Sunday, 29 December 2013

देवाबद्दल पूर्वी ब्राह्मण काय म्हणत असत? ते म्हणत असत कि देव अस्तित्वात आहे . तो कोठे आहे ? असे विचारल्यास ब्राह्मण म्हणत असत कि तो दिसू शकत नाही . तुम्ही जर म्हणालात कि कमीत कमी ब्राह्मणांना तरी तो दिसू शकतो का ? जर दिसत असेल तर त्याचा आकार कसा असतो . तेव्हा ते म्हणतात देवाला आकारही नसतो . जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा ते म्हणतात त्याला स्पर्श करता येत नाही . ते म्हणतात देवाला आकारही नाही . जेव्हा तुम्ही विचाराल कि मग विश्वास कसा ठेवायचा ? तेव्हा ते म्हणतात कि देव हा अदृश्य स्वरुपात आहे . या सर्व गोष्टी वाईट असतील तर ब्राह्मणांना मूर्ख का बर म्हणू नये ? त्यांना शहाणे कसे म्हणायचे ? जर देवाला कोणी पाहू शकत नसेल , स्पर्श करू शकत नसेल किंवा तशी जाणीवही नसेल तर मग ब्राह्मणांना देवाबद्दल माहिती कशी ? लोक त्यावर अंधपणाने विश्वास ठेवतात हा मूर्खपणा नव्हे काय ?

देवाच्या निर्मिकाने देवाला कुठलाही आकार नाही सांगितले , कुठले हात पाय नाही सांगितले , देव हे फक्त तत्वज्ञान आहे आणि ते सर्व जाणीवेपलीकडे आहे असे अल्वार ,नयन्मार आणि महान यांनीही सांगितले . मग आजकालच्या देवांना आकार कसा काय प्राप्त झाला ? मंदिरामध्ये मुर्त्या ठेवून त्यांना देव संबोधणे कितपत योग्य आहे ? म्हणून देव निर्माण करणारा नीच आणि मूर्ख नव्हे काय ? देवाला विशिष्ट आकार कोणी दिला ? देवाला आपण पाहू शकत नाही आणि त्याला स्पर्शहि करू शकत नाही हे जर खरे असेल तर त्याला दिवसातून सहा सहा वेळा अन्न देण्यात काय अर्थ आहे . अशा गोष्टीवर अमाप खर्च करणारी माणसे अस्तित्वात आहेत म्हणून तर हि नीच माणसे त्यांना फसवीत आहेत .

देवाला अन्न ग्रहण ग्रहण करताना कोणी पाहिलं का ? देवाला जिवंत राहण्यासाठी सहा सहा वेळा अन्न ग्रहण करण्याची गरज आहे का ? कोण व्यक्ती आहे जो देवाच्या मुखात घास भरवतो ? देव अन्न पचन करतो का ? दिवसातून एखादवेळी तरी देव शौचास जाताना कोणी पाहिलं का ? कोणी त्याला लघवी करताना पाहिलं का ?खरोखर देव जागचा हलू शकत नाही मग या नैसर्गिक विधी तो कोठे उरकतो ? या विषयावर जो काहीच विचार करीत नाही आणि विचारतही नाही त्याला महान व आस्तिक समजले जाते . देवाला कशाचीही गरज नाही हे जर खरे असेल तर ब्राह्मण देवाचे लग्न वैगेरे कशासाठी लावतात ? त्यास पत्नी व मुले कशासाठी हवीत ? एका देवाला दोन पत्न्या आहेत तर काहींना हजारो पत्न्या आहेत देवांना हजारो पत्न्यांची गरज काय ? याविषयी ते विचारही करू शकत नाही आणि उत्तरही देऊ शकत नाही . ते इथेच थांबत नाहीत तर ते दरवर्षी देवाचा लग्न समारंभ साजरा करतात . जे लोक देवाच्या लग्नास भक्तीभावाने उपस्थित राहतात ते विचारही करीत नाही आणि विचारतही नाही कि मागच्या वर्षी झालेल्या लग्नाचं काय झाल ? काय त्या देवाची पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली ? का एखाद्या आजाराने मरण पावली ? का असा एखादा कायदा आहे कि देवाचे लग्न एका वर्षासाठीच कायदेशीर ठरविले जाते ? हे प्रश्न विचारण्याची कोणाला गरज वाटते का ? दरवर्षी देवाच्या लग्नाला उपस्थित राहणारे मूर्खच आहेत .

जर देव साक्षात सदगुणांची मूर्ती असेल तर तो असा विविध स्त्रियांशी सबंध कसा काय ठेवू शकतो ? महाकाव्यात ,ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे शिव , विष्णू , कृष्ण इ . देवांनी स्त्रिया ठेवलेल्या होत्या . त्यांना अनेक बायका असूनही अशा स्त्रिया ठेवण्याची गरज का भासली ? असा प्रश्न कोणी विचारतो का ? देवाच्या वर्तनावर आणि चारित्र्यावर अनेक कथा रचल्या आहेत . त्यांचे देव नालायक व्यक्तीसारखे वर्तन करीत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे . काही देवांनी तर इतरांच्या पत्नींशी बळजबरी केल्याचे वर्णन आढळते . हे देव माणूस म्हणून घेण्यास पात्र नाहीत . अशा निर्माण केलेल्या देवांचा धिक्कारच करायला हवा .

(साभार - पेरियार रामसामी यांनी मेत्टपलायम तमिळनाडू इथे दिलेलं भाषण )

- प्रवीण जाधव

1 comment: