगवान बुद्धांनी केला ,जात पात यांना बौद्ध धर्मात थारा नाही हे सांगितलं . अनेक नद्या महासागराला जाऊन मिळतात तसाच जात पंथ नष्ट होऊन एकच धम्म तयार होतो तो मानवतावादी बौद्ध धम्म होय . जात निर्मूलनाचे विचार तथागत ,बाबासाहेबांनी मांडले त्याच विचारांना सामाजिक समतेचे रूप यावे म्हणून तीच भूमिका मा .बाळासाहेब आंबेडकर पुढे नेत असतील ,जात पात नष्ट होऊन धर्म आणि राष्ट्रीयत्व कायम होणार असेल तर आपण जातीत आणि राजकीय लाभासाठी बुद्ध बाबासाहेब यांच्या विचारांनाच विरोध करत आहोत ?
डॉ .बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली परंतु शासन दरबारी "महार " म्हणून नोंद होती .त्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक पुढारी बी .सी .कांबळे ,दादासाहेब गायकवाड अनेकांनी आंदोलने उपोषणे केली परंतु सरकारकडून निराशा मिळाली ,सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याशी चर्चा करून पण बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न महार म्हणूनच अडकून पडला परंतु १९८९ साली तत्कालीन व्ही.पी.सिंग पंतप्रधान झाले तेंव्हा प्रकाश आंबेडकर यांनी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न मांडून तो राजकीय समझोत्याने सोडवून घेतला जे बाबासाहेबांच राहिलेलं स्वप्न बौद्धांचा समावेश मंडल आयोगानुसार अनुसूचित जातीत करून बौद्धांना सवलती मिळवून दिल्या ,तरीही आजही आपण जातीत अडकून बौद्ध धम्माला जे जात निर्मुलन पूरक होत ते करण्यात आपण अनुयायी म्हणून अपयशी आहोत .
प्रकाश आंबेडकरानी इतर वर्गाला सोबत घेऊन पुणे पासून कोल्हापूर औरंगाबाद लातूर इ .ठिकाणी जातीअंताची चळवळ उभी करण्यासाठी जातीअंत परिषदांना सुरुवात केलेली आहे त्यात फुले शाहू आंबेडकरी म्हणवणारे पक्ष संघटना अनुयायी म्हणून आपण कुठे आहोत ? जात निर्मुलनासाठी बाबासाहेबांनीच प्रयत्न केला आणि त्यांच्याच नातवानेच सर्वकाही कराव त्यांनीच " अवतारवादाची " भूमिका घेऊन " अत्त दिप भव " न होता " यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारत " हा वैदिक तत्वानेच आपण आंबेडकर अनुयायी जात आहोत . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एक प्रावधान केल होत कि राजकीय आरक्षण हे केवळ १० वर्षासाठी देण्यात याव परंतु आरक्षण (अराजकीय नव्हे )
या गोष्टीचा राजकारणासाठी उहापोह करण्यात आला आणि स्वतः ला आंबेडकरवादी म्हणवणारे नेते पुढारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आरक्षण संपाव या भूमिकेला स्वतःच्या राजकीय भुकेपायी विरोध केला . डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि जे राखीव जागेवरून निवडून जाणारे प्रतिनिधी मागासवर्गीयांच्या हक्काबाबत चूप राहत असतील तर हे राजकीय आरक्षण काय कामाचे आणि ते नको आहे ,संदर्भ -डॉ .बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ . हिच भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली तर त्या भूमिकेत बाबासाहेबच आहेत .
आज ज्या जातीअंत परिषदेने विविध ठिकाणी परिषदा बाळासाहेब आंबेडकर घेत आहे त्याबद्दल हिंदुत्ववादी संघटना आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा ह्या चूप आहेत . प्रकाश आंबेडकर यांनी सुरु केलेला जातीअंताचा लढा निष्प्रभ करण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था टिकवून ठेवणे अगत्याचे आहे ,म्हणून या जातीअंताचा लढ्याचा धसका घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी " एक गाव एक विहीर एक स्मशान " हि केविलवाणी भूमिका मांडली परंतु फुले शाहू आंबेडकर म्हणवणारे आपण जोवर जातीअंतासाठी पुढे होणार नाही तोवर जातीव्यवस्था मजबूतच होईल .जिथे जातीअंत होणार तिथे फक्त धम्म असणार म्हणजेच जाती अंतचा अंतिम मार्ग बौद्ध धम्माकडेच नेणारा आहे .
                                                                                        
                                                                                              - प्रविण जाधव

Sunday, 21 September 2014


भाग ३
          बाबरी मशीद

याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभे राहिले .ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने .बाबरी मजीदचे आंदोलन म्हणजे उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटनेचा राजकीय उठाव .या सवर्ण हिंदू संघटनानी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्नही उपस्थित केला .राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्नांवर कदाचित सोबत राहणार नाही म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला आणि घटना बदललीच पाहिजे अशी भूमिका घेतली अशी भूमिका घेतली .घटना बदलामध्ये त्यांचे दोन महत्वाचे मुद्दे होते ,ते म्हणजे संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून टाकणे .त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा ऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली .हि भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागाविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये .या सर्व धार्मिक संघटनानी भाजपा आणि शिवसेनेला पुढे केले .खरे तर त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती .उच्चवर्णीय मंडळींनी यापूर्वी राखीव जागेच्या विरुद्ध गदारोळ उभा केला होता .त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव जागेच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली .ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रीअक्शन देईल .त्यांच्या रिअक्शन ने आपल फायदा होईल .त्यांना आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे reacti रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती .आंबेडकरवाद्यांनी घटना घटना बदलाला रिअक्शन दिली कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी यांना एकत्र आणता येते हे त्यांचे गणित होते .आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरुपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत आहेत ‘ ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे ‘हि त्यांची घटना ‘ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला .आणि म्हणून लोकांची दिशाभूल केली .आपल्याला ‘आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरु केला व दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली .आंबेडकरी मंडळी आपण काय भाषण देतो याचा सारासार विचार कधीच करीत नाहीत .त्यामुळे अनेकदा आपली भाषणे अनेकदा विरोधकांच्या हातात आयते कोलीत देतात .याला भाबडेपण म्हणावे ,अज्ञान म्हणावे कि हेतुपुरस्कर हे मला तरी समजत नाही .आंबेडकरवादी चळवळ हि अशाप्रकारे प्रतिक्रियावादी पद्धतीने पुढे चालवत गेली तर जास्त काळ टिकणार नाही .परंतु राखीव जागांचा मुद्दा हा घटनेचा अविभाज्य घटक आहे आणि तो संविधानाचा मुलभूत पाया आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपा व शिवसेनेने हेतुपुरस्कर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलाचा नारा दिला . भारिप ने यातून मार्ग काढण्यासाठी शेगाव ला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतले .त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादीवरती ओबीसी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली .उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसींना बरोबरीने आणि समानतेने वागवत नाहीत ,भेदभावाने वागवितात .ओबीसींना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी मागणी केली होती .ओबीसी हिंदुना स्वतःचे शत्रू मित्र कोण आहेत हे समजावे व त्यांची अस्मिता जागृत व्हावी यासाठी हे आवश्यक होते .शेगावची मागणी व मंडल कमिशनचा स्वीकार यामुळे बीजेपी –सेना हिंदूचे राजकीय संघटन उभे करीत होते त्याला खूप मोठा शह मिळाला .त्यांनी राखीव जागा आंदोलनापेक्षा बाबरी आंदोलनाला अग्रक्रम दिला .
आंबेडकरी चळवळी ने नव्याने आलेल्या आर्थिक धोरणाच्या विरोधात चळवळ उभारली असती आणि खाजगीकरणाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असती तर ओबीसीनां हिंदू धार्मिक संघटनेने केलेला धोरणात्मक बदल म्हणजे राखीव जागाविरोधी होण्याऐवजी घटनाविरोधी होण यातला फरक त्यांना समजाविता आला असता आणि खाजगीकरण आणि बाबरी मशिद हे दोन्हीही राखीव जागाविरोधी आहेत हे स्पष्ट झाले असते .यामुळे कदाचित त्यावेळची विधवंसकतेची तीव्रता कमी झाली असती .आंबेडकरी चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड यांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह हा अपवाद आहे .यापुढे तरी आंबेडकरी चळवळ सामाजिक प्रश्नाबरोबर आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देणार असती तर नंतर झालेल्या विध्व्सांची तीव्रता कमी करता आली असती .आंबेडकरी चळवळीच्या या वाटचालीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेला ‘भूमिहीनांचा सत्याग्रह’ हा एकमेव अपवाद आहे .
बाबरीमुळे उच्चवर्णीयांचा डाव सफल झाला .त्यामुळे त्यांनी राखीव जागेच्या प्रश्नावरून समाजाचे लक्ष्य विचलित केले .असा परिणाम समाजात होऊ नये .उच्चवर्णीय हिंदू आणि ओबीसी हे एकत्र झाले तर विस्कटलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एकजातीय होण्याचा धोका दिसत होता म्हणून ओबीसीच्या चळवळीला पाठींबा देणे ,त्या उभारणे महत्वाचे होते .
व्ही .पी .सिंग
बोफोर्स प्रकरणाच्या वादातून विश्वनाथ प्रताप सिंग हे कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते .त्यांचा राजकीय प्रवास जनता दल निर्माण करण्यापर्यंत झाला .या पक्षाबरोबर आम्ही राजकीय समझोता व करारनामा करण्याचा निर्णय घेतला .या पक्षाबरोबर सत्तेत आलो तर पुढील प्रश्नावर अंमलबजावणी होईल .
१ ) बौद्धांना सवलती
२ ) प्रशासनाकडून सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेवरती होणारे अन्याय –अत्याचार व त्याचबरोबर राज्यांनी एस .सी ,एस.टी .साठी केलेले प्रावधान याची कशापद्धतीने अंमलबजावणी हिते ,याची चौकशी व्हावी .
३ )एस .सी .,एस .टी . वित्तीय महामंडळानां दरवर्षी किमान दोनशे कोटींचे अनुदान मिळावे
४ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे
५ ) मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी .
६ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या सभागृहात लावणे .
१९९० साली सत्ता आली आणि प्रश्नांची लगेच सोडवणूक झाली .राज्यव्यवस्था अनुकूल असेल तर प्रश्न लगेच सुटू शकतात हे यातून सिध्द झाले . १९५६ ते१९९० या काळातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पत्रक ,पोस्टर्स ,मोर्चे ,आंदोलने यांच्याकडे आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम बौद्धांना सवलती दिल्याच पाहिजेत हि मागणी असायची .या मागणीनंतर इतर मागण्या असायच्या .
 क्रमश :

