
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक
" आंबेडकरी चळवळ संपली आहे ....." १ जानेवारी २००७ साली प्रकाशित झाल ,
पुस्तकाच शिर्षक हे मा .ज .वि .पवार यांनी दिलेलं असून त्यात असणारा
फुल stop नाही तर टिंब टिंब आहे . २००७ पासून हे पुस्तक न वाचता केवळ विरोधाला
विरोध म्हणून प्रत्येकजन बाळासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा हवाला देऊन केवळ टीका
विरोध आणि खालची पातळी गाठतो परंतु नेमक हे पुस्तक काय आहे आणि यामध्ये
बाळासाहेबांनी अस काय लिहिलेलं आहे हे वाचन अत्यंत महत्वाच आहे . ज्यांनी हे
पुस्तक वाचलेलं असेल त्याचं आकलन नक्कीच झालेलं असेल आणि वाचणारा हाही विचार करेल
कि बाळासाहेबांनी सांगितलेलं विचार आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच आहे म्हणून मी
मा .बाळासाहेब आंबेडकर यांची परवानगी घेऊन संपूर्ण पुस्तकाचे भाग विभाजित करून
टाकणार आहे . तरी सर्वांनी ते वाचून जरून आपली मते आणि पुस्तकातील विचारांचा
प्रसार करावा हि विनंती .
- प्रवीण
जाधव
" आंबेडकरी
चळवळ संपली आहे ...."
भाग -१
डॉ .बाबासाहेब आंबेडकरानी आपली चळवळ कशी उभी केली ;याचा शोध
घेण्याचा मी एक प्रयत्न केला . तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे
.त्यानिमित्ताने ,मी १९८० साली पुणे ,सातारा ,कोल्हापूर
,कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला .जुन्या माणसांशी बोललो .त्यांनी
बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केले ,आठवणी
सांगितल्या .बाबासाहेबांची जेंव्हा चावडीत बैठक सुरु असायची त्यावेळी अनेक
ज्ञातिबांधव मुद्दामहून चावडीत झोपण्यास येत असत .ते बाबासाहेबांना उद्देशून म्हणत
असत कि .' हा काय करणार आहे ? हा तर आमची हाडकी -हडावळी ,आमचे
बावन्न अधिकार काढायला निघालाय .' अशा परिस्थितीत डॉ .बाबासाहेब
आंबेडकरांनी जे कोणी या चळवळीला सहकार्य करतील ,त्यांना
बरोबर घेऊन आपली चळवळ पुढे नेली .याचा अर्थ असा होतो कि त्यावेळीही समाजात काही
जागरूक लोक होते ते बाबासाहेबांबरोबर आले.
जे नव्हते ,ते बाजूला थांबले .कालांतराने ज्यांनी
बाबासाहेबांना सहकार्य केल नाही तेहि चळवळीत आले .त्यावेळी ज्यांना हाडकी हाडवळ हे
सुरक्षेचे कवच वाटत होते ;तेच बाबासाहेबांच्या विरोधात उभे
राहिले .पण जेंव्हा त्यांना " हाडकी - हाडोळी " हे सुरक्षेचे कवच नाही ,तर
गुलामीची निशाणी आहे हे लक्षात आले ; त्यावेळी त्यांनी आपला पवित्र बदलला व
ते आंबेडकरी चळवळीचे वाटसरू बनले .हे या ठिकाणी सांगण्याचे कारण कि ,जी
परिस्तिती असते तिच्यात लोक बदल करण्यास तयार नसतात .अशा वेळी नवी व्यवस्था
निर्माण करण्यासंदर्भात जी सतर्कता यांच्यात हवी असते .ती तयार झालेली नसते . माझा
राजकीय जीवनातील चोवीस वर्षाचा अनुभव मला
हेच सांगतो आहे .
डॉ
.बाबासाहेब आंबेडकरांनी एक जुनी व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण केली
.त्यातून आपल्याला जे अधिकार मिळाले त्या लाभामध्येच आज आपण 'मदहोश
' आहेत . परिस्थिती बदलली आहे .या बदलत्या परिस्थितीत आपल्याला नव्याने
अधिकार मिळवावे लागतील किंवा जे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत
ते सह्बूत ठेवण्यासाठी जागरूक राहावे लागेल .या संदर्भात समाजात काही चर्चा घडते
आहे ,कृती होत आहे असे मला काही दिसत नाही .बाबासाहेबांनी जी चळवळ मोठ्या
कष्टाने उभी केली ,तिच्या प्रारंभीच्या काळाचा अभ्यास होणे ,तिची
चिकित्सा होणे मला गरजेचे वाटते . त्यामधून आज आपल्यापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत
,ती पेलून ' चळवळ टिकविण्यासाठी उपयुक्त असे ज्ञान
मिळेल .आजवर या सबंधातले संशोधात्मक लेखन कमीच झाले आहे .
चर्चेचे गांभीर्य .....
