!!! निराश मनोवृत्ती समाजपरिवर्तन कशा करतील ? !!!
रिपब्लिकन चळवळीला ५७ वर्ष झालीत बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष राजकिय पटलावर शुन्य असला तरी सामाजिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहे हे अनेक सामाजिक चळवळीतून अनेक सामाजिक आंदोलनांची लढे करण्यात यशस्वी झाला आहे . रिपब्लिकन पक्षाने राजकीय पटलावर सुरु केलेली घौड दौड अतिशय यशस्वीपणे सुरु केली याची फळे सुरुवातीला महाराष्ट्र , उत्तरप्रदेश ,पंजाब आणि बंगाल प्रांतात यशस्वीपणे पक्ष संघटन आणि राजकीय यश सुरुवातीला या पक्षाला मिळाल अर्थात याच कारण दादासाहेब गायकवाड सारख्या नेत्याला समोर करून सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांनी तितकीच साथ दिली होती परंतु फुटीचा शाप आणि स्वार्थीवृत्तीमुळे नेत्यांनी पक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले . भैय्यासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सर्व रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आनण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले . दादासाहेबांचे आजारपनाचा काही स्वार्थी नेत्यांनी आणि कॉंग्रेस नेत्यांनी घेऊन रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्वच संपून टाकले . रा . सु . गवई नी तेंव्हापासून धरलेली कॉंग्रेसची वाट धरली ती आजवर सुटलेली नाही . अनेक वेळा नेते एकत्र आले आणि फुटले स्वार्थी हेतूनी स्वतःचे पोट समाजाच्या पोटापेक्षा मोठे समजणारे नेते कधी याच्या दावणीला कधी त्याच्या दावणीला दिसले .
जेव्हा जेव्हा कॉंग्रस अडचणीत येते सत्ता हातातून निसटू लागते तेव्हा कॉंग्रेस धार्जिण्या रिपब्लिकन नेत्यांना हाताशी धरून रिपब्लिकन ऐक्याची बोंब इथल्या कॉंग्रेस कडून उठवली जाते ८० च्या काळात प्रकाश आंबेडकरांचा उदय त्या वेळी तुकड्या तुकड्या मध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीला भारिप अर्थात भारतीय रिपब्लिकन पक्ष या माध्यमातून एकत्र आणण्यात यशस्वी होत होते . त्या नंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाने लढविलेली निवडणूक पक्षाचे नवीन तरुण मंडळी निवडून आली नाही पण राजकीय पटलावर आपला ठसा आणि घेतलेली मते लक्षणीय ठरली . अर्थात हि वाटचाल फक्त प्रकाश आंबेडकरांची एकट्याची नव्हती तर संपूर्ण आंबेडकरी समाज एकोप्याने आणि स्वाभिमानाने पुढे जात होती . राजकीय परिवर्तनाची ती नांदी होती पण पुढे कॉंग्रेस ने चळवळ जेव्हा हवी असेल तेव्हा काही स्वार्थी लोकांना हाताशी धरून रिपब्लिकन चळवळीला खिंडार पाडले . जेव्हा कॉंग्रेस अडचणीत आली तेव्हा ९ शेंबड्या पोरांना उपोषणाला बसवून रिपब्लिकन ऐक्य हे गोंडस नाव देऊन , प्रकाश आंबेडकरांनी मजबूत केलेली रिपब्लिकन चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम केले . ऐक्यामुळे इतर कोणाचे नाही पण प्रकाश आंबेडकरानी सुरु केलेल्या स्वाभिमानी चळवळीचे राजकीय पटलावर मोठे नुकसान झाले . प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात समाज आगेकूच करीत असताना रामदास आठवले रिडल्स असो वा इतर आंदोलने असो प्रकाश आंबेडकरासोबत होते . पण आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन आणि आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करणारा 'शरद पवार ' याने रामदास आठवले ला फोडून रामदास आठवले सारख्या नेत्याला हाताशी धरून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आगेकूच करणारी आंबेडकरी चळवळ आणि प्रकाश आंबेडकराना शह देण्याचा प्रयत्न केला . रामदास आठवले लाचारीने शरद पवार सोबत २० वर्ष राहून रिपब्लिकन चळवळ राजकीय पटलावर शुन्य करून टाकली .आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा दुश्मन शरद पवार पासून फारकत घेऊन शरद पवाराच मित्र आणि आंबेडकरी चळवळीचा महादुश्मन असलेल्या बाळ ठाकरे चरणी लीन होऊन आज सत्तेचा तुकड्यासाठी कधी उद्धव ठाकरे तर कधी गोपीनाथ मुंडे ला 'जोहार माय बाप जोहार' करताना दिसत आहेत आणि तिकडून काही हाती मिळत नाही हे दिसत असताना पडद्यामागून प्रकाश आंबेडकराना 'ऐक्याचे ' साकडे घालताना दिसत आहेत . इतर गटाचे नेते शांत बसून येणाऱ्या तुकड्याची वाट पाहत आहेत . इथे खरोखरच समाजाने आणि आंबेडकरी तरुणांनी स्वतः तटस्त राहून शिव्या हाकण्याचा जो कार्यक्रम फेसबुक वरून चालतो तो थांबवून निदान आपल्या भागात समाजाला जागृत करून खऱ्या रिपब्लिकन चळवळीला मजबूत कराव .
