Sunday, 21 September 2014


भाग ३
          बाबरी मशीद

याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभे राहिले .ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने .बाबरी मजीदचे आंदोलन म्हणजे उच्चवर्णीयांच्या हिंदू संघटनेचा राजकीय उठाव .या सवर्ण हिंदू संघटनानी जसा बाबरी मशिद प्रश्न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्नही उपस्थित केला .राखीव जागेच्या प्रश्नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या प्रश्नांवर कदाचित सोबत राहणार नाही म्हणून त्यांनी घटनेलाच विरोध केला आणि घटना बदललीच पाहिजे अशी भूमिका घेतली अशी भूमिका घेतली .घटना बदलामध्ये त्यांचे दोन महत्वाचे मुद्दे होते ,ते म्हणजे संसदीय लोकशाही ऐवजी अध्यक्षीय लोकशाही आणणे आणि दुसरा राखीव जागा काढून टाकणे .त्यांनी जो धोरणात्मक बदल केला तो राखीव जागा ऐवजी घटनाविरोधी भूमिका घेतली .हि भूमिका घेण्यामागचा त्यांचा हेतू कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी हिंदू यांच्यात पडत चाललेली दरी मिटवायची असेल तर आपण राखीव जागाविरोधी आहोत असे दर्शविता कामा नये .या सर्व धार्मिक संघटनानी भाजपा आणि शिवसेनेला पुढे केले .खरे तर त्यांची दखल घेण्याची गरज नव्हती .उच्चवर्णीय मंडळींनी यापूर्वी राखीव जागेच्या विरुद्ध गदारोळ उभा केला होता .त्यांच्यातला जो धोरणात्मक बदल त्यांनी केला त्याचे कारण हे की राखीव जागेच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली .ओबीसी आपल्याकडून निघून जातो आणि घटनाविरोधी भूमिका आपण घेतली तर आंबेडकरी समूह जोरदार रीअक्शन देईल .त्यांच्या रिअक्शन ने आपल फायदा होईल .त्यांना आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे reacti रिअक्शन देण्यात फार तत्पर आणि उत्साही आहेत याची जाणीव होती .आंबेडकरवाद्यांनी घटना घटना बदलाला रिअक्शन दिली कि सवर्ण हिंदू आणि ओबीसी यांना एकत्र आणता येते हे त्यांचे गणित होते .आंबेडकरी चळवळ एकजातीय स्वरुपाची असल्यामुळे ‘आपली घटना बदलत आहेत ‘ ह्या आंबेडकरवाद्यांच्या विधानाचा अर्थ हिंदुत्ववादी संघटनांनी सोयीस्करपणे ‘हि त्यांची घटना ‘ असा केला आणि म्हणून ते चवताळलेत असा प्रचार केला .आणि म्हणून लोकांची दिशाभूल केली .आपल्याला ‘आपली घटना बनवायची आहे ‘ असा प्रचार सुरु केला व दुसरी घटना बनविण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली .आंबेडकरी मंडळी आपण काय भाषण देतो याचा सारासार विचार कधीच करीत नाहीत .त्यामुळे अनेकदा आपली भाषणे अनेकदा विरोधकांच्या हातात आयते कोलीत देतात .याला भाबडेपण म्हणावे ,अज्ञान म्हणावे कि हेतुपुरस्कर हे मला तरी समजत नाही .आंबेडकरवादी चळवळ हि अशाप्रकारे प्रतिक्रियावादी पद्धतीने पुढे चालवत गेली तर जास्त काळ टिकणार नाही .परंतु राखीव जागांचा मुद्दा हा घटनेचा अविभाज्य घटक आहे आणि तो संविधानाचा मुलभूत पाया आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपा व शिवसेनेने हेतुपुरस्कर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलाचा नारा दिला . भारिप ने यातून मार्ग काढण्यासाठी शेगाव ला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतले .त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादीवरती ओबीसी मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली .उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसींना बरोबरीने आणि समानतेने वागवत नाहीत ,भेदभावाने वागवितात .ओबीसींना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी मागणी केली होती .ओबीसी हिंदुना स्वतःचे शत्रू मित्र कोण आहेत हे समजावे व त्यांची अस्मिता जागृत व्हावी यासाठी हे आवश्यक होते .शेगावची मागणी व मंडल कमिशनचा स्वीकार यामुळे बीजेपी –सेना हिंदूचे राजकीय संघटन उभे करीत होते त्याला खूप मोठा शह मिळाला .त्यांनी राखीव जागा आंदोलनापेक्षा बाबरी आंदोलनाला अग्रक्रम दिला .
आंबेडकरी चळवळी ने नव्याने आलेल्या आर्थिक धोरणाच्या विरोधात चळवळ उभारली असती आणि खाजगीकरणाच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली असती तर ओबीसीनां हिंदू धार्मिक संघटनेने केलेला धोरणात्मक बदल म्हणजे राखीव जागाविरोधी होण्याऐवजी घटनाविरोधी होण यातला फरक त्यांना समजाविता आला असता आणि खाजगीकरण आणि बाबरी मशिद हे दोन्हीही राखीव जागाविरोधी आहेत हे स्पष्ट झाले असते .यामुळे कदाचित त्यावेळची विधवंसकतेची तीव्रता कमी झाली असती .आंबेडकरी चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड यांनी केलेला भूमिहीनांचा सत्याग्रह हा अपवाद आहे .यापुढे तरी आंबेडकरी चळवळ सामाजिक प्रश्नाबरोबर आर्थिक प्रश्नांना प्राधान्य देणार असती तर नंतर झालेल्या विध्व्सांची तीव्रता कमी करता आली असती .आंबेडकरी चळवळीच्या या वाटचालीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेला ‘भूमिहीनांचा सत्याग्रह’ हा एकमेव अपवाद आहे .
बाबरीमुळे उच्चवर्णीयांचा डाव सफल झाला .त्यामुळे त्यांनी राखीव जागेच्या प्रश्नावरून समाजाचे लक्ष्य विचलित केले .असा परिणाम समाजात होऊ नये .उच्चवर्णीय हिंदू आणि ओबीसी हे एकत्र झाले तर विस्कटलेली आंबेडकरी चळवळ पुन्हा एकजातीय होण्याचा धोका दिसत होता म्हणून ओबीसीच्या चळवळीला पाठींबा देणे ,त्या उभारणे महत्वाचे होते .
व्ही .पी .सिंग
बोफोर्स प्रकरणाच्या वादातून विश्वनाथ प्रताप सिंग हे कॉंग्रेस मधून बाहेर पडले होते .त्यांचा राजकीय प्रवास जनता दल निर्माण करण्यापर्यंत झाला .या पक्षाबरोबर आम्ही राजकीय समझोता व करारनामा करण्याचा निर्णय घेतला .या पक्षाबरोबर सत्तेत आलो तर पुढील प्रश्नावर अंमलबजावणी होईल .
१ ) बौद्धांना सवलती
२ ) प्रशासनाकडून सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेवरती होणारे अन्याय –अत्याचार व त्याचबरोबर राज्यांनी एस .सी ,एस.टी .साठी केलेले प्रावधान याची कशापद्धतीने अंमलबजावणी हिते ,याची चौकशी व्हावी .
३ )एस .सी .,एस .टी . वित्तीय महामंडळानां दरवर्षी किमान दोनशे कोटींचे अनुदान मिळावे
४ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे
५ ) मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी .
६ ) डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र पार्लमेंटच्या सभागृहात लावणे .
१९९० साली सत्ता आली आणि प्रश्नांची लगेच सोडवणूक झाली .राज्यव्यवस्था अनुकूल असेल तर प्रश्न लगेच सुटू शकतात हे यातून सिध्द झाले . १९५६ ते१९९० या काळातील सर्व आंबेडकरी चळवळीतील पत्रक ,पोस्टर्स ,मोर्चे ,आंदोलने यांच्याकडे आपण नजर टाकली तर सर्वात प्रथम बौद्धांना सवलती दिल्याच पाहिजेत हि मागणी असायची .या मागणीनंतर इतर मागण्या असायच्या .
 क्रमश :