-    adv  प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर 


                                   भाग २

  
सतरा लाख मतदार

 लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते .निवडणूक हे साधन आहे .निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते .आंबेडकरी चळवळ जी निवडणूकीपासून कोसभर दूर गेली होती .एव्हढेच नव्हे ,तर समझोत्याच्या राजकारणाची स्वतःचे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती ; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या कि ,’सिट ऑर नो सिट’ ,’व्होट फॉर कॉंग्रेस ‘ तिला निवडणुकीच्या आखाड्यात आणण्यासाठी १९८५ -८६ च्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका लढवून पक्षाने १७ लाख मते मिळविली .हेच पक्षाचे खरे भांडवल .त्यानंतर अनेक लढे व निवडणुका झाल्या .पक्षावरचा विश्वास  डगमगला नाही .या १७ लाख मतदाराच्या जोरावर आम्ही सत्ता या बाजूची त्या बाजूला फिरवू शकतो हे  प्रत्यक्षात दाखविले .निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली . त्यामुळे भटके –विमुक्त ,आदिवासी ,ओबीसी , ‘नाही रे वर्ग ‘ यांचे पक्षाकडे आकर्षण वाढले .या प्रक्रियेमुळे सत्ताधारी वर्गात भीती निर्माण झाली .डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी इतिहासकालीन सांस्कृतिक रचनेची मीमांसा करताना ब्राह्मण सोडून इतर सर्वच जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत (सामाजिक नाही ) हे सूत्र मांडले होते .आणि म्हणूनच सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ब्राह्मण्याविरुध्ह झाला .बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात ब्राह्मणांची जागा आता मराठा समाजाने घेतली आहे .त्यामुळे आता सार्वजन आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे असा आग्रह मराठा समाजापुढे करताहेत .तो मिळत नसल्यामुळे हा लढा मराठविरोधी होत आहे .त्यांच्याबाबत इतर समाजात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे .यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असेल ,असा ज्यावेळी प्रचार करण्यात आला त्याचवेळी त्याचवेळी मराठेतर समाज आपल्याकडे आकर्षित होऊ लागला .या दरम्यान १९९२ साली आम्ही किनवटची पोटनिवडणूक लढविली .पक्षाने आदिवासी उमेदवार निवडून आणला .पक्षाचे हे मोठे यश होते .पक्षाला ताकदही मिळाली .याच काळात नांदेडच्या गौतम वाघमारे यांच्या हौतात्म्यामुळे सरकारला पुन : नामांतर प्रश्नावर विचार करण्याची पाळी आली .त्याचवेळी मंडल कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात याव्या या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे ओबीसी समूह जागरूक होत होता .त्याचबरोबर मंडल आयोगाला झालेल्या कडव्या विरोधामुळे उच्चवर्णीय हिंदू समूह आपल्या बाजूने नाही याचेही भान प्रथमच ओबीसींच्या समूहांना होत गेले .बाबासाहेबांनी आपल्यासाठीहि तरदूत ठेवली आहे हि जाणीव त्यांच्यात पसरत होती .त्याचा परिणाम म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत होता .पक्षाने १९९३ मध्ये नागपूरला काढलेल्या मोर्चात पहिल्यांदा हा ओबीसी समूह फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता .हा आंबेडकरी चळवळीतील लक्षवेधी बदल होता .पक्षाकडे आलेले हा ओबीसी पाहून सरकार हादरले आणि त्याचबरोबर नामांतराचा प्रश्न सामंजस्याने मिटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली .जे नामांतर झाले त्यामध्ये आंबेडकरी समूह आणि मराठा समाज या दोघांच्याही अस्मिता कायम ठेवून नामांतर झाले .हा तोडगा त्याही काळी मांडण्यात आला होता .परंतु त्यावेळीच्या नेतृत्वामध्ये ते स्वीकारून जो कोणी विश्लेषात्मक अभ्यास करील ;त्याच्या पुढे नेहमीच कोडे राहणार आहे , कि एव्हढे जीव आणि मालमत्ता कुर्बान का केली ? अठरा वर्ष रेंगाळत असलेला नामांतराचा प्रश्न १९९४ साली निकाली काढला .

              रिडल्स
या पक्षाच्या नव्या चेहर्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलू लागली .पक्षाची ताकदही वाढली .त्याचबरोबर हि ताकद मोडून काढण्यासाठी अनेक राजकीय खेळी सुरु झाल्या .त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘रिडल्स इन हिंदूइझम’ मधील ‘रिडल्स ऑफ रामा ‘ याच्या विरोधात फेब्रुवारी १९८७ मध्ये वातावरण पेटविण्यात आले .त्याच जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुढाकार घेतला व त्यांनी शिवसेनेसारख्या धर्मांध राजकीय पक्षाला पुढे करून हा लढा आक्रमक केला .त्याचे कारण आंबेडकरी चळवळ हि एकजातीय न राहता ,ती वेगवेगळ्या समदुखी समूहांची चळवळ होऊ पाहत होती .त्यात ती यशस्वी झाली तर आपल्या पारंपारिक सत्तेला धक्का पोहोचेल हि भीती होती .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर कट्टरपंथी हिंदू संघटनांनी मराठा समाजाला हाताशी धरून धर्मातरीत समूहाला व्यवस्थितपणे एकाकी पाडले .त्यांना ‘धर्मबुडवे ‘ म्हणून संबोधले .याचा परिणाम म्हणजे धर्मांतरित बौद्धांना इतरांपासून राजकीयदृष्ट्या त्यांनी एकाकी पाडले .परंतु दुसर्या बाजूने त्याचा फायदा असा झाला कि ,धर्मांतरित समूह स्वता:कडे व स्वतःच्या चळवळीकडे अंर्तमुख होऊन पाहू लागला .या घटनांमुळे एका बाजूला त्यांनी धर्मांतरित समूहाच्या लढाईला सुरुवात केली आणि दुसर्या बाजूला त्यांनी नव्याने निर्माण होणार्या सामाजिक व्यवस्थेत समता आणि बंधुत्वाचे तत्व रुजविण्यासाठी प्रयत्न केला .त्यांना मिळालेल्या या नव्या स्वातंत्र्यामुळे व दृष्टीमुळे त्यांनी स्वतः ला शिक्षित करून घेतले .सरकारी नोकर्यांमध्ये प्रवेश केला .आर्थिक बदलही झाला .स्वतः मध्ये आणि आपल्या नातेवाईकामध्येही त्यांनी परिवर्तन घडवून आणले .त्यांच्यावर जी सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न झाला ; तो त्यांनी हाणून पाडला.अशा बंधनांची त्यांनी पर्वादेखील केली नाही .स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर त्यांनी समदुखी समूहाचा शोध घेण्यास सुरुवात केली .त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी ते धडपडू लागला .इतरांच्या प्रश्नांवरही ते रस्त्यावर उतरले .मंडल आयोगाची अंमलबजावणी ,अत्याचारविरोधी भूमिका ,विषमता विरोधी पुढाकार हि त्यातली काही ठळक उदाहरणे आहेत .या प्रक्रियेतून ते  ‘धर्मबुडवे’ या प्रतिमेमधून बाहेर पडले .उलट ते इतरांसाठी परिवर्तनाचे एक प्रतिक बनले  आहेत व सामाजिक बंधने मोडण्यात ते यशस्वी होत आहेत हे लक्षात येताच रिडल्स प्रश्न उपस्थित करून व्यापक होणार्या त्यांच्या चळवळीला पुन्हा जातीपुरती संकुचित करण्याचा प्रयत्न्न झाला .हि परिस्थिती निर्माण करण्यात आली .कारण त्यांना माहित होते कि , आंबेडकरी चळवळीतील माणूस ‘प्रतिक्रिया’ देण्यामध्ये तत्पर आहे .त्यांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू देव देवतांना शिव्या द्यायला सुरुवात झाली कि ,जे हिंदू राजकीय दृष्ट्या पक्ष सोडल्याशिवाय गत्यंतर नाही . या परिस्थितीचे भान ठेवून आंदोलन हे १) आंबेडकरी अस्मिता विरुध्द हिंदू अस्मिता असे होणार नाही . २) हे आंदोलन लेखन स्वातंत्र्य याच मुद्यावर लढले गेले पाहिजे ३) आंदोलनाचे केंद्र हे मुंबई शहर राहिले पाहिजे  ४) नामांतर आंदोलनातील त्रुटी या आंदोलनापासून वगळल्या गेल्या पाहिजेत या मुद्यावरच लक्ष केंद्रित होईल हे आम्ही जाणीवपूर्वक पहिले व तशी काळजी घेतली .
 रिडल्सच्या प्रश्नावर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ नयेत तर एकच प्रवाह निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटना /नेत्यांना एकत्र आणले .या सर्वांना एकत्र आणायचे होते ; त्याचे कारण त्यांना मोकळे सोडले असते तर प्रत्येकाने मीच बाबासाहेबांच्या विचारांचा ‘सच्चा पाईक’ आहे हे सिद्ध करण्यासाठी कडव्यातली कडवी प्रतिक्रिया देत तेहत्तीस कोटी देवांचा उद्धार केला असता .त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली असती .चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भाषणातून शत्रूच निर्माण केले असते .असे झाले असते तर आंबेडकर चळवळीच्या बाहेरील समूह जे परिवर्तनाच्या बाजूने आहेत .त्यांची दारे चळवळीला बंद झाली असती .नामांतर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली असती .मला हे कधीच कळले नाही कि ,तेहत्तीस कोटी देवांना शिव्या दिल्यामुळे चळवळीचे कसे भले होणार आहे ? उलट चळवळीला पोषक वातावरण निर्माण होण्याऐवजी अशा प्रतिक्रिया आणि अशा भाषणामुळे आपण शत्रूच निर्माण केले आहेत .या सर्वाना एकत्र करून पक्षाने ठरविलेली भूमिका सर्वासमोर गेली आणि त्यामुळे घटनेने बहाल केलेले विचाराचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे याचवरती रिडल्सचा प्रश्न फिरू लागला या भूमिकेमुळे समाजातील अनेक संघटना ,विचारवंताना आपल्या बाजूने येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले .त्यामुळे आंबेडकरी चळवळी शिवाय इतरही ‘लेखन स्वातंत्र्य अबाधित राहिले पहिजे’ हि भूमिका घेणार्यांना आपल्याबरोबर यायला काहीच अडचण राहिली नाही .त्यांचा पाठींबा आणि सहभागामुळे महाराष्ट्र शासनाला ‘रिडल्स’ जसेच्या तसे प्रकाशित करावे लागले .येथे दोन गोष्टीचे स्मरण आपणास करून देऊ इच्छितो .आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेते त्यावेळी मी इतरांपेक्षा मी कसा लायक आहे हे सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले होते .ते नेतृत्वासाठी भांडत होते .त्यावेळचा ‘नवाकाळ’ नजरेखालून घातला तरी हि परिस्थिती आपल्या लक्षात येईल .त्याचा एक फायदा आम्हाला असा झाला कि हे नेतृत्वासाठी भांडत राहिल्यामुळे रीदाल्सचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे जी उद्धिष्ठे समोर ठेवून लढा उभा केला त्याच प्रश्नावरती रिडल्सची चळवळ केंद्रित करण्यात यश आले .त्यात ज्या दक्षता घ्यायच्या त्या घेता आल्या .त्यापैकी सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा लढा आंबेडकरी अस्मिता विरुद्ध हिंदू अस्मिता असा होऊ दिला होऊ द्यायचा नाही त्यात आम्ही यशस्वी झालो .दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा लढा शांततेने लढायचा .दंगल करून नव्हे .हा आंबेडकरी चळवळीचा संदेश लोकांना द्यायचा होता ,तो दिला . बाळ ठाकरे यांनी मुंबईत त्यावेळी मोठा मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा संदेश दिला होता ; त्याचवेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मुंबईत बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवू या असे आवाहन मी केले होते .त्यातून ठाकरेंची फजिती झाली आणि समयसूचकतेतून प्रश्न सुटायला मदत झाली .त्यामुळे सरकारने पुन्हा रिडल्स इन हिंदूइझम प्रकाशित केले .नामांतराचा लढा हा मराठा अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा होता .परंतु रिडल्सचा लढा हा हिंदू अस्मिता विरुध्द आंबेडकरी अस्मिता एव्हढा व्यापक होता तरीही कुठेही दंगल आणि रक्तपात न होता तो प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो .
‘येरे माझ्या मागल्या ‘ या म्हणी प्रमाणे एकत्र आलेले नेते आणि संघटना ,आंबेडकरी चळवळीचे स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा पुन्हा कुणाच्या ना कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या राजकारणात गर्क झाले .ते आपल्याला राजकीय मित्रांबरोबर समझोता करत फिरत राहिले .नेते जरी वेगवेगळे राहिले तरी रिडल्समुळे एकत्र आलेल्या जनसमुहाची ताकद पक्षाबरोबर राहिली .त्या भरवशावर पक्षाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली .
                               क्रमश :                          





प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक " आंबेडकरी चळवळ संपली आहे ....." १ जानेवारी २००७ साली प्रकाशित झाल , पुस्तकाच शिर्षक हे मा .ज .वि .पवार यांनी दिलेलं असून त्यात असणारा फुल stop नाही तर टिंब टिंब आहे . २००७ पासून हे पुस्तक न वाचता केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येकजन बाळासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा हवाला देऊन केवळ टीका विरोध आणि खालची पातळी गाठतो परंतु नेमक हे पुस्तक काय आहे आणि यामध्ये बाळासाहेबांनी अस काय लिहिलेलं आहे हे वाचन अत्यंत महत्वाच आहे . ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं असेल त्याचं आकलन नक्कीच झालेलं असेल आणि वाचणारा हाही विचार करेल कि बाळासाहेबांनी सांगितलेलं विचार आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच आहे म्हणून मी मा .बाळासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन संपूर्ण पुस्तकाचे भाग विभाजित करून टाकणार आहे . तरी सर्वांनी ते वाचून जरून आपली मते आणि पुस्तकातील विचारांचा प्रसार करावा हि विनंती .

                                     - प्रवीण जाधव

                                         " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...."

                    भाग -१
  
         डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी आपली चळवळ कशी उभी केली ;याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला . तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे .त्यानिमित्ताने ,मी १९८० साली पुणे ,सातारा ,कोल्हापूर ,कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला .जुन्या माणसांशी बोललो .त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले ,आठवणी सांगितल्या .बाबासाहेबांची जेंव्हा चावडीत बैठक सुरु असायची त्यावेळी अनेक ज्ञातिबांधव मुद्दामहून चावडीत झोपण्यास येत असत .ते बाबासाहेबांना उद्देशून म्हणत असत कि .' हा काय करणार आहे ? हा तर आमची हाडकी -हडावळी ,आमचे बावन्न अधिकार काढायला निघालाय .' अशा परिस्थितीत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी जे कोणी या चळवळीला सहकार्य करतील ,त्यांना बरोबर घेऊन आपली चळवळ पुढे नेली .याचा अर्थ असा होतो कि त्यावेळीही समाजात काही जागरूक लोक होते ते बाबासाहेबांबरोबर आले.  जे नव्हते ,ते बाजूला थांबले .कालांतराने ज्यांनी बाबासाहेबांना सहकार्य केल नाही तेहि चळवळीत आले .त्यावेळी ज्यांना हाडकी हाडवळ हे सुरक्षेचे कवच वाटत होते ;तेच बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले .पण जेंव्हा त्यांना " हाडकी - हाडोळी " हे सुरक्षेचे कवच नाही ,तर गुलामीची निशाणी आहे हे लक्षात आले ; त्यावेळी त्यांनी आपला पवित्र बदलला व ते आंबेडकरी चळवळीचे वाटसरू बनले .हे या ठिकाणी सांगण्याचे कारण कि ,जी परिस्तिती असते तिच्यात लोक बदल करण्यास तयार नसतात .अशा वेळी नवी व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात जी सतर्कता यांच्यात हवी असते .ती तयार झालेली नसते . माझा राजकीय जीवनातील  चोवीस वर्षाचा अनुभव मला हेच सांगतो आहे .

  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी एक जुनी व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण केली .त्यातून आपल्याला जे अधिकार मिळाले त्या लाभामध्येच आज आपण 'मदहोश ' आहेत . परिस्थिती बदलली आहे .या बदलत्या परिस्थितीत आपल्याला नव्याने अधिकार मिळवावे लागतील किंवा जे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत ते सह्बूत ठेवण्यासाठी जागरूक राहावे लागेल .या संदर्भात समाजात काही चर्चा घडते आहे ,कृती होत आहे असे मला काही दिसत नाही .बाबासाहेबांनी जी चळवळ मोठ्या कष्टाने उभी केली ,तिच्या प्रारंभीच्या काळाचा अभ्यास होणे ,तिची चिकित्सा होणे मला गरजेचे वाटते . त्यामधून आज आपल्यापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत ,ती पेलून ' चळवळ टिकविण्यासाठी उपयुक्त असे ज्ञान मिळेल .आजवर या सबंधातले संशोधात्मक लेखन कमीच झाले आहे .

