Sunday, 29 December 2013

                   !!! आंबेडकरी तरुण जागृत होत आहे ...........!!!

राजकारण हे एक माध्यम असू शकते समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आणि राजकारण म्हटलं कि अनेकांच्या कपाळाला आढ्या पडतात किंवा एकप्रकारे राजकीय अस्पृश्यता निर्माण झालेली आहे त्यामुळेच कि काय राजकीय परिवर्तन करणे नेहमीच अवघड राहिलेलं आहे . सामाजिक बदलला समाज चुटकीसरशी भूमिका घेऊन स्वीकारतो तिथे राजकीय बाबतीत उदासीन राहतो . राजकीय भूमिका घेणे म्हणजे दिवस रात्र पक्षाचा कार्यकर्ता होणे असा अर्थ होत नाही किंवा आपण कोणाच्या अधिपत्याखाली जातोय हि भूमिका खूप चुकीची आहे . राजकीय भूमिका घेण्यासाठी कुण्या पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता होणेही गरजेचे नाही पण स्वतःची राजकीय भूमिका घेणे सर्वात जास्त महत्वाचे आहे . मतदानाचा मिळालेला अधिकार हा फक्त सुट्टीचा दिवस साजरा करणे आणि मौजमजा करण्यासाठी सहलीला जाणे असेल तर तो लोकशाहीस मारक ठरण्यासारख आहे . त्यामुळेच कि काय नेहमी मतदानाच प्रमाण हे सरासरी ५० % च्या आत असते . याला एकाच कारण म्हणजे राजकीय अस्पृश्यता पाळणे आणि " माझा तो भाग नव्हे " हे भूमिका घेणे . कदाचित यामुळेच प्रस्थापित मनुवादी पक्ष या देशातील बहुजन समाजाला आपल्या प्रसार माध्यमातून संमोहित करून एका निरपेक्ष विचारापासून आणि भूमिकेपासून दूर घेऊन जातो आणि बहुजन आंबेडकरी समाज याला नेहमी बळी पडतो .

आज आम्ही व इतर तरुण वर्ग राजकारणाची स्पष्ट भूमिका घेत आहोत हि नक्कीच बदलाची आणि परिवर्तनाची नांदी असेल दुसऱ्या पिढीने जी संभ्रमतेची भूमिका घेतली त्यामुळेच कि काय आंबेडकर चळवळ दिशाहीन झालेली आहे . गटा तटाच्या खाईत रिपब्लिकन चळवळ वाटली गेली किंवा स्वार्थी लोकांच्या सूळसुळाटामुळे विखुरली जरी गेली तरी संभ्रमित भूमिका घेणारी दुसरी पिढी यालाही तितकीच जबाबदार आहे . स्पष्ट राजकीय भूमिका न घेतल्यामुळे किंवा आपला आणि परका कोण हे न कळाल्यामुळे म्हणा समाज नेहमीच कॉंग्रेस सारख्या मनुवादी पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला आहे त्याला तोही तितकाच जबाबदार आहे . उदाहरण द्यायचं झाल तर महाराष्ट्रात कोणत्याही भागाच उदाहरण घ्यायचं झाल तर आंबेडकरी समाज लाखाच्या घरात असतो तिथे जरी रिपब्लिकन गट तट पक्ष ५ जरी असले तरी कोणत्याही एका पक्षाला मतदान होत का ? जरी रिपब्लिकन चळवळ विखुरलेली असली तरी १ लाखाच मतदान असलेला उदाहरणादाखल एक भाग घेतला तर तिथे ५ - १० गट जरी असले तिथे हेच एक लाख २० -२० हजार स्वरुपात आंबेडकरी पक्षांना जातात का ? तर याचे उत्तर आजीबात नाही तिथे एकाच आंबेडकरी पक्षालाही समाजाचे एकगठ्ठा मते मिळतही नाही आणि ती divide होतही नाही तिथे ५ ते १० हजाराच्या आसपास मते मिळतात तेही एकूण समाजाच्या एकूण मताच्या ६ ते ८ % च्या आसपास इतर समाज मते देईल तो भाग तर दुरची गोष्ट आहे . मग उरलेली मते कुठे जातात तर ती कॉंग्रेस किंवा तत्सम पक्षांना जातात याच कारण हेच कि राजकीय भूमिका विचारसरणीचा अभाव ,समाजाच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन निवडणुकीकाळात मोठी वाटणारी रक्कम पण जीवनाचा काहीही बदल न होणारी रक्कम दिली जाते . ६० वर्षापासून हाच प्रकार चालत आलेला आहे , आर्थिक परिस्थितीने मजबूर असलेल्या समाजाच काही क्षणासाठी समजून घेऊ शकतो पण थोडेफार आर्थिक स्थैर्य आलेला समाजही अशा गोष्टीना बळी पडताना आम्ही स्वतः बघितलेलं आहे ,हि खरच खूप मोठी शोकांतिका आहे , आंबेडकरी चळवळी साठी आणि राजकीय परिवर्तनासाठी ह्या प्रवृत्ती समाजातून काढून टाकणे महत्वाचे आहे .