-    adv  प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर 


                                   भाग २

  
सतरा लाख मतदार

 लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते .निवडणूक हे साधन आहे .निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते .आंबेडकरी चळवळ जी निवडणूकीपासून कोसभर दूर गेली होती .एव्हढेच नव्हे ,तर समझोत्याच्या राजकारणाची स्वतःचे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती ; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या कि ,’सिट ऑर नो सिट’ ,’व्होट फॉर कॉंग्रेस ‘ तिला निवडणुकीच्या आखाड्यात आणण्यासाठी १९८५ -८६ च्या विधानसभा ,लोकसभा निवडणुका लढवून पक्षाने १७ लाख मते मिळविली .हेच पक्षाचे खरे भांडवल .त्यानंतर अनेक लढे व निवडणुका झाल्या .पक्षावरचा विश्वास  डगमगला नाही .या १७ लाख मतदाराच्या जोरावर आम्ही सत्ता या बाजूची त्या बाजूला फिरवू शकतो हे  प्रत्यक्षात दाखविले .निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली . त्यामुळे भटके –विमुक्त ,आदिवासी ,ओबीसी , ‘नाही रे वर्ग ‘ यांचे पक्षाकडे आकर्षण वाढले .या प्रक्रियेमुळे सत्ताधारी वर्गात भीती निर्माण झाली .डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी इतिहासकालीन सांस्कृतिक रचनेची मीमांसा करताना ब्राह्मण सोडून इतर सर्वच जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत (सामाजिक नाही ) हे सूत्र मांडले होते .आणि म्हणूनच सामाजिक स्वातंत्र्याचा लढा ब्राह्मण्याविरुध्ह झाला .बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात ब्राह्मणांची जागा आता मराठा समाजाने घेतली आहे .त्यामुळे आता सार्वजन आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे असा आग्रह मराठा समाजापुढे करताहेत .तो मिळत नसल्यामुळे हा लढा मराठविरोधी होत आहे .त्यांच्याबाबत इतर समाजात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे .यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असेल ,असा ज्यावेळी प्रचार करण्यात आला त्याचवेळी त्याचवेळी मराठेतर समाज आपल्याकडे आकर्षित होऊ लागला .या दरम्यान १९९२ साली आम्ही किनवटची पोटनिवडणूक लढविली .पक्षाने आदिवासी उमेदवार निवडून आणला .पक्षाचे हे मोठे यश होते .पक्षाला ताकदही मिळाली .याच काळात नांदेडच्या गौतम वाघमारे यांच्या हौतात्म्यामुळे सरकारला पुन : नामांतर प्रश्नावर विचार करण्याची पाळी आली .त्याचवेळी मंडल कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात याव्या या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे ओबीसी समूह जागरूक होत होता .त्याचबरोबर मंडल आयोगाला झालेल्या कडव्या विरोधामुळे उच्चवर्णीय हिंदू समूह आपल्या बाजूने नाही याचेही भान प्रथमच ओबीसींच्या समूहांना होत गेले .बाबासाहेबांनी आपल्यासाठीहि तरदूत ठेवली आहे हि जाणीव त्यांच्यात पसरत होती .त्याचा परिणाम म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलत होता .पक्षाने १९९३ मध्ये नागपूरला काढलेल्या मोर्चात पहिल्यांदा हा ओबीसी समूह फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता .हा आंबेडकरी चळवळीतील लक्षवेधी बदल होता .पक्षाकडे आलेले हा ओबीसी पाहून सरकार हादरले आणि त्याचबरोबर नामांतराचा प्रश्न सामंजस्याने मिटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली .जे नामांतर झाले त्यामध्ये आंबेडकरी समूह आणि मराठा समाज या दोघांच्याही अस्मिता कायम ठेवून नामांतर झाले .हा तोडगा त्याही काळी मांडण्यात आला होता .परंतु त्यावेळीच्या नेतृत्वामध्ये ते स्वीकारून जो कोणी विश्लेषात्मक अभ्यास करील ;त्याच्या पुढे नेहमीच कोडे राहणार आहे , कि एव्हढे जीव आणि मालमत्ता कुर्बान का केली ? अठरा वर्ष रेंगाळत असलेला नामांतराचा प्रश्न १९९४ साली निकाली काढला .

