Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 2

व्ही .पि . सिंहानी दिलेली मंत्रीपदाची ऑफर नाकारून आंबेडकरी हिताच्याच गोष्टी कि ज्यात मंडल आयोगानुसार नवबौद्ध आणि बौद्धांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश , बाबासाहेबांचे संसदेमध्ये तैलचित्र , भारतरत्न , टपालाच्या तिकिटावर आणि त्या नंतर बाबासाहेबांना नोटेवर पण आणायचा प्रयत्न होता परंतु भाजपने मंडल विरुद्ध कमंडल केल्यामुळे सरकारचा पाठींबा काढला , त्यानंतर राजीव गांधीचे सरकार आले राजीव गांधीनीही बाळासाहेब आंबेडकराना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले ,परंतु कॉंग्रेस च्या या दाव्यापुढे बाळासाहेब नमले नाहीत यामुळे आंबेडकरी चळवळ दाबली जाण्याची भीती होती ,त्यामुळे समाजहिताच्या गोष्टी लक्षात घेऊन मंत्रीपदावर २ वेळा लाथ मारनाराच समाजाचा खरा नायक होऊ शकतो आणि असायलाच हवा .इतर नेते समाजाच्या प्रश्नापेक्षा ,कोणाला धम्म न स्वीकारता जातीपातीच राजकारण करून पंतप्रधान व्हायचं आहे कोणाला एकही आमदार न आणता उपमुख्यमंत्री व्हायचं आहे ....................... कोणी पंतप्रधान होऊन जर विशिष्ट धर्माने भारताला त्या धर्माचे अनुयाही अधिकारशाहीने जर झाले असते तर मनमोहन सिंगानीही देश शिखमय केला असता .

प्रकाश आंबेडकरांचे वक्तृत्व आणि विद्वत्ता अतिशय उच्च दर्जाची राहिलेली आहे , बाबासाहेबांच्या आवाजांच्या जुन्या रेकॉर्ड्स चेक केल्यास आवाजातील साम्य आढळून येते, अनुवांशिक गुणांचे हे द्योतक म्हणावे लागेल तशाच दर्जाच इंग्रजी बोलण्यात बाळासाहेब सक्षम आहेत याचा अनेकवेळा प्रत्यय संसदेमध्ये ,दूरदर्शन आणि भारतात अनेक ठिकाणी विद्यापीठामध्ये इंग्रजी व्याखानावरून लक्षात येते इतर नेत्यापेक्षा इंग्रजी बोलण्यात सरस आहे हे मात्र नक्की .

असाच एक प्रसंग ३० ऑगस्ट २००१ मध्ये डरबन , दक्षिण आफ्रिका मध्ये भारतातील १२५ खासदाराचे नेतृत्व करताना आला . संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन त्यावेळी भरले होते त्या अधिवेशनात बोलताना आफ्रिकेमध्ये काळा गोरा हा वंशवाद या धर्तीवर भारतात होणारा जातिवाद हा खूप मोठा आहे आणि यालासुद्धा संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्याव पण तत्कालीन अध्यक्ष कोफी अन्नान यांनी नकार दिला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात होणाऱ्या जातीय अन्याय अत्याचाराची नोंद घेतली गेली याचे श्रेय प्रकाश आंबेडकराना जाते हे विरोधक आणि मनुवादी पक्षही त्यांच्या असणाऱ्या अफाट विद्वत्तेला मानतात .
प्रकाश आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या कुटुंबावर आरोप करणारे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हल्ला करतात पण बाळासाहेब आपल्या कर्तुत्वाने आणि विद्वत्तेने त्याला उत्तर देतात , त्यांना ब्राह्मणकन्येशी विवाह केला म्हणून काही लोक विरोध करून आंबेडकरी घराण्यातील स्त्रीबद्दल वाईट बोलतात ,पण बाबासाहेबाच्या विचारानुसारच जाती अंतचाच हा भाग आहे , आणि इथे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे सांगता येईल कि बाळासाहेबांच्या पत्नी अंजलीताई मायदेव - आंबेडकर ह्या कुणी रूढीवादी ब्राह्मणकन्या नव्हेत तर बाबासाहेबांचे आवडते शिक्षक आणि बाबासाहेबांना घडविण्यात आणि तथागत गौतम बुद्धांचे पुस्तक भेट देणारे केळुस्कर गुरुजी यांच्या ह्या नात मग काही नालायक लोकाकडून असले नीच पातळीवरचे आरोप सुपारी घेऊन बदनामीकारक आहे , त्यांच्या मुलाची मुंज केली असाही आरोप करण्यात येतो आरोप करणारे तिथे जेवायला गेले असतील तर त्यांनी सिद्ध करून द्याव पण बाबासाहेबांच्या कुटुंबीयावर असले आरोप गद्दारपणाचे लक्षण आहे हे लक्षात घ्याव . बाबासाहेब जिवंत असते तर रडाले असते ,म्हणाले असते माझ्यानंतर माझ्या कुटुंबाने जे जे होईल ते केले , माझे अख्ख कुटुंब मी समाजाला अर्पण केले पण तुम्ही गद्दार निघालात अस मला ,माझ्या कुटुंबाला तुमच्याकडून त्रास होतो ,मी तुमच्यासाठी काहीच नसत केल तर योग्य झाल असत .

परंतु आजही बाळासाहेबाबद्दल समाजात खूप आदर आहे आणि तो त्यांनी सार्थही करून दाखविला , समाजाने आता एक पक्ष आणि एकच नेता ठरवून खरी आंबेडकरी चळवळ जपावी …………. जयभीम 

No comments:

Post a Comment