चर्चेचे गांभीर्य .....


२००४ -२००५ या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे मला बघायला मिळाले ,जे मी अनुभवले ' त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही . ती जी काही चालेल .ती माझ्या पिढीपुरतीच . त्यातलेसुद्धा कमिटेड कार्यकर्ते असेपर्यंत , तेव्हढ्यापुरतीच राहील .पुढे ती चालली तर त्यामध्ये आंबेडकरी आणि स्वाभिमान विचार नसेल .विचारला माननारा कार्यकर्ता नसेल .जो काही कार्यकर्ता आढळेल त्याची चळवळीशी विचारांशी बांधिलकी किती राहील ,याबद्दल मला शंका आहे . त्याची बांधिलकी चळवळीशी नसेल तर चळवळ कशी आणि कुठे राहणार आहे ? हे मी लिहित असताना ,काही जणांना निवडणुकीच्या अपयशातून ,मी निराशावादी झालोय आणि म्हणून मी अशी भूमिका मांडतोय ,असे वाटण्याची शक्यता आहे . त्या सर्वाना मी सांगू इच्छितो कि ,माझ्यासारखा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत झोकून देतो ; तेंव्हा त्याला हि जाणीव असतेच कि , आपल्याला सहजासहजी सत्ता मिळणार नाही .सत्तेसंबधी त्याची भूमिका असते  कि ,सत्ता मिळाली तर ठीक . अन्यथा जे काही अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले व जी व्यवस्था निर्माण केली ,त्या अधिकारात वाढ कशी होईल ; त्याचबरोबर जी व्यवस्था निर्माण केली आहे ,ती सुद्रुढ कशी होईल , यासाठी धडपड करीत राहावे .त्यामुळे चळवळीसंबंधी जी काही चर्चा मी येथे करत आहे ; ती ती पूर्वग्रह न ठेवता गांभीर्याने लक्षात घेतली जावी अशी माझी अपेक्षा  आहे . आंबेडकरी चळवळीत काम करताना याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे कि , आपले आर्थिक ,सामाजिक उद्धिष्ट आणि तत्वज्ञान हे असमानतेच्या विरोधात असल्यामुळे ,त्याला प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. त्या विरोधाची धार वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते . सत्ता मिळविणे हे प्रवाहाच्या विरोधात पोह्न्यासारखे कठीण असते .चळवळीची हि अवस्था का झाली ? त्याची करणे काय ? काय मिळविले  ? काय गमावले ? काय मिळवून टिकवू शकलो नाही ? याचेही थोडक्यात इथे विश्लेषण केले आहे .या विश्लेषणाची सुरुवात नामांतराच्या चळवळीपासून करीत आहे .

    नामांतर.......

 १९८० साली माझ्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली .त्यावेळीची महाराष्ट्राची परीस्तीती वेगळी होती .१९७६ साली सुरु झालेली नामांतराची चळवळ क्षीण होण्याच्या मार्गावर होती . आंबेडकरी चळवळ पूर्णपणे 'नामांतर ' या एकच प्रश्नावर केंद्रित झालेली होती . नामांतराच्या लढ्यात लोकांनी एकजूटता दाखविली .हि ताकद खूप मोठी होती .त्यामध्ये चळवळीबरोबर नसणारे पण बाबासाहेबांना मानणारे हेही सहभागी झाले होते .
हि उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान कॉंग्रेसने आणि त्याचबरोबर कॉंग्रेसबरोबर समझोत्यात असलेल्या आर .पी .आय . च्या नेत्यांना हाताशी धरून केले .या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून प्रचंड दडपशाही करण्यात आली व पोलिसाकडून अमानुष अत्याचार करण्यात आले .आंबेडकरी चळवळ मुळासकट उपटून टाकण्याचा यावेळी प्रयत्न झाला . कॉंग्रेस आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांनी दलितांच्या घरांची राख रांगोळी केली आणि महिलांची बेअब्रू केली . शिक्षणामुळे ज्यांना नोकर्या लागल्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली होती आणि त्यांना जायकवाडी धरणामुळे समृद्धी आलेली होती अशांची हि समृद्धी या दंगलीमध्ये अक्षरशा : नष्ट करण्यात आली . दडपशाही व अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी चळवळ आपल्या विरोधात उभी राहू नये असा डाव कॉंग्रेस ने रचला होता .कॉंग्रेस चे नेतृत्व हे मराठा समाजाचे नेतृत्व होते .' मराठवाडा विद्यापीठ' या नावात 'मराठा' समाज स्वतःची अस्मिता पाहत होता .नामांतर म्हणजे मराठ्यांना संपविणे व आपली सत्ता काढून घेणे ,असा प्रचार हित शत्रूंकडून त्या काळात करण्यात आला .त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आंदोलन चालविले गेले .त्याचे पर्यवसान आंबेडकरी अस्मिता विरूद्ध मराठा अस्मिता असा लढा लढविण्यात झाले .परिणामी दंगल झाली .दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली ,जाळण्यात आली .बहिष्कार टाकण्यात आले .कत्तली करण्यात आल्या आणि दलितांना एकांगी पाडण्यात आल .