              रिडल्स
या पक्षाच्या नव्या चेहर्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलू लागली .पक्षाची ताकदही वाढली .त्याचबरोबर हि ताकद मोडून काढण्यासाठी अनेक राजकीय खेळी सुरु झाल्या .त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘रिडल्स इन हिंदूइझम’ मधील ‘रिडल्स ऑफ रामा ‘ याच्या विरोधात फेब्रुवारी १९८७ मध्ये वातावरण पेटविण्यात आले .त्याच जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुढाकार घेतला व त्यांनी शिवसेनेसारख्या धर्मांध राजकीय पक्षाला पुढे करून हा लढा आक्रमक केला .त्याचे कारण आंबेडकरी चळवळ हि एकजातीय न राहता ,ती वेगवेगळ्या समदुखी समूहांची चळवळ होऊ पाहत होती .त्यात ती यशस्वी झाली तर आपल्या पारंपारिक सत्तेला धक्का पोहोचेल हि भीती होती .डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर कट्टरपंथी हिंदू संघटनांनी मराठा समाजाला हाताशी धरून धर्मातरीत समूहाला व्यवस्थितपणे एकाकी पाडले .त्यांना ‘धर्मबुडवे ‘ म्हणून संबोधले .याचा परिणाम म्हणजे धर्मांतरित बौद्धांना इतरांपासून राजकीयदृष्ट्या त्यांनी एकाकी पाडले .परंतु दुसर्या बाजूने त्याचा फायदा असा झाला कि ,धर्मांतरित समूह स्वता:कडे व स्वतःच्या चळवळीकडे अंर्तमुख होऊन पाहू लागला .या घटनांमुळे एका बाजूला त्यांनी धर्मांतरित समूहाच्या लढाईला सुरुवात केली आणि दुसर्या बाजूला त्यांनी नव्याने निर्माण होणार्या सामाजिक व्यवस्थेत समता आणि बंधुत्वाचे तत्व रुजविण्यासाठी प्रयत्न केला .त्यांना मिळालेल्या या नव्या स्वातंत्र्यामुळे व दृष्टीमुळे त्यांनी स्वतः ला शिक्षित करून घेतले .सरकारी नोकर्यांमध्ये प्रवेश केला .आर्थिक बदलही झाला .स्वतः मध्ये आणि आपल्या नातेवाईकामध्येही त्यांनी परिवर्तन घडवून आणले .त्यांच्यावर जी सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न झाला ; तो त्यांनी हाणून पाडला.अशा बंधनांची त्यांनी पर्वादेखील केली नाही .स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर त्यांनी समदुखी समूहाचा शोध घेण्यास सुरुवात केली .त्याला बंधनातून मुक्त करण्यासाठी ते धडपडू लागला .इतरांच्या प्रश्नांवरही ते रस्त्यावर उतरले .मंडल आयोगाची अंमलबजावणी ,अत्याचारविरोधी भूमिका ,विषमता विरोधी पुढाकार हि त्यातली काही ठळक उदाहरणे आहेत .या प्रक्रियेतून ते  ‘धर्मबुडवे’ या प्रतिमेमधून बाहेर पडले .उलट ते इतरांसाठी परिवर्तनाचे एक प्रतिक बनले  आहेत व सामाजिक बंधने मोडण्यात ते यशस्वी होत आहेत हे लक्षात येताच रिडल्स प्रश्न उपस्थित करून व्यापक होणार्या त्यांच्या चळवळीला पुन्हा जातीपुरती संकुचित करण्याचा प्रयत्न्न झाला .हि परिस्थिती निर्माण करण्यात आली .कारण त्यांना माहित होते कि , आंबेडकरी चळवळीतील माणूस ‘प्रतिक्रिया’ देण्यामध्ये तत्पर आहे .त्यांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू देव देवतांना शिव्या द्यायला सुरुवात झाली कि ,जे हिंदू राजकीय दृष्ट्या पक्ष सोडल्याशिवाय गत्यंतर नाही . या परिस्थितीचे भान ठेवून आंदोलन हे १) आंबेडकरी अस्मिता विरुध्द हिंदू अस्मिता असे होणार नाही . २) हे आंदोलन लेखन स्वातंत्र्य याच मुद्यावर लढले गेले पाहिजे ३) आंदोलनाचे केंद्र हे मुंबई शहर राहिले पाहिजे  ४) नामांतर आंदोलनातील त्रुटी या आंदोलनापासून वगळल्या गेल्या पाहिजेत या मुद्यावरच लक्ष केंद्रित होईल हे आम्ही जाणीवपूर्वक पहिले व तशी काळजी घेतली .
 रिडल्सच्या प्रश्नावर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ नयेत तर एकच प्रवाह निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटना /नेत्यांना एकत्र आणले .या सर्वांना एकत्र आणायचे होते ; त्याचे कारण त्यांना मोकळे सोडले असते तर प्रत्येकाने मीच बाबासाहेबांच्या विचारांचा ‘सच्चा पाईक’ आहे हे सिद्ध करण्यासाठी कडव्यातली कडवी प्रतिक्रिया देत तेहत्तीस कोटी देवांचा उद्धार केला असता .त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली असती .चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भाषणातून शत्रूच निर्माण केले असते .असे झाले असते तर आंबेडकर चळवळीच्या बाहेरील समूह जे परिवर्तनाच्या बाजूने आहेत .त्यांची दारे चळवळीला बंद झाली असती .नामांतर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली असती .मला हे कधीच कळले नाही कि ,तेहत्तीस कोटी देवांना शिव्या दिल्यामुळे चळवळीचे कसे भले होणार आहे ? उलट चळवळीला पोषक वातावरण निर्माण होण्याऐवजी अशा प्रतिक्रिया आणि अशा भाषणामुळे आपण शत्रूच निर्माण केले आहेत .या सर्वाना एकत्र करून पक्षाने ठरविलेली भूमिका सर्वासमोर गेली आणि त्यामुळे घटनेने बहाल केलेले विचाराचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे याचवरती रिडल्सचा प्रश्न फिरू लागला या भूमिकेमुळे समाजातील अनेक संघटना ,विचारवंताना आपल्या बाजूने येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले .त्यामुळे आंबेडकरी चळवळी शिवाय इतरही ‘लेखन स्वातंत्र्य अबाधित राहिले पहिजे’ हि भूमिका घेणार्यांना आपल्याबरोबर यायला काहीच अडचण राहिली नाही .त्यांचा पाठींबा आणि सहभागामुळे महाराष्ट्र शासनाला ‘रिडल्स’ जसेच्या तसे प्रकाशित करावे लागले .येथे दोन गोष्टीचे स्मरण आपणास करून देऊ इच्छितो .आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेते त्यावेळी मी इतरांपेक्षा मी कसा लायक आहे हे सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले होते .ते नेतृत्वासाठी भांडत होते .त्यावेळचा ‘नवाकाळ’ नजरेखालून घातला तरी हि परिस्थिती आपल्या लक्षात येईल .त्याचा एक फायदा आम्हाला असा झाला कि हे नेतृत्वासाठी भांडत राहिल्यामुळे रीदाल्सचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे जी उद्धिष्ठे समोर ठेवून लढा उभा केला त्याच प्रश्नावरती रिडल्सची चळवळ केंद्रित करण्यात यश आले .त्यात ज्या दक्षता घ्यायच्या त्या घेता आल्या .त्यापैकी सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा लढा आंबेडकरी अस्मिता विरुद्ध हिंदू अस्मिता असा होऊ दिला होऊ द्यायचा नाही त्यात आम्ही यशस्वी झालो .दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा लढा शांततेने लढायचा .दंगल करून नव्हे .हा आंबेडकरी चळवळीचा संदेश लोकांना द्यायचा होता ,तो दिला . बाळ ठाकरे यांनी मुंबईत त्यावेळी मोठा मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा संदेश दिला होता ; त्याचवेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मुंबईत बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवू या असे आवाहन मी केले होते .त्यातून ठाकरेंची फजिती झाली आणि समयसूचकतेतून प्रश्न सुटायला मदत झाली .त्यामुळे सरकारने पुन्हा रिडल्स इन हिंदूइझम प्रकाशित केले .नामांतराचा लढा हा मराठा अस्मिता विरुद्ध आंबेडकरी अस्मिता असा होता .परंतु रिडल्सचा लढा हा हिंदू अस्मिता विरुध्द आंबेडकरी अस्मिता एव्हढा व्यापक होता तरीही कुठेही दंगल आणि रक्तपात न होता तो प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो .
‘येरे माझ्या मागल्या ‘ या म्हणी प्रमाणे एकत्र आलेले नेते आणि संघटना ,आंबेडकरी चळवळीचे स्वतःचे स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा पुन्हा कुणाच्या ना कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या राजकारणात गर्क झाले .ते आपल्याला राजकीय मित्रांबरोबर समझोता करत फिरत राहिले .नेते जरी वेगवेगळे राहिले तरी रिडल्समुळे एकत्र आलेल्या जनसमुहाची ताकद पक्षाबरोबर राहिली .त्या भरवशावर पक्षाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली .
                               क्रमश :                          





प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक " आंबेडकरी चळवळ संपली आहे ....." १ जानेवारी २००७ साली प्रकाशित झाल , पुस्तकाच शिर्षक हे मा .ज .वि .पवार यांनी दिलेलं असून त्यात असणारा फुल stop नाही तर टिंब टिंब आहे . २००७ पासून हे पुस्तक न वाचता केवळ विरोधाला विरोध म्हणून प्रत्येकजन बाळासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा हवाला देऊन केवळ टीका विरोध आणि खालची पातळी गाठतो परंतु नेमक हे पुस्तक काय आहे आणि यामध्ये बाळासाहेबांनी अस काय लिहिलेलं आहे हे वाचन अत्यंत महत्वाच आहे . ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं असेल त्याचं आकलन नक्कीच झालेलं असेल आणि वाचणारा हाही विचार करेल कि बाळासाहेबांनी सांगितलेलं विचार आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच आहे म्हणून मी मा .बाळासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन संपूर्ण पुस्तकाचे भाग विभाजित करून टाकणार आहे . तरी सर्वांनी ते वाचून जरून आपली मते आणि पुस्तकातील विचारांचा प्रसार करावा हि विनंती .

                                     - प्रवीण जाधव

                                         " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...."

                    भाग -१
  
         डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी आपली चळवळ कशी उभी केली ;याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला . तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे .त्यानिमित्ताने ,मी १९८० साली पुणे ,सातारा ,कोल्हापूर ,कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला .जुन्या माणसांशी बोललो .त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले ,आठवणी सांगितल्या .बाबासाहेबांची जेंव्हा चावडीत बैठक सुरु असायची त्यावेळी अनेक ज्ञातिबांधव मुद्दामहून चावडीत झोपण्यास येत असत .ते बाबासाहेबांना उद्देशून म्हणत असत कि .' हा काय करणार आहे ? हा तर आमची हाडकी -हडावळी ,आमचे बावन्न अधिकार काढायला निघालाय .' अशा परिस्थितीत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी जे कोणी या चळवळीला सहकार्य करतील ,त्यांना बरोबर घेऊन आपली चळवळ पुढे नेली .याचा अर्थ असा होतो कि त्यावेळीही समाजात काही जागरूक लोक होते ते बाबासाहेबांबरोबर आले.  जे नव्हते ,ते बाजूला थांबले .कालांतराने ज्यांनी बाबासाहेबांना सहकार्य केल नाही तेहि चळवळीत आले .त्यावेळी ज्यांना हाडकी हाडवळ हे सुरक्षेचे कवच वाटत होते ;तेच बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले .पण जेंव्हा त्यांना " हाडकी - हाडोळी " हे सुरक्षेचे कवच नाही ,तर गुलामीची निशाणी आहे हे लक्षात आले ; त्यावेळी त्यांनी आपला पवित्र बदलला व ते आंबेडकरी चळवळीचे वाटसरू बनले .हे या ठिकाणी सांगण्याचे कारण कि ,जी परिस्तिती असते तिच्यात लोक बदल करण्यास तयार नसतात .अशा वेळी नवी व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात जी सतर्कता यांच्यात हवी असते .ती तयार झालेली नसते . माझा राजकीय जीवनातील  चोवीस वर्षाचा अनुभव मला हेच सांगतो आहे .