२००४ -२००५ या वर्षी लोकसभा व विधानसभा
निवडणुकीत जे मला बघायला मिळाले ,जे मी अनुभवले ' त्यावरून
आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही . ती जी काही चालेल .ती
माझ्या पिढीपुरतीच . त्यातलेसुद्धा कमिटेड कार्यकर्ते असेपर्यंत , तेव्हढ्यापुरतीच
राहील .पुढे ती चालली तर त्यामध्ये आंबेडकरी आणि स्वाभिमान विचार नसेल .विचारला
माननारा कार्यकर्ता नसेल .जो काही कार्यकर्ता आढळेल त्याची चळवळीशी विचारांशी
बांधिलकी किती राहील ,याबद्दल मला शंका आहे . त्याची बांधिलकी
चळवळीशी नसेल तर चळवळ कशी आणि कुठे राहणार आहे ? हे मी
लिहित असताना ,काही जणांना निवडणुकीच्या अपयशातून ,मी
निराशावादी झालोय आणि म्हणून मी अशी भूमिका मांडतोय ,असे
वाटण्याची शक्यता आहे . त्या सर्वाना मी सांगू इच्छितो कि ,माझ्यासारखा
कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत झोकून देतो ; तेंव्हा त्याला
हि जाणीव असतेच कि , आपल्याला सहजासहजी सत्ता मिळणार नाही
.सत्तेसंबधी त्याची भूमिका असते कि ,सत्ता
मिळाली तर ठीक . अन्यथा जे काही अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले व जी व्यवस्था
निर्माण केली ,त्या अधिकारात वाढ कशी होईल ; त्याचबरोबर
जी व्यवस्था निर्माण केली आहे ,ती सुद्रुढ कशी होईल , यासाठी
धडपड करीत राहावे .त्यामुळे चळवळीसंबंधी जी काही चर्चा मी येथे करत आहे ; ती
ती पूर्वग्रह न ठेवता गांभीर्याने लक्षात घेतली जावी अशी माझी अपेक्षा आहे . आंबेडकरी चळवळीत काम करताना याची जाणीव
ठेवणे महत्वाचे आहे कि , आपले आर्थिक ,सामाजिक
उद्धिष्ट आणि तत्वज्ञान हे असमानतेच्या विरोधात असल्यामुळे ,त्याला
प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. त्या विरोधाची धार वेगवेगळ्या काळात आणि
वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते . सत्ता मिळविणे हे प्रवाहाच्या विरोधात
पोह्न्यासारखे कठीण असते .चळवळीची हि अवस्था का झाली ? त्याची
करणे काय ? काय मिळविले
? काय गमावले ? काय मिळवून टिकवू शकलो नाही ? याचेही
थोडक्यात इथे विश्लेषण केले आहे .या विश्लेषणाची सुरुवात नामांतराच्या चळवळीपासून
करीत आहे .
नामांतर.......
१९८०
साली माझ्या राजकीय चळवळीला सुरुवात झाली .त्यावेळीची महाराष्ट्राची परीस्तीती
वेगळी होती .१९७६ साली सुरु झालेली नामांतराची चळवळ क्षीण होण्याच्या मार्गावर
होती . आंबेडकरी चळवळ पूर्णपणे 'नामांतर ' या एकच
प्रश्नावर केंद्रित झालेली होती . नामांतराच्या लढ्यात लोकांनी एकजूटता दाखविली
.हि ताकद खूप मोठी होती .त्यामध्ये चळवळीबरोबर नसणारे पण बाबासाहेबांना मानणारे
हेही सहभागी झाले होते .
हि उभी राहिलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे
कारस्थान कॉंग्रेसने आणि त्याचबरोबर कॉंग्रेसबरोबर समझोत्यात असलेल्या आर .पी .आय
. च्या नेत्यांना हाताशी धरून केले .या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी पोलिसांच्या
माध्यमातून प्रचंड दडपशाही करण्यात आली व पोलिसाकडून अमानुष अत्याचार करण्यात आले
.आंबेडकरी चळवळ मुळासकट उपटून टाकण्याचा यावेळी प्रयत्न झाला . कॉंग्रेस आणि
त्यांच्या स्थानिक नेत्यांनी दलितांच्या घरांची राख रांगोळी केली आणि महिलांची
बेअब्रू केली . शिक्षणामुळे ज्यांना नोकर्या लागल्या त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली
होती आणि त्यांना जायकवाडी धरणामुळे समृद्धी आलेली होती अशांची हि समृद्धी या
दंगलीमध्ये अक्षरशा : नष्ट करण्यात आली . दडपशाही व अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी
चळवळ आपल्या विरोधात उभी राहू नये असा डाव कॉंग्रेस ने रचला होता .कॉंग्रेस चे
नेतृत्व हे मराठा समाजाचे नेतृत्व होते .' मराठवाडा
विद्यापीठ' या नावात 'मराठा'
समाज स्वतःची अस्मिता पाहत होता .नामांतर म्हणजे मराठ्यांना संपविणे
व आपली सत्ता काढून घेणे ,असा प्रचार हित शत्रूंकडून त्या काळात
करण्यात आला .त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आंदोलन चालविले गेले .त्याचे पर्यवसान
आंबेडकरी अस्मिता विरूद्ध मराठा अस्मिता असा लढा लढविण्यात झाले .परिणामी दंगल
झाली .दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली ,जाळण्यात
आली .बहिष्कार टाकण्यात आले .कत्तली करण्यात आल्या आणि दलितांना एकांगी पाडण्यात
आल .
त्यावेळी
परिस्थिती बदलणे आणि शांतता प्रश्तापित करणे याला प्राधान्य देणे हे महत्वाचे होते
आणि ते मी केले . मराठवाड्यातील गावोगावी जाऊन भांडण मिटविणे ,सामंजस्य
निर्माण करणे ,ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या
पुनर्वसनासाठी लढणे आणी आक्रस्ताळी भाषणाची धार बोथट करणे यासारखी कामे अंगावर
घेतली .या भूमिकेमुळे माझ्याबद्दल अनेक समज - गैरसमज पसरले .मी त्याची कधीही पर्वा
केली नाही .या आंदोलनात काहींनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकामुळे (ज्या भूमिकांना मी
बेजबाबदार म्हणतो ) ,नामांतराचा हा लढा सरकारविरोधी लढा होता .तो
तसाच ठेवला गेला पाहिजे होता .त्याला पहिल्या टप्प्यात मराठविरोधी स्वरूप दिल्या
गेल आणि नंतर ते पोलीस विरोधी झाल .आंदोलनकर्ते त्यामुळे कोंडीत सापडले .याचा
फायदा मराठा नेतृत्वाने पुरेपूर उठविला ,पोलिसांचा
अत्याचार ओढवून घेतला ,याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एकप्रकारची दहशत
बसली होती .या कारणास्तव मोर्चाला यायचे म्हणजे पोलिसांचा लाठीमार खायचा .अशी भीती
लोकांमध्ये निर्माण झालेली होती .त्यामुळे नंतर नंतर लोक मोर्चाला यायचे थांबले .
मनाने ते हरले होते .अत्यचार ,मारझोड ,दडपशाहीमुळे
खचलेल्या सैन्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची गरज होती .त्यासाठी
लोकांमध्ये पुन्हा एकदा चळवळीबद्दल विश्वास निर्माण होईल असा कृतीशील कार्यक्रम
देणे आवश्यक होते .आंबेडकर चळवळीत 'मोर्चा' व सभा हे
सर्वात मोठे हत्यार राहिले आहे . ते मोडणे म्हणजे चळवळीला मोडणे होय असाच अर्थ
त्याकाळी लोक लावत होते .दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास , चळवळ
संपविण्याच्या मार्गावर घेऊन जाणे म्हणून आम्ही १९८२ साली आठ दिवसांचा long
मार्च काढला .जस जसा हा 'मार्च ' पुढे
जात राहिला तस तसा लोकात विश्वास वाढत गेला .ज्यावेळी मुंबई ला हा मोर्चा पोहोचला
.त्यावेळी लाखोंच्या संख्येने ग्रामीण जनता त्यात सहभागी झाली होती .शहरी भागातील
माणूस जो या मोर्चात होता तो वेगळाच होता . long मार्च ने
उपस्थित केलेल्या प्रश्नावरती त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली आणि तात्पुरती का
होईना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली .यातून आपले प्रश्न
मार्गी लागू शकतात हा नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला .
त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासक व पोलीस खात्याला मोठी चिंता वाटत
होती कि आंबेडकरी चळवळ चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात चळवळीतील कार्यकर्त्यावर जो
अमानुष अत्याचार झाला त्याचा परिणाम म्हणून तो नक्षलवादी चळवळीकडे वळतो कि काय अशी
चिंता एका वरच्या पातळीवर केली जात होती .हे त्यावेळी फार थोड्या जणांच्या लक्षात
आल होत .आंबेडकरी चळवळीतील कार्यकरत्यावर व चळवळीतील जनतेवर जो अमानुष अत्यचार
झाले त्याचा परिणाम म्हणून नक्षलवादाकडे वळतो कि काय हि परिस्थिती long मार्चच्या
बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना वाटत होती .या भीतीला खतपाणी घालायचे त्यांनी
ठरविले .
क्रमश :
- प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर
(साभार :-
" आंबेडकरी चळवळ संपली आहे ...." या पुस्तकातून )
आंबेडकर चळवळ संपली.... ही पुस्तिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी खूप अभ्यासपूर्ण चिंतन करून लिहली यात वादच नाही.कोण कार्यकर्ते कसे तयार करतात त्यांची उपजीविकेचे साधन काय असतात.हे चेंबूरच्या ऐक्यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याची माहिती दिली ते जवळजवळ सर्वच ठिकाणी सारखीच आहे.ते सत्य आहे.त्यामुळेच आंबेडकर चळवळी संपली असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
ReplyDeleteहे पुस्तक सध्या विकत अथवा वाचायला मिळत नाही.
ReplyDeleteआणि काही एक दोन संदर्भ देऊन वाचकांचे पुर्ण समाधान होईल असे वाटत नाही.
आणि अजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना पुस्तकाचे असे नकारात्मक टायटल देण्याची अशी का गरज वाटली??
ज्यामुळे चळवळीतल्या लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
Yes.....
Delete