आजच्या २१ व्या शतकात जागतिगीकिकरणाचा जेव्हढा फायदा झाला अर्थात तेव्हढंच इथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना नुकसान झाल आहे पण आपणही व्यक्तिगत निर्णय घ्यावा कि जागतिगीकरणात (Globalization ) मध्ये किती राहायचं आणि किती नाही . अर्थात आज रुपयाची किंमत घसरत आहे .डॉलरला ज्यादा भाव आहे ,मी IT क्षेत्रात असल्यामुळे अमेरिकेमधून येणाऱ्या कामाचा IT क्षेत्राला फायदा होईल परंतु इथला माझा तळागाळातील माझा समाज यात भरडला जाईल. जर रुपयाची पत घसरली तर देशांतर्गत किंमती वाढून पेट्रोल ,डीझेल चे भाव वाढून सर्व उत्पादनावर परिणाम होऊन देशात महागाई वाढते म्हणून रुपया कसा मजबूत करता येईल हे आपण बघूया . या आर्थिक स्थितीला जर कोणी पंतप्रधानाला दोष देत असेल तर तो पूर्णता: मूर्खपणा होईल आपल्या सर्वांच्या हातात आहे आपली आणि देशाची आर्थिक बाजू आपण कशी मजबूत करतो ते .
१९७० मध्ये १ $ (डॉलर ) = ४ रुपये होती . आजच्या घडीला डॉलरचा भाव ६७ -६८ रुपयाच्या पार होतांना दिसत आहे . डॉलर हा अधिक मजबूत तर रुपया अधिक कमजोर होत आहे . जागतीगीकरणात सरकारचे हात बांधले असतील कारण त्यात परकीय गुंतुवणूक आहे परंतु आपले हात मोकळे आहेत ,आपण हे बदलवू शकतो ते कसे बघा .
१ ) पेट्रोल ,डीझेल चा काटकसरीने वापर करणे , स्वतःचे पोट भरणारे नायक , चित्रपट निर्माते यावर पैसे उधळू नका .
२ ) थंड शीतपेय ७० - ८० पैशात निर्माण होतात पण आता १५ ते २० रु . ते विकतात असे पेय पिण्याचे टाळा त्याऐवजी निंबू ज्यूस , लस्सी असे देशी पेय प्या .
३ ) साबण - lux,lifebuoy,rexona,liril,dove,pears,hamam,lesancy,camay,palmotive यांच्याऐवजी स्वदेशी cinthol,santoor,medimix, neem असे साबण वापरावे .
४ ) टूथपेस्ट - colgate,close up,pepsodent,cibaca यांच्याऐवजी स्वदेशी Neem, babool, vicco, dabur, promise असे
टूथपेस्ट वापरावे .
५ ) टूथब्रश - colgate, close up, oral-b,pepsodent,forhans यांच्याऐवजी स्वदेशी prudent,ajanta,promise वापरावे .
६ ) शेविंग क्रीम - palmotive,old spice,gillete यांच्याऐवजी स्वदेशी godrej ,emami, vjohn वापरावे .
७ ) ब्लेड - seven-o-clock,365,gillete यांच्याऐवजी स्वदेशी supermax,topaz,laser,ashoka वापरावे .
८ ) टाल्कम पावडर - ponds,old spice,johnson,shower to shower यांच्याऐवजी स्वदेशी santoor,gokul,cinthol,boroplus वापरावे .
९ ) मिल्क पावडर - anikspray,milkana, everyday milk, milkmaid यांच्याऐवजी स्वदेशी indiana,amul,amulya' verka वापरावे अर्थात जे लोक दुधाऐवजी पावडर वापरतात त्यांनी .
१० ) शाम्पू - halo, all clear,nyle sunsilk,head and shoulders, pantene यांच्याऐवजी स्वदेशी Nirma, Velvette इत्यादी वापरावे .
११ ) मोबईल कनेक्शन - vodafone, docomo इ . ऐवजी स्वदेशी bsnl,airtel,reliance वापरावे .
१२ ) बाहेरील जेवण - macdonld, subway, pizza hut, kfc ऐवजी स्थानिक उपहार गृह ,हॉटेल मध्ये जेवावे अर्थात सामान्य लोक macdonld, subway, pizza hut, kfc कडे जात नाही पण मध्यमवर्गीय लोकांनी ते टाळावे .
१३ ) मोबईल फोन - samsung,apple, htc, sony, nokia ऐवजी देशी बनावटीचे फोन अर्थात micromax, karbonn,virgin इ . वापरावे .
१४ ) टु व्हीलर गाडी - honda, yamaha यासारख्या विदेशी गाड्याऐवजी hero, royal enfield सारख्या देशी बनावटीच्या गाड्या घ्याव्या .
१५ ) फुटवेयर - nike, reebok,adidas,converse ऐवजी स्वदेशी bata, chavda इ देशी पायातले चप्पल, बूट इ वापरावे .
१६) जीन्स आणि शर्टस - lee,levi's,U.s. Polo, pepe, benetton ऐवजी स्वदेशी spykar, k-lounge वापरावे .
१७ ) घड्याळ - tommy, Citizen,zodiac,tissot ऐवजी स्वदेशी titan, sonata ,fasttrack अशा घड्याळ वापराव्यात .
असे अनेक उत्पादने आपण स्वदेशी वापरून देशाची आर्थिक पत सुधारून आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेली रुपयाची किंमत परत आणू शकतो . Hindustan Liver किंवा Uniliver यांचीही उत्पादने टाळावीत कारण याही परकीय कंपन्या आहेत . हा दोष पंतप्रधान किवा सरकारचा नाहीये तो दोष आपला आहे . स्वतःमध्ये अनेक गोष्टी तपासून पहा आणि देशाचा स्वाभिमान परत मिळवा .
!!! जय भीम .............. नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव ,संचालक, एपीएस इन्फोटेक,पुणे
No comments:
Post a Comment