  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी एक जुनी व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण केली .त्यातून आपल्याला जे अधिकार मिळाले त्या लाभामध्येच आज आपण 'मदहोश ' आहेत . परिस्थिती बदलली आहे .या बदलत्या परिस्थितीत आपल्याला नव्याने अधिकार मिळवावे लागतील किंवा जे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत ते सह्बूत ठेवण्यासाठी जागरूक राहावे लागेल .या संदर्भात समाजात काही चर्चा घडते आहे ,कृती होत आहे असे मला काही दिसत नाही .बाबासाहेबांनी जी चळवळ मोठ्या कष्टाने उभी केली ,तिच्या प्रारंभीच्या काळाचा अभ्यास होणे ,तिची चिकित्सा होणे मला गरजेचे वाटते . त्यामधून आज आपल्यापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत ,ती पेलून ' चळवळ टिकविण्यासाठी उपयुक्त असे ज्ञान मिळेल .आजवर या सबंधातले संशोधात्मक लेखन कमीच झाले आहे .

चर्चेचे गांभीर्य .....


२००४ -२००५ या वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जे मला बघायला मिळाले ,जे मी अनुभवले ' त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही . ती जी काही चालेल .ती माझ्या पिढीपुरतीच . त्यातलेसुद्धा कमिटेड कार्यकर्ते असेपर्यंत , तेव्हढ्यापुरतीच राहील .पुढे ती चालली तर त्यामध्ये आंबेडकरी आणि स्वाभिमान विचार नसेल .विचारला माननारा कार्यकर्ता नसेल .जो काही कार्यकर्ता आढळेल त्याची चळवळीशी विचारांशी बांधिलकी किती राहील ,याबद्दल मला शंका आहे . त्याची बांधिलकी चळवळीशी नसेल तर चळवळ कशी आणि कुठे राहणार आहे ? हे मी लिहित असताना ,काही जणांना निवडणुकीच्या अपयशातून ,मी निराशावादी झालोय आणि म्हणून मी अशी भूमिका मांडतोय ,असे वाटण्याची शक्यता आहे . त्या सर्वाना मी सांगू इच्छितो कि ,माझ्यासारखा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत झोकून देतो ; तेंव्हा त्याला हि जाणीव असतेच कि , आपल्याला सहजासहजी सत्ता मिळणार नाही .सत्तेसंबधी त्याची भूमिका असते  कि ,सत्ता मिळाली तर ठीक . अन्यथा जे काही अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले व जी व्यवस्था निर्माण केली ,त्या अधिकारात वाढ कशी होईल ; त्याचबरोबर जी व्यवस्था निर्माण केली आहे ,ती सुद्रुढ कशी होईल , यासाठी धडपड करीत राहावे .त्यामुळे चळवळीसंबंधी जी काही चर्चा मी येथे करत आहे ; ती ती पूर्वग्रह न ठेवता गांभीर्याने लक्षात घेतली जावी अशी माझी अपेक्षा  आहे . आंबेडकरी चळवळीत काम करताना याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे कि , आपले आर्थिक ,सामाजिक उद्धिष्ट आणि तत्वज्ञान हे असमानतेच्या विरोधात असल्यामुळे ,त्याला प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. त्या विरोधाची धार वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते . सत्ता मिळविणे हे प्रवाहाच्या विरोधात पोह्न्यासारखे कठीण असते .चळवळीची हि अवस्था का झाली ? त्याची करणे काय ? काय मिळविले  ? काय गमावले ? काय मिळवून टिकवू शकलो नाही ? याचेही थोडक्यात इथे विश्लेषण केले आहे .या विश्लेषणाची सुरुवात नामांतराच्या चळवळीपासून करीत आहे .

    नामांतर.......

 १९८० साली माझ्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली .त्यावेळीची महाराष्ट्राची परीस्तीती वेगळी होती .१९७६ साली सुरु झालेली नामांतराची चळवळ क्षीण होण्याच्या मार्गावर होती . आंबेडकरी चळवळ पूर्णपणे 'नामांतर ' या एकच प्रश्नावर केंद्रित झालेली होती . नामांतराच्या लढ्यात लोकांनी एकजूटता दाखविली .हि ताकद खूप मोठी होती .त्यामध्ये चळवळीबरोबर नसणारे पण बाबासाहेबांना मानणारे हेही सहभागी झाले होते .
हि उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान कॉंग्रेसने आणि त्याचबरोबर कॉंग्रेसबरोबर समझोत्यात असलेल्या आर .पी .आय . च्या नेत्यांना हाताशी धरून केले .या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून प्रचंड दडपशाही करण्यात आली व पोलिसाकडून अमानुष अत्याचार करण्यात आले .आंबेडकरी चळवळ मुळासकट उपटून टाकण्याचा यावेळी प्रयत्न झाला . कॉंग्रेस आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांनी दलितांच्या घरांची राख रांगोळी केली आणि महिलांची बेअब्रू केली . शिक्षणामुळे ज्यांना नोकर्या लागल्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली होती आणि त्यांना जायकवाडी धरणामुळे समृद्धी आलेली होती अशांची हि समृद्धी या दंगलीमध्ये अक्षरशा : नष्ट करण्यात आली . दडपशाही व अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी चळवळ आपल्या विरोधात उभी राहू नये असा डाव कॉंग्रेस ने रचला होता .कॉंग्रेस चे नेतृत्व हे मराठा समाजाचे नेतृत्व होते .' मराठवाडा विद्यापीठ' या नावात 'मराठा' समाज स्वतःची अस्मिता पाहत होता .नामांतर म्हणजे मराठ्यांना संपविणे व आपली सत्ता काढून घेणे ,असा प्रचार हित शत्रूंकडून त्या काळात करण्यात आला .त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आंदोलन चालविले गेले .त्याचे पर्यवसान आंबेडकरी अस्मिता विरूद्ध मराठा अस्मिता असा लढा लढविण्यात झाले .परिणामी दंगल झाली .दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली ,जाळण्यात आली .बहिष्कार टाकण्यात आले .कत्तली करण्यात आल्या आणि दलितांना एकांगी पाडण्यात आल .

   त्यावेळी परिस्थिती बदलणे आणि शांतता प्रश्तापित करणे याला प्राधान्य देणे हे महत्वाचे होते आणि ते मी केले . मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटविणे ,सामंजस्य निर्माण करणे ,ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी लढणे आणी आक्रस्ताळी भाषणाची धार बोथट करणे यासारखी कामे अंगावर घेतली .या भूमिकेमुळे माझ्याबद्दल अनेक समज - गैरसमज पसरले .मी त्याची कधीही पर्वा केली नाही .या आंदोलनात काहींनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकामुळे (ज्या भूमिकांना मी बेजबाबदार म्हणतो ) ,नामांतराचा हा लढा सरकारविरोधी लढा होता .तो तसाच ठेवला गेला पाहिजे होता .त्याला पहिल्या टप्प्यात मराठविरोधी स्वरूप दिल्या गेल आणि नंतर ते पोलीस विरोधी झाल .आंदोलनकर्ते त्यामुळे कोंडीत सापडले .याचा फायदा मराठा नेतृत्वाने पुरेपूर उठविला ,पोलिसांचा अत्याचार ओढवून घेतला ,याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एकप्रकारची दहशत बसली होती .या कारणास्तव मोर्चाला यायचे म्हणजे पोलिसांचा लाठीमार खायचा .अशी भीती लोकांमध्ये निर्माण झालेली होती .त्यामुळे नंतर नंतर लोक मोर्चाला यायचे थांबले . मनाने ते हरले होते .अत्यचार ,मारझोड ,दडपशाहीमुळे खचलेल्या सैन्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची गरज होती .त्यासाठी लोकांमध्ये पुन्हा एकदा चळवळीबद्दल विश्वास निर्माण होईल असा कृतीशील कार्यक्रम देणे आवश्यक होते .आंबेडकर चळवळीत 'मोर्चा' व सभा हे सर्वात मोठे हत्यार राहिले आहे . ते मोडणे म्हणजे चळवळीला मोडणे होय असाच अर्थ त्याकाळी लोक लावत होते .दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास , चळवळ संपविण्याच्या मार्गावर घेऊन जाणे म्हणून आम्ही १९८२ साली आठ दिवसांचा long मार्च काढला .जस जसा हा 'मार्च ' पुढे जात राहिला तस तसा लोकात विश्वास वाढत गेला .ज्यावेळी मुंबई ला हा मोर्चा पोहोचला .त्यावेळी लाखोंच्या संख्येने ग्रामीण जनता त्यात सहभागी झाली होती .शहरी भागातील माणूस जो या मोर्चात होता तो वेगळाच होता . long मार्च ने उपस्थित केलेल्या प्रश्नावरती त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली आणि तात्पुरती का होईना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली .यातून आपले प्रश्न मार्गी लागू शकतात हा नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला .
           त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासक व पोलीस खात्याला मोठी चिंता वाटत होती कि आंबेडकरी चळवळ चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात चळवळीतील कार्यकर्त्यावर जो अमानुष अत्याचार झाला त्याचा परिणाम म्हणून तो नक्षलवादी चळवळीकडे वळतो कि काय अशी चिंता एका वरच्या पातळीवर केली जात होती .हे त्यावेळी फार थोड्या जणांच्या लक्षात आल होत .आंबेडकरी चळवळीतील कार्यकरत्यावर व चळवळीतील जनतेवर जो अमानुष अत्यचार झाले त्याचा परिणाम म्हणून नक्षलवादाकडे वळतो कि काय हि परिस्थिती long मार्चच्या बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना वाटत होती .या भीतीला खतपाणी घालायचे त्यांनी ठरविले .
                                                   क्रमश :
                                                             - प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर


(साभार :-  " आंबेडकरी चळवळ संपली आहे ...." या पुस्तकातून )









Sunday, 29 December 2013

!!! राम उर्फ पुष्पमित्र शुंग ………………. !!!

इतक्या वर्षापासून बौद्ध धम्म , धम्माचा इतिहास आणि सोबत हिंदू ब्राह्मणी पुराण ,ग्रंथ विशेष करून रामायण ,महाभारत ,भगवदगीता यांच्या अभ्यासाअंती मी आज अतिशय ठामपणे ,सप्रमाण हे निष्कर्षाप्रत सांगू इच्छितो कि
हिंदू ब्राह्मणी लोकांचा रामायण या काल्पनिक पण वास्तव जीवनाशी साधर्म्य असणारे काव्य आणि या काव्याचा दाखविलेला नायक म्हणजेच 'श्रीराम' हा दुसरा तिसरा कोणी नसून बौद्ध धम्माचा पाडाव करणारा ' पुष्पमित्र शुंग ' हा आहे . पुष्पमित्र शुंगाला ' रामायणामध्ये राम हे नाव देऊन अतिशोक्तीचा भरणा केलेला आहे . रामायणामध्ये खलनायक स्वरूप दाखविलेल आहे असा 'रावण ' हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोक आणि मोर्य घराण्याचा वंशज 'सम्राट बृहदथ ' आहे . सम्राट अशोक हयात असताना आणि नंतर भारतासह सिलोन (श्रीलंका) देशाचा बुद्धिष्ट देश होणाच्या जडणघडणीत मोर्य घराण्याचा सिंहाचा वाटा होता . तो काटा राम अर्थात ' पुष्पमित्र शुंग ' याने रावणाचा अर्थात ''सम्राट बृहदथ ' चा काटा काढून बौद्ध धम्मावर घाला घालण्याचे काम करून ब्राह्मणी धर्माला चालना दिली .

रामायणामध्ये अशा कितीतरी अतिशोक्ती आणि चुका आहेत कि थोडी बुद्धी लावली तर सहज लक्षात येतात . रामायणामध्ये उल्लेख आहे कि , जानकी राजा कडे परशुरामाने आपला शिवधनुष्य ठेवला होता . हा शिवधनुष्य इतका शक्तिशाली होता कि सामान्य मनुष्य तो तोलू शकत नव्हता . पण रामायणामध्ये उल्लेख आहे कि "सीता हि नऊ वर्षाची असताना शिवधनुष्याशी
खेळत होती आपल्या बोटाने त्याला हलवत होती " नंतर ती तरुण झाल्यावर त्या शिवधनुष्याला सहज हातामध्ये पेलत असे असा उल्लेख आहे ,याचा अर्थ असा कि परशुरामाचा धनुष्य जो मनुष्य / स्त्री पेलत असेल ती किती श्रेष्ठ आणि ताकदवान असेल . पुढे असा उल्लेख आहे कि जानकी राजाने सीतेचे लग्न अर्थात स्वयंवर करण्याचे ठरविले तेव्हा अनेक राजे महाराजे बोलविले होते त्यात राम आणि रावण पण आले होते . आता परत अगोदरच्या प्रसंगावर जाऊ कि "सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे". सीतेच्या स्वयंवरात जानकी राजाने हि अट घालती होती कि जो हा धनुष्याला दोरी लावेल त्याला सीता वरमाला घालेल , पण जेव्हा रावणाचा क्रमांक येतो तेव्हा "तो शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" . पुढे राम धनुष्याला दोरी लावतो आणि सीता त्याला वरमाला घालते . पण पुढे ते वनवासात असताना रावण सीतेचे अपहरण करायला येतो असा उल्लेख आहे . आता आपण परत मागे गेलो असता कळते कि " सीता तरुण झाल्यावर हा धनुष्य सहज उलचत असे" आणि "रावण शिवधनुष्य पेलताना रावण खाली पडतो अर्थात तो पेलू शकत नाही" या दोन्ही गोष्टीवरून हा निष्कर्ष निघतो कि सीता हि रावणापेक्षा शक्तिमान आहे . मग अशी शक्तिमान सीता रावण आपल्या खांद्यावर घेऊन पळाला कसा ? लिहिणाऱ्याने काल्पनिकपणे लिहिला पण वाचणाऱ्या बहुजन हिंदू समाजाने आपला मेंदू नक्कीच गहाण ठेवला आहे .
असे अनेक प्रसंग आहेत ,जिथे बौद्ध धम्मावर आक्रमण करण्याच्या दृष्टीने आपलाच स्वकीय असणारा बहुजन अर्थात ओबीसी (हनुमान ) ला सोबत घेऊन समोर त्यांचे गोडवे गावून आणि रामाने त्याच अनुषंगाने ब्राह्मणांनी बहुजन ओबीसी यांना गुलाम केले आणि आणि काव्यात माकडे ,वानर ,हनुमान अशा संज्ञा लावून त्यांचीही लायकी काढलेली आहे . अर्थात इथल्या लोकांना गुलाम बनवून बौद्ध धम्माच्या पाडावास मदत घेतलीच आहे . हनुमानाची जवळ पास २५०० कि. मी. इतकी लांबी सांगितली आहे अर्थात श्रीलंका आणि भारताच अंतर अगदी ५० -१०० कि . मी . च्या आसपास आहे . सीतेला सहज तो परत आणू शकत होता जिथे संजीवनी बुटी आणण्यासाठी अख्खा पर्वत आणू शकतो तिथे बेटावर वसलेला श्रीलंका देश तो उचलून पण आणू शकत होता . अशा कितीतरी गोष्टी थोतांड आहेत तरीही बहुजन समाज अजून स्वताची बुद्धी हरवून गुलाम झालेला आहे . रामायणात बुद्धाचे उल्लेख वारंवार आढळतात . कुठे रामाच्या तोंडून बुद्धाला चोर म्हटलं जात कुठे रामाला बुद्धाची उपमा दिली जाते अर्थात यामागे पुष्पमित्र शुंग च आढळतो त्याचकाळात रामायण काव्याची निर्मिती झालेली आहे .