आज बरेच निराशावादी लोक हे रिपब्लिकन चळवळीला हे व्हायला हव होत हे करयला हव होत , आपण एव्हढे निराश झालो का ? घरात बसून समाजपरिवर्तानाच्या गप्पा करणाऱ्यांनी बाबासाहेबांच्या वारसाएव्हढे कर्तुत्व बजावले आहे का ? किंवा समाज परिवर्तनाच्या गोष्टी करून जे वास्तव आहे , जे प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचाराने आंबेडकर घराणे काम करत आहे त्यांना शह देण्याचे प्रयत्न पडद्याआडून होत आहेत . रिपब्लिकन चळवळीला अपयश आले आहे आणि आम्हीच ती उभारू आमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही ? चळवळीला नेताच राहिला नाही अशा वल्गना करणाऱ्यांनी उद्याच नवीन दुकान उघडण्याचे कंत्राट स्वतःकडे आहे आणि आम्हिच याचे वाली आणि आम्हीच या चळवळीचे प्रेषित आहोत हि भूमिका घेतात . बाबासाहेबांच्या विचारांनी बहुजन शेतकरी , शेतमजूर ,कष्टकरी , कामगार या लोकांना सोबत घेऊन तिसरी आघाडी उभी करण्यात बाळासाहेब आंबेडकर यशस्वी होत आहेत तर ती एक उल्लेखनीय आणि अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल . या वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी जेव्हढे सामाजिक मुद्दे ,लढे , सभा इतर कोणी नेत्यांनी घेतले किंवा लढले नाही . एव्हढे सारे कर्तुत्व असताना समाजात नेता नाही म्हणणारे आणि गढुळ वातावरण निर्माण करणारे स्वयंघोषित फेसबुकी विचारवंत चळवळीचे खरे मारक आहेत .
आज रिपब्लिकन चळवळीत बाळासाहेब आंबेडकराइतका प्रगल्भ , अभ्यासू नेता नाही , अन्य नेते कुठे असतात त्यांना माहिती पण निवडणुकीची तुतारी वाजायला लागली कि अनेक स्वयघोषित नेते ऐक्याची हाक देताना दिसतात . एखादा भिकारी भिक मागून थकेल पण रामदास आठवले अजिबात थकत नाहीत , उद्धव ठाकरे ची भेट होत नाही हे हेरून लक्ष्मीपूजनाच्या शुभेछ्यांच्या नावाखाली एका राज्यसभेच्या जागेची मागणी करून लाचार शब्दालाही लाज वाटेल इतका लाचारपणा चालवलेला आहे त्यांचा संसार त्यांना लखलाभ असो पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक चळवळ चालविणाऱ्या बाबासाहेबांच्या रक्ताला बदनाम आणि शह देणाऱ्या लोकांची निराशावादीवृत्ती हि तुमच्या स्वतःची आहे समाजाची नाही . आज चळवळ सक्षमपणे अभ्यासूपणे पाहले असता बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेता आजवर चालवत आहेत , अकोला ,औरंगाबाद ,चंद्रपूर , नागपूर सहित अनेक ठिकाणी स्वबळावर लोकप्रतिनिधी बाळासाहेबांनी निवडून आणलेत , इतरांच काय ? कवाडेचे काय अस्तित्व ? गवई कुठे आहेत ? आठवले स्वबळावर लढले का ? समाजाने नेत्यांचा विचार करायचा कि ३ कोटीच्यावर असलेल्या समाजाचा विचार करायचा . चळवळीला बाबासाहेबांच्या रक्ताचा नेता आहे तो कधीच सांगत नाही कि मी तुमचा नेता नाही पण कृतीतून कार्य करणाऱ्या नेत्याची ओळख होते . रिपब्लिकन पक्षाचे तीन तेरा वाजविणारे आणि निराशावादी फेस्बुकी विचारवंत फक्त ऐक्याच्या आडून आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करतात , स्वतःचे कर्तुत्व अस्तित्व ? ओळखून समाजात दुही आणि संभ्रम निर्माण करणारे लोक समाजाच्या भविष्याच्या विचार न करता , इथल्या प्रस्थपित व्यवस्थेवर न बोलता फक्त आंबेडकर द्वेष निर्माण करून, जो पुढे जात आहे त्याचे पाय ओढण्याचे काम करतात .
स्वतः किती परिवर्तन करू शकतो याची ग्वाही देण्याइतपत आपण मोठे नाही आहोत , जे वास्तव आहे , ज्यामागे समाजमानस आहे त्याला नाकारून आणि निराशावादी वृत्ती समाजात पसरवून समाजाचे परिवर्तन कधी होत नसते .
!!! जयभीम ...... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

No comments:
Post a Comment