आज आम्ही भारिप बहुजन महासंघ पक्षात अनेक उच्चशिक्षित तरुण येत आहेत स्पष्ट भूमिका घेत आहेत ते केवळ राजकारण करण्यासाठी नव्हे किंवा कोणाला निवडणुकीमध्ये उभेही राहायचे नाही आम्हाला केवळ आता आपल्या आंबेडकरी बहुजन लोकांना सत्तेत बसवायचं आहे हा संकल्प उराशी बांधलेला आहे हव तर आमचा हा २०१४ साठी एक contract समजला तरी चालेल पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांच्या विचारसरणीचा पक्ष म्हणून आणि आंबेडकरी प्रतिनिधी सत्तेत पाठवणे हेच आमचे आता भारिप च्या platform वरून स्वप्न आहे . इतरही पक्षात कोणी तरुण वर्ग जात असेल तर तीही एक स्पष्ट भूमिका आहे ,निदान या पिढीची तरी आणि त्याचे स्वागत केलेच पाहिजे याशिवाय आता बदल आणि परिवर्तन होणे शक्य नाही . मी तर म्हणेल आजचा तरुण जेव्हढा अभ्यासक झालेला आहे जो योग्य आणि अयोग्य हा फरक करू शकतो हा आंबेडकर चळवळीसाठी मी नेहमी म्हणतो कि हा सुवर्णकाळ आहे . समाजातील जशी संभ्रमित भूमिका जबाबदार होती तशी जेष्ठ आंबेडकरी साहित्यातील मंडळीहि तितकीच जबाबदार होती . एक कोणतीही राजकीय दिशा त्यांनी दाखवली नाही कि या सर्व गटातटाच्या झुंडीतून हाच तुमचा योग्य नेता आहे आणि सर्व समाजाचे एकरूपाने याच्या मागे राहावे मग तो नेता कोणीही असो अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे स्वतःच्या परिघाबाहेर न गेल्यामुळे तो सीमित राहिला . आज महाराष्ट्रात थोडस का होईना जे यश भारिप ने मिळवल आहे आणि मिळवत आहे आणि ते इतरांच्या तुलनेत आणि मनुवादी प्रस्थापित पक्षांच्या गर्तेत मोठ आहे . भारिप च मुठीभर यश काढून टाकल तर महाराष्ट्रात आंबेडकरी विचारसरणीच्या इतर पक्षांचही यश शून्य आहे हे विसरता येणार नाही . म्हणून स्पष्ट राजकीय भूमिका २०१४ समोर ठेवून येणाऱ्या आंबेडकरी तरुणाईच स्वागत सर्वांनी करायला हव .जर राजकीय बदलात शामिल होणाऱ्या तरुणाई च आपल्याच समविचारी लोकांनी खच्चीकरण केल तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही . कोणी भारिपचा हाती झेंडा घेतला म्हणजे तो परका ठरत नाही किंवा तो अस्पृश्य होत नाही फक्त मानसिकता बदला एक स्पष्ट राजकीय भूमिका घ्या , आम्ही हेही म्हणत नाही कि आम्हीच सर्वोत्तम आमचेच नेतृत्व माना अस आम्ही म्हणत नाही पण परिवर्तनाच्या या लढाईला निश्चित साथ द्या .

३ कोटी असलेल्या समाजामध्ये ५० % पेक्षा जास्त असणाऱ्या तरुणांनी एक स्पष्ट भूमिका घेऊन ३ कोटी लोक ८० ते ९० लोकप्रतिनिधी सत्तेत पाठवू शकतात हे लक्षात ठेवा .

" भिक नको सत्तेची .......सत्ता हवी हक्काची "

!!! जयभीम ..............नमो बुद्धाय !!!

- प्रवीण जाधव

No comments:

Post a Comment