पुढे कृष्ण आणि काही महाभारत पण कल्पोकल्पित आणि बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर झालेली प्रसंगे आणि मूळचे बौद्ध धर्मीय पण पाडाव झाल्यानंतर 'शुद्र' म्हणून गणल्या गेलेल्या लोकावर अन्याय आणि अत्याचार रंगविण्याचे काम या ग्रंथातून आहे . कृष्णालाही ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा पण थोडा बहुजन वाटला पाहिजे आणि इथल्या बहुजन लोकांना आपला वाटायला हवा म्हणून यादव वंशात गवळी रुपात पद्धतशीरपणे आणि शीलभ्रष्ट दाखविण्यात यशस्वी झालेले आहे , मुळात स्वतःचे आचरण अनैतिक असूनपण ब्राम्हण ग्रंथकारांनी कृष्णाला देव बनविण्यात यशस्वी झालेले आहेत . जिथे कृष्ण ब्राम्हण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो तिथे मूळ नागवंशीय बौद्ध असलेला 'कालिया मर्दन ' अर्थात नागवंशी तक्षक कालिया यांच्यातील संघर्ष हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राम्हण संस्कृतीचा संघर्ष आहे . इथेही बौद्ध धम्माचा पाडाव झाल्यानंतर ' भगवद गीतेचे ' लिखाण हे दुसरे तिसरे काहीही नसून धम्म्पदाची नक्कल आहे अस अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आणि आभ्यासांती खरही आहे . पण भगवदगीता हि हि धम्मपदाला विकृत स्वरुपात लिहिलेलं आहे . जिथे पृथ्वी हि हि चपटी आणि सरळ सांगितली आहे पण विज्ञानाने हे सिद्ध केलय कि पृथ्वी अंडगोलाकार आहे . अशा असंख्य गोष्टी आहेत आणि सर्व थोतांड आहे . अजूनही बहुजन समाजाने वाचन करावे आणि मानसिक गुलामगिरीतून सुटून मूळ बौद्ध धम्माकडे वळावे …………………

!!! जय भीम ………नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव
!!! जगातील पहिले संशोधक ,शास्रज्ञ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध !!!

जगाला मानवता आणि विज्ञानावर आधारित बौद्ध धर्म (धम्म) देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जगात माहित नसतील असा कोणीच नाही . बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित म्हटल्यापेक्षा विज्ञानच बौद्ध धर्मावर आधारित आहे अस म्हणाल तर चुकीच नाही होणार याच कारण म्हणजे जगातील सर्वात पहिले scientist वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध च आहेत . बौद्ध धम्माचे जे सिद्धांत त्यांनी मांडिले त्या सिद्धांतावरच १९ आणि २० शतकातील होऊन गेलेल्या महान वैज्ञानिकांनी बुद्ध तत्वज्ञानावर आणि तथागातालाच आद्य वैज्ञानिक मानूनच संशोधन पुढे नेले आहे .

अगदी अलीकडच्या काळातल उदाहरण घेतल तर Apple computer अर्थात आज आपण iphone किवा इतर गोष्टी ज्या Apple कंपनीने निर्माण केल्यात ज्या Mac OS अर्थात operating system वर आधारित आहेत त्याचा संचालक Director स्टीव्ह जॉब होता. अलीकडच्या काळात त्याच निधन झाल . पण पूर्वी सतत अपयश पाहून खचलेल्या स्टीव्ह जॉब ने बुद्धाविषयी ऐकले होते पण निराशेतून मार्ग काढण्यासाठी भारत भ्रमणावर आलेला स्टीव्ह बुद्ध विचारांना शरण आला . अपयशाने खचलेला स्टीव्ह बौद्ध धम्माच्या सिद्धांताने एव्हढा बदलून गेला कि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बुद्ध तत्वज्ञान तो वाचू लागला . बुद्ध तत्वज्ञान हे विज्ञानच आहे त्यातून त्याला बुद्धाच्या उपदेशामधुनच computer क्षेत्रात आलेल्या अपयशाच कारण आणि मार्ग सापडला . बुद्धाने सांगितलेले परिवर्तन आणि कृतिशीलता त्याला एव्हढी भावली कि Apple ची creativity & Design बुद्ध सापेक्षतेवर आधारलेली होती जेव्हा तो परत आपल्या देशात अमेरिकेला गेला तर Apple Computer चे नाव आणि निर्मिती झाली आणि microsoft सारख्या प्रस्थपित उद्योगालाही मागे टाकून जगात Apple ने लौकिक मिळविला त्याचे श्रेय त्याने फक्त तथागत गौतम बुद्धालाच दिले .

जगातील atomic model अर्थात अणु संरचना नील बोहर आणि रुदरफोर्ड यांना जरी मानतो तरीही त्यांनी प्रताक्षात हे सांगितलं कि आम्ही फक्त प्रयोग करून दाखविला पण २५०० वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने Atomic Model सांगितलं आणि आपल्यालाही अनेक ग्रंथामधून हेच वाचावयास मिळते . Niel Bohr Stated that “ In Atomic Model built by the centrally situated nucleus and revolving electron around it “ तथागत हि शिष्यांना उपदेश करताना Atomic Model सांगतात केंद्रकाभोवती जे अणु रेणूचे कण फिरतात त्यामुळे वस्तूची निर्मिती आणि उर्जेची देवाण घेवाण होत असते . याचाच अर्थ हा आहे कि नील बोहर च्याही अगोदर हि रचना तथागताने मांडलेली होती म्हणून नील बोहर सारखा वैज्ञानिक बुद्धाला मानतो . ज्या लोकांनी science मधून शिक्षण झालेलं असेल किवा त्याची जाण असेल त्यांना हे कळेल . The Force is present between electron and nucleus is known as Electrostatic Force . बुद्धानेही सर्वप्रथम इलेक्ट्रिक field आणि Magnetic Field अर्थात चुंबकीय क्षेत्र सांगितलेलं आहे आणि हे चुंबकीय क्षेत्र नेहमी विद्युत क्षेत्रालाच अनुसरून राहत किवा पूरक असत हेही तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे याचा उल्लेख अनेक शास्रज्ञ तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात उल्लेख केला आहे .

अल्बर्ट आईनस्टाइन ने सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचाच पुरस्कार करून संशोधन केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन हेच सिद्ध केल कि विज्ञान हे बौद्धमत आहे . तथागत म्हणतात मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका ,स्वतः ते तपासा ,अनुभव घ्या , चाचपणी करा म्हणजेच प्रयोगशील राहून सत्यमत बघा . यातच सापेक्षवादाचा सिद्धांत आहे असे अल्बर्ट आईनस्टाइन म्हणतो Theory of relativity हि बुद्ध विचारावरच आधारलेली आहे . Robert Mayer ने सांगितलेला उर्जा नियम अर्थात energy conservation law हा तथागत गौतम बुद्धाने २५०० वर्षापूर्वी सांगितलेला आहे . जे बुद्ध सांगतात कि उर्जा हि एका वस्तू मधून दुसऱ्या वस्तूमध्ये प्रवाहित होते त्याच क्षमन कधीच होत नाही भूतलावर त्याचे भांडार जेव्हडे आहे ,तेव्हडेच राहते त्याची निर्मिती किवा त्याला नष्ट करणे शक्य नाही . हाच नियम Robert Mayer मांडतो कि Energy neither be created nor be destroyed it can convert one form to another form but whole energy remain in constant in isolated system .

Newton चे संशोधन बुद्ध धम्माच्या तत्वाज्ञानावरच आधारलेलं आहे आणि ज्या शास्रज्ञानी स्वीकारलं त्यांनी पुढे जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल संशोधन बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर आणि मार्गानेच आहे अस सांगितलं . काही प्रसिद्ध वैज्ञानिकांची मते खालील प्रमाणे आहेत
The main achievement of the success of the twentieth century scientists in transcending the three dimensional barrier is acquiring a more realistic understanding of nature and natural phenomena. Twentieth century transcended science enables us to scientifically confirm that such concepts as impermanence, rebirth, telepathy and selflessness taught by the Buddha are true phenomena of nature which are beyond three spatial dimentions and therefore beyond classical science.

Derek Parfit of Oxford University (probably the world's most important living philosopher) accepts the Buddhist view of life and selflessness. He believes that his acceptance of selflessness which was inspired by split brain research, has liberated him from the prison of self. He says,

"When I believed that my existence was such a further fact, I seemed imprisoned in myself. My life seemed like a glass tunnel, through which I was moving faster every year, and at the end of which there was darkness. When I changed my view, the walls of my glass tunnel disappeared. I now live in the open air."