   त्यावेळी परिस्थिती बदलणे आणि शांतता प्रश्तापित करणे याला प्राधान्य देणे हे महत्वाचे होते आणि ते मी केले . मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटविणे ,सामंजस्य निर्माण करणे ,ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी लढणे आणी आक्रस्ताळी भाषणाची धार बोथट करणे यासारखी कामे अंगावर घेतली .या भूमिकेमुळे माझ्याबद्दल अनेक समज - गैरसमज पसरले .मी त्याची कधीही पर्वा केली नाही .या आंदोलनात काहींनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकामुळे (ज्या भूमिकांना मी बेजबाबदार म्हणतो ) ,नामांतराचा हा लढा सरकारविरोधी लढा होता .तो तसाच ठेवला गेला पाहिजे होता .त्याला पहिल्या टप्प्यात मराठविरोधी स्वरूप दिल्या गेल आणि नंतर ते पोलीस विरोधी झाल .आंदोलनकर्ते त्यामुळे कोंडीत सापडले .याचा फायदा मराठा नेतृत्वाने पुरेपूर उठविला ,पोलिसांचा अत्याचार ओढवून घेतला ,याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एकप्रकारची दहशत बसली होती .या कारणास्तव मोर्चाला यायचे म्हणजे पोलिसांचा लाठीमार खायचा .अशी भीती लोकांमध्ये निर्माण झालेली होती .त्यामुळे नंतर नंतर लोक मोर्चाला यायचे थांबले . मनाने ते हरले होते .अत्यचार ,मारझोड ,दडपशाहीमुळे खचलेल्या सैन्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची गरज होती .त्यासाठी लोकांमध्ये पुन्हा एकदा चळवळीबद्दल विश्वास निर्माण होईल असा कृतीशील कार्यक्रम देणे आवश्यक होते .आंबेडकर चळवळीत 'मोर्चा' व सभा हे सर्वात मोठे हत्यार राहिले आहे . ते मोडणे म्हणजे चळवळीला मोडणे होय असाच अर्थ त्याकाळी लोक लावत होते .दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास , चळवळ संपविण्याच्या मार्गावर घेऊन जाणे म्हणून आम्ही १९८२ साली आठ दिवसांचा long मार्च काढला .जस जसा हा 'मार्च ' पुढे जात राहिला तस तसा लोकात विश्वास वाढत गेला .ज्यावेळी मुंबई ला हा मोर्चा पोहोचला .त्यावेळी लाखोंच्या संख्येने ग्रामीण जनता त्यात सहभागी झाली होती .शहरी भागातील माणूस जो या मोर्चात होता तो वेगळाच होता . long मार्च ने उपस्थित केलेल्या प्रश्नावरती त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली आणि तात्पुरती का होईना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली .यातून आपले प्रश्न मार्गी लागू शकतात हा नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला .
           त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासक व पोलीस खात्याला मोठी चिंता वाटत होती कि आंबेडकरी चळवळ चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात चळवळीतील कार्यकर्त्यावर जो अमानुष अत्याचार झाला त्याचा परिणाम म्हणून तो नक्षलवादी चळवळीकडे वळतो कि काय अशी चिंता एका वरच्या पातळीवर केली जात होती .हे त्यावेळी फार थोड्या जणांच्या लक्षात आल होत .आंबेडकरी चळवळीतील कार्यकरत्यावर व चळवळीतील जनतेवर जो अमानुष अत्यचार झाले त्याचा परिणाम म्हणून नक्षलवादाकडे वळतो कि काय हि परिस्थिती long मार्चच्या बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना वाटत होती .या भीतीला खतपाणी घालायचे त्यांनी ठरविले .
                                                   क्रमश :
                                                             - प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर


(साभार :-  " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...." या पुस्तकातून )