Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 3

आपल्या कुटुंबावर होणाऱ्या सततच्या आरोपामुळे बाळासाहेब कधीच डगमगले नाहीत ,बाबासाहेबानंतर भैय्यासाहेब , मीराताई आंबेडकर यांनी समाजासाठी धम्मकार्यात वाहून दिले , बाबासाहेबांच्या महापरीनीर्वाणानंतर बौद्धांची संख्या ०. ७ वरून ५ -६ टक्क्यावर आली याचे श्रेय भैय्यासाहेब नंतर मीराताईना जाते हे नक्की भैय्यासाहेबांच्या निधनानंतर मीराताईनी यशस्वीपणे धम्मकार्य सुरु ठेवून उतारवयातही संपूर्ण भारतात अविश्रांत धम्मासाठी फिरतात हे नवल आहे आणि तितकीच मोलाची साथ बाळासाहेब आंबेडकर देत आहेत याच समाजान जाण ठेवण गरजेचे आहे .

बाळासाहेबांची भूमिका नेहमी बहुजन वर्गाला ग्राह्य धरूनच राहिलेली आहे मंडल आयोगापासून सुरु झालेला लढा ओबीसी साठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला , स्वताला ओबीसी म्हणवणारे नेते छगन भूजबळ , गोपीनाथ मुंडे आपापल्या पक्ष श्रेष्टीच्या भीतीमुळे सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यास घाबरले पण तिथेही बाळासाहेबांनी अंगावर कोट चढवून ओबीसींना न्याय हक्क मिळवून दिला , स्वता चळवळीला स्वताचे नेतृत्व करून त्याचे श्रेय किवा कुठली लालसा ठेवली नाही . राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत तोफ डागली , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच १५ ऑगस्ट अर्थात स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत नाहीत म्हणून कार्यकर्त्यासह त्यांच्या मुख्यालयात जाऊन तिरंगा झेंडा फडकविला त्याचे स्पष्टीकरण प्रमोद महाजनांना द्यावे लागले . दरम्यानच्या काळात ९५ ला उत्तर प्रदेशात निवडणुकीमध्ये भारिप ने आपले बरेच उमेदवार उभे केले होते आणि विशेष बाब म्हणजे यातील बऱ्याच उमेदवारांना २० हजार पेक्षा जास्त मते मिळाली होती पण मानुवाद्याना त्याचा फायदा होईल आणि बसपा चे नुकसान होईल म्हणून चळवळीची बांधिलकी म्हणून तिकडचे पक्ष कार्य बंद केले परंतु इकडील बसपाचे लोक हे विसरून बाळासाहेबावर बदनाम करण्याचे काम करतात .

२ ० ०० च्या काळात भारिप ने स्वबळावर सत्ता मिळविण्याचे कार्य केलेले आहे ,काहीना मंत्री मग ते कोळी समाजाचे दशरथ भांडे , रामदास बोडखे यांना केले , भारिप चे ३ आमदार , खणन विकास महामंडळाचे अध्यक्ष नागपूरचे रणजीत मेश्राम यांना केले परंतु जातीवादी विलासराव देशमुख यांनी शरद पवारांचा पाढा गिरवत आंबेडकरी चळवळ दाबण्याचे काम केले सरकार अल्पमतात आले असताना या आमदार आणि मंत्र्यांना बंगलोर ला पळवून नेले , भारिप चे खच्चीकरण इथल्या मनुवाद्यांनी केली , तरीही काही प्रमाणात का होईना भारिप ने स्वाभिमानीपणे सत्ता हातामध्ये टिकवली , कासार समाजाच्या स्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासात जिल्हापरिषदेचे अध्यक्ष बनविले , मनसे सारखा पक्ष मिडिया कडून महानगरपालिकेला प्रमोट केला गेला तिथे एका बौद्ध स्त्री ने अकोल्याचे महापौर व्हाव हे दाबल्या गेल . बाळासाहेबांनी स्वतः लोभापासून दूर राहून अनेकांना मोठ केल पण अनेक जन बेईमान झाल्याचे दिसतात , व्यक्तीवादाला बाळासाहेबांनी कधीच महत्व दिल नाही समाजासाठी तडजोड केली नाही , ते म्हणतात " लोक येतील आणि जातील लोकांपेक्षा चळवळ टिकणे खूप महत्वाच आहे ". जे गेले त्याचं अस्तित्वच संपल हे आपल्या समोरील उदाहरण आहे .

बाळासाहेबांनी ज्यांना मोठ केल त्यामध्ये नीलमताई गोऱ्हे ,चंद्रकांत हंडोरे , मखराम पवार ,भीमराव केराम ,रामदास बोडखे ,भांडे ,सूर्यवंशी , हनुमंत उपरे असे कितीतरी उदाहरणे देता येतील पण व्यक्तीपेक्षा आंबेडकरी चळवळ महत्वाची आहे व्यक्ती येतील आणि जातील पण चळवळ आणि समाजकारण महत्वाच आहे . बाळासाहेबांनी अनेक महत्वाची प्रश्नांना हात घालून लढा दिलेला आहे यात Enron चा प्रश्न असो कि वेगळ्या विदर्भाचा प्रश्न असो कि विदर्भातील कापसाचा प्रश्न ,शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाबतीतही पंतप्रधान आणि सोनिया गांधीनाही कोर्टात खेचणारे एकमेव नेते , डाऊ कंपनीचा लढा आसो वा लावासा प्रश्न कि मुस्लीमासाठी सच्चर आयोग असो विविध प्रश्न हाताळून योग्य लढा दिला .
समाजाने स्वताच चळवळीचे नेतृत्व करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करून बाळासाहेबांच्या मागे उभे राहावे अन्यथा ६० वर्षापासून चाललेली परिस्थिती कायम ठेवून इथल्या मनुवाद्याचे गुलाम बनून राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . प्रत्येक नेत्याची मीमांसा करून एकच नेता आणि पक्ष स्वीकारून आपला स्वाभिमान जपावा हे या निमित्ताने सांगावयास वाटते …………………… जयभीम (क्रमश 

No comments:

Post a Comment