Derek Parfit, Fritj of Capra (the well known Nuclear Physicist) and Gary Zukav accept the Buddhist view of matter and believes in the need to liberate ourselves from the prison of material particles.
Albert Einstein regarded as the father of the theory of relativity says,

"Individual existence impresses him as a sort of prison and he wants to experience the universe as a single cosmic whole. The beginnings of cosmic religious feeling already appear at an early stage of development, as an example in the Psalms of David and in some of the Prophets. Buddhism, as we have learned especially from the wonderful writings of Schopenhaur, contains a much stronger element of this."

Niels Bohr who developed the presently accepted model of the atom together with Earnest Rutherford says,

"For a parallel to the lesson of atomic theory….. (we must turn) to those kind of epistemological problems with which already thinkers like the Buddha and Lao Tzu have been confronted, when trying to harmonize our position as spectators and actors in the drama of existence."

The most eminent Nuclear Physicist, Robert Oppenheimer, who produced the first atom bomb says,

"The general notions about human understanding … which are illustrated by discoveries in atomic physics are not in the nature of things wholly unfamiliar, wholly unheard of, or new. Even in our own culture they have a history, and in Buddhist thought a more considerable and central place. What we shall find is an exemplification, an encouragement and a refinement of old wisdom." - Robert Oppenheimer.
वर उल्लेखलेल्या nuclear bomb theory मध्ये बुद्ध तत्वज्ञान आहे याच कारण हेच कि तथागताने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आचरणाला महत्व दिले तसाच अखिल मानवजातीला बाह्य शक्ती अर्थात आज जो elian किवा परग्रहावरील संभावित असणाऱ्या सजीवाबद्दल जे संशोधन अमेरिका आणि NASA द्वारे सुरु आहे त्याचेही मत बौद्ध मतात आढळते म्हणून अणुशक्ती प्रयोगाला पोखरण मध्ये "बुद्ध हसला " हे नाव देण्यात आले . अमेरिकेच्या संरक्षण दलातील सैनिकांच्या गणवेशावर वर बुद्धाचे प्रतिक असण्याचे हेच कारण आहे .

याही पुढे आपण गेलो तर Biology अर्थात जीवशास्त्र पण सर्वात अगोदर सांगणारे तथागत होते आणि human reproductive system तथगताने विशद केलेली आहे cell अर्थात पेशीचे formation कसे होते तेही सांगितलेलं आहे याचही एक उदाहरण म्हणजे जेव्हा शिष्य यश तथागातला विचारतो कि मानवाचा जन्म आणि उत्पत्ती कशी होते तेव्हा तथागत आईच्या गर्भात वाढणाऱ्या fetus अर्थात गर्भाच्या cell चे विश्लेषण करून कोणत्या लेयर पासून नाक, कान,मेंदू ,डोळे , इ . अवयवाचे वर्णन करतात . मेंडेल ने जो अनुवांशिक अर्थात hereditary law सांगितला कि The character from parent can transmitted from one generation to another generation तेच तथागत गौतम बुद्ध २५०० वर्षापूर्वी पुर्नजन्म आहे का ? यावर पुर्नजन्म आहे पण तो जसा जीव तसाच निर्माण होणार नाही त्याचे घटक मिळून जीव तयार होईल हे सांगतात म्हणजेच अनुवांशिक गुणधर्म एका पिढी कडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात हे सांगणारे प्रथम संशोधक तथागत आहेत . याचाच फलित म्हणजे जीवक सारखे वैद्यक तथागताचे शिष्य होऊन गेले आणि नंतर नागार्जुन सारखे आयुर्वेदाचार्य तथागतामुळेच जगाला मिळाले . माझा एव्हढ्या मेहनतीने लिहून सांगण्याचा उद्देश हाच कि जगात बौद्ध धम्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही . तथागत गौतम बुद्ध नुसते महान बुद्ध नसून एक अष्टपैलू महान तत्ववेत्ते आणि जगातील प्रथम संशोधक , शास्रज्ञ , वैद्यक बहुआयामी supernatural शक्ती होऊन गेलेत आणि बौद्ध धम्मात बाबासाहेबांनी आम्हाला आणून खूप मोठे उपकार आपल्यावर केलेले आहे . बौद्ध धम्माचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

!!! नमो बुद्धाय ………जय भीम !!!

- प्रवीण जाधव , अप्स इन्फोटेक
देवाबद्दल पूर्वी ब्राह्मण काय म्हणत असत? ते म्हणत असत कि देव अस्तित्वात आहे . तो कोठे आहे ? असे विचारल्यास ब्राह्मण म्हणत असत कि तो दिसू शकत नाही . तुम्ही जर म्हणालात कि कमीत कमी ब्राह्मणांना तरी तो दिसू शकतो का ? जर दिसत असेल तर त्याचा आकार कसा असतो . तेव्हा ते म्हणतात देवाला आकारही नसतो . जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा ते म्हणतात त्याला स्पर्श करता येत नाही . ते म्हणतात देवाला आकारही नाही . जेव्हा तुम्ही विचाराल कि मग विश्वास कसा ठेवायचा ? तेव्हा ते म्हणतात कि देव हा अदृश्य स्वरुपात आहे . या सर्व गोष्टी वाईट असतील तर ब्राह्मणांना मूर्ख का बर म्हणू नये ? त्यांना शहाणे कसे म्हणायचे ? जर देवाला कोणी पाहू शकत नसेल , स्पर्श करू शकत नसेल किंवा तशी जाणीवही नसेल तर मग ब्राह्मणांना देवाबद्दल माहिती कशी ? लोक त्यावर अंधपणाने विश्वास ठेवतात हा मूर्खपणा नव्हे काय ?

देवाच्या निर्मिकाने देवाला कुठलाही आकार नाही सांगितले , कुठले हात पाय नाही सांगितले , देव हे फक्त तत्वज्ञान आहे आणि ते सर्व जाणीवेपलीकडे आहे असे अल्वार ,नयन्मार आणि महान यांनीही सांगितले . मग आजकालच्या देवांना आकार कसा काय प्राप्त झाला ? मंदिरामध्ये मुर्त्या ठेवून त्यांना देव संबोधणे कितपत योग्य आहे ? म्हणून देव निर्माण करणारा नीच आणि मूर्ख नव्हे काय ? देवाला विशिष्ट आकार कोणी दिला ? देवाला आपण पाहू शकत नाही आणि त्याला स्पर्शहि करू शकत नाही हे जर खरे असेल तर त्याला दिवसातून सहा सहा वेळा अन्न देण्यात काय अर्थ आहे . अशा गोष्टीवर अमाप खर्च करणारी माणसे अस्तित्वात आहेत म्हणून तर हि नीच माणसे त्यांना फसवीत आहेत .

देवाला अन्न ग्रहण ग्रहण करताना कोणी पाहिलं का ? देवाला जिवंत राहण्यासाठी सहा सहा वेळा अन्न ग्रहण करण्याची गरज आहे का ? कोण व्यक्ती आहे जो देवाच्या मुखात घास भरवतो ? देव अन्न पचन करतो का ? दिवसातून एखादवेळी तरी देव शौचास जाताना कोणी पाहिलं का ? कोणी त्याला लघवी करताना पाहिलं का ?खरोखर देव जागचा हलू शकत नाही मग या नैसर्गिक विधी तो कोठे उरकतो ? या विषयावर जो काहीच विचार करीत नाही आणि विचारतही नाही त्याला महान व आस्तिक समजले जाते . देवाला कशाचीही गरज नाही हे जर खरे असेल तर ब्राह्मण देवाचे लग्न वैगेरे कशासाठी लावतात ? त्यास पत्नी व मुले कशासाठी हवीत ? एका देवाला दोन पत्न्या आहेत तर काहींना हजारो पत्न्या आहेत देवांना हजारो पत्न्यांची गरज काय ? याविषयी ते विचारही करू शकत नाही आणि उत्तरही देऊ शकत नाही . ते इथेच थांबत नाहीत तर ते दरवर्षी देवाचा लग्न समारंभ साजरा करतात . जे लोक देवाच्या लग्नास भक्तीभावाने उपस्थित राहतात ते विचारही करीत नाही आणि विचारतही नाही कि मागच्या वर्षी झालेल्या लग्नाचं काय झाल ? काय त्या देवाची पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली ? का एखाद्या आजाराने मरण पावली ? का असा एखादा कायदा आहे कि देवाचे लग्न एका वर्षासाठीच कायदेशीर ठरविले जाते ? हे प्रश्न विचारण्याची कोणाला गरज वाटते का ? दरवर्षी देवाच्या लग्नाला उपस्थित राहणारे मूर्खच आहेत .

जर देव साक्षात सदगुणांची मूर्ती असेल तर तो असा विविध स्त्रियांशी सबंध कसा काय ठेवू शकतो ? महाकाव्यात ,ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शिव , विष्णू , कृष्ण इ . देवांनी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्यांना अनेक बायका असूनही अशा स्त्रिया ठेवण्याची गरज का भासली ? असा प्रश्न कोणी विचारतो का ? देवाच्या वर्तनावर आणि चारित्र्यावर अनेक कथा रचल्या आहेत . त्यांचे देव नालायक व्यक्तीसारखे वर्तन करीत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे . काही देवांनी तर इतरांच्या पत्नींशी बळजबरी केल्याचे वर्णन आढळते . हे देव माणूस म्हणून घेण्यास पात्र नाहीत . अशा निर्माण केलेल्या देवांचा धिक्कारच करायला हवा .

(साभार - पेरियार रामसामी यांनी मेत्टपलायम तमिळनाडू इथे दिलेलं भाषण )

- प्रवीण जाधव
!!! धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीच १४ ऑक्टोंबर नव्हे !!!

मागील माझ्या बौद्ध धम्माचे विकृतीकरण या सदराखाली मी दशहरा / दसरा या विषयी विस्तृत माहिती दिली आहे . रावण , दसबळी इ . जे मांडले गेले आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत असतील तर तो बौद्ध धम्माच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे . बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना मोठ करण्यात काहीही उपयोग नाही . ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण अथवा म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ ऑक्टोबर म्हणून नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत चूक आहे याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न मी करतो .

'दसरा' हा हिंदू चा सण त्याच दिवशी येतो म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा असे बरेच लोक सांगताना आढळतात पण बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करणे आवश्यक आहे . सम्राट अशोक वयाच्या २१ व्या वर्षी मगध च्या गादीवर बसला आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारत देशाचा अनभिषीज्ञ सम्राट बनला एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशावर युद्ध पुकारले , युद्धात लाखो माणसे मारली गेली , लाखो लोक जखमी झाले. हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती वाटली नाही. विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता त्याचवेळी भन्ते निग्रोध चारीकेसाठी चालले होते . बुद्धं सरणं गच्छामीचा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला . अशोक म्हणतो , या भन्ते ,आपले स्वागत असो आपण वेळेवर आलात , मला आशीर्वाद द्यावा ,मी आता सम्राट झालो . त्यावर भन्ते म्हणाले , यात तू कसला आलास सम्राट , तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस , हे सारे कशासाठी ? तृष्णेपोटीच ना ! यात जनहित मुळीच नाही . या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतो ना , हे सारे तुझ्याचमुळे झाले , असे दुष्कर्म तू केलेले आहेस .

पुढे भन्ते तथागताचा मैत्री , अहिंसा तत्वाचा उपदेश अशोकाला करतात . अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो ," मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही ,युद्ध करणार नाही ,आजपासून मी धर्मशील होणार , मी बुद्ध धम्माला शरण जाणार तेव्हा अशोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेतात . तो काळ म्हणजे इ . स . पूर्व २५४ आणि तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमीचा दिवस . तेव्हाच सम्राट अशोकाने एक जाहीरनामा आपल्या राजमुद्रेत अंकित करून दसहारा म्हणून प्रसिद्ध केला आणि पुढे अनेक वर्षे बौद्ध धम्माचे एक प्रतिक म्हणून अशोकविजयादशमी दसहारा हा उत्सव साजरा करण्यात आला . सम्राट अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले , अनेक लेण्या , स्तंभ उभारले . ८४००० स्तूप बांधले . लाखो करोडो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली .बौद्ध धम्म आचार संहितेवर आधारलेला 'दसहारा ' नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट करून अशोकविजयादशमी , दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला तो सम्राट अशोकाचा नातू बृह्दत्त उर्फ बुद्धरथ याच्या काळापर्यंत .

सम्राट अशोकाने ८४००० स्तुपासाठी अमाप पैसा खर्च केला इ . स . पूर्व २६७ ला सुरु झालेलं काम अगदी झपाट्याने इ . स . पूर्व २६५ ला पूर्ण झाले त्याचे कारण म्हणजे शहाणव्व कोटी सुवर्णमुद्रा खर्च करून हे बांधकाम पूर्ण केले . सम्राट अशोक जगातील सर्वात बलाढ्य ,संपत्तीवान राजा होता म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे ' भारत सोने कि चिडिया ' किवा ' सोन्याचा धूर भारतातून निघत होता ' असे लोक आजही अभिमानाने म्हणतात . पुढे पुष्पमित्र शुंगाने सम्राट अशोकाचा नातू सम्राट ब्रूहदत्त उर्फ बुद्धरथ चा खून करून रक्तरंजित प्रतीक्रांती करून लाखो बौध्द धर्मियांच्या , भिक्खुंच्या कत्तली केल्या . एका भिक्खूचे डोके जो आणेल त्याला १०० सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या अर्थात सम्राट अशोकाच्या वंशांची संपतीची देखील लुट केली आणि बौद्ध धम्माच्या पाडवासाठी 'दसहारा ' जो सम्राट अशोकाने धम्म उत्सव सुरु केला होता त्याला आपले विकृत रूप देऊन धम्म आचाराची जी तत्वे होती तिचा पाडाव केला म्हणून आपल्यापरीने तोच सण सूडभावनेने साजरे केले . बौद्ध धम्माच्या ज्या सांस्कृतिक बाबी लोकांना आकर्षित करणाऱ्या होत्या कि बुद्ध मूर्तीची रथयात्रा , महोत्सव ,सण , उपोसथ इ स्वीकारून त्याचे पूर्ण ब्राह्मणीकरण केले . मनु ला हाती धरून मनुस्मृतीची रचना केली , रामायण , महाभारत, भगवदगीता ,पुराणे इ . काव्ये निर्माण करून स्वतःला राम आणि मोर्य राजांना रावणासारखे दर्शवून बौद्ध धम्माला मोठा शह दिला . अनेक स्तूप ,विहारे, लेण्या बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले . काहींनी ब्राह्मणी देवस्थाने बनविली ज्यात पंढरपूर , तिरुपती , बद्रीनाथ ,जग्गनाथपुरी अशी मुळची बुद्ध विहारे बळकावून त्याचे ब्राह्मणीकरण केले .

अर्थात बाबासाहेबांनी १९५६ या वर्षात येणारी अशोकविजयादशमी अर्थात दशहारा हा अश्विन शुद्ध दशमीचा दिवस निवडून सम्राट अशोकाने तथागत बुद्धाने केलेले जगातील धम्मचक्र प्रवर्तन अनुकारून त्या दिवशी धम्मदीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तनचे अनुष्ठान केले . म्हणून आपण अशोकविजयादशमी चे ऐतिहासिक महत्व आणि धम्माचे पालन करून अनुसरण करावे . जर १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर आपले नावाला आंबेडकरी म्हणवणारे , २२ प्रतिज्ञा न पाळणारे , गणपती , दहीहंडी , नवरात्र साजरा करणारे १४ ऑक्टोंबर ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतील पण दसरा या दिवशी पुष्पमित्र शुंगाने ब्राह्मणी हिंदू परंपरेने सुरु केलेल्या सणाला आपट्याची पाने तोडत बसतील म्हणून हा मूळ आपला दशहारा अर्थात अशोक विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन साजरे करून परत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा एव्हढंच मला सांगाव वाटत .

!!! नमो बुद्धाय ……………जय भीम !!!

- प्रवीण जाधव , धम्म उपासक