Monday, 9 September 2013

प्रकाश आंबेडकर - 4

एक डोळस संपूर्ण आभ्यासून पहले असता बाळासाहेबांची भूमिका हि आंबडेकरी चळवळीला अनुसरून राहिलेली आहे याचा अभ्यास सर्वांनी करावा अगदी रिपब्लिकन ऐक्यापासून ते आजवर , मुळात रिपब्लिकन ऐक्य आणि ते तुटण आजवर चालत आलेली रिपब्लिकन चळवळीचा अभ्यास प्रत्येकाने करून प्रत्येक नेत्याची चाचपणी केल्यास प्रकाश आंबेडकर त्यात पास होतात हि वस्तुस्थिती आहे . इतर नेते कितीवेळा एकत्र आलेत आणि प्रकाश आंबेडकर नाहीत मग काय झाल याचा एकाच अर्थ आहे कि इतर एकत्र येउन काहीच होऊ नाही कारण जी महाराष्ट्रात मोठी ताकद आणि इतर समाजाकडूनही त्यांना पाठींबा आहे हा सर्वात मोठा प्लस point आहे .ऐक्य झाले तेव्हा काय बदल होतो तो बाळासाहेबांनी पक्षाचा कुशल प्रशासक बनून पक्षाला राजकीय मान्यतेपर्यंत पोहचवल होत हा इतिहास आहे . ऐक्यानन्तर युती करायला आलेल्या शरद पवारालाही २ तास दाराजवळ वाट पाहायला लावून विचारांती युती करून त्याचे फलित म्हणून ४ खासदार निवडून आले होते हा इतिहास आहे पण आपली दुकानदारी चालत नाही हा माणूस पक्ष वाढवतो पक्षाला ओबीसी व इतर समाज जोडत आहे पक्षाची आणि चळवळीची खरेदी विक्री आपल्याला करता येणार नाही म्हणून हा माणूस अडसर होतो म्हणून गवई नि त्या काळात पक्षातून हकालपट्टी करून ऐक्य तोडण्यास मोठा रोल प्ले केलेला होता आणि त्याला रामदास आठवले नि सहमती दाखवली होती हेही तितकच खर आहे पुराव्यासहित पहावयाचे असल्यास संजय मून यांनी त्यावेळेला "रिपब्लिकन ऐक्याचे मारेकरी " हे पुस्तक ऐक्याचे ढोल वाजवणार्यानी जरूर वाचावे आणि ऐक्यासामधी तथ्य जाणून आणि नीट अभ्यास करून बोलायला हव . ज्यांच्यासोबत पुन्हा ऐक्य करावयाचे त्यांचे अस्तित्व आणि चळवळीला विकण्याचे काम आणि मागील अनुभव पाहता बाळासाहेब त्यांच्यासोबत जात नाही हा त्यांचा "अहंकार " नाही तर तो त्यांचा स्वाभिमान आहे आजोबांच्या विचाराना नातू तरी फाटा देऊ शकत नाही.

राहला प्रश्न अकोल्याचा तर बहुजनांना सोबत घेऊन सत्ता कशी मिळवावी हे अकोला आणि किनवट ने बहुजनांना दाखवून दिले नुसते ते अकोल्यात नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात राबत असतात आणि भारिप म्हणजेच भारतीय रिपब्लिकन पक्ष याला बहुजन महासंघाची जोड लावलेली आहे त्यामुळे इतरासारखे रिपब्लिकन पक्ष नावागोदर किवा नंतर कंसात लिहिलेलं आढळत नाही . नागपुरात नगरसेवक ,अमरावती ,औरंगाबाद ,परभणी , नांदेड ,बुलढाणा ,बीड अशा अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केलेली आहे त्यात १ महापौर ,३ आमदार ,जि . प . अध्यक्ष , कुणी नगर सेवक ,कुणी जि . प . सदस्य ,कुणी प . स . सदस्य ,अनेक पंचायत समित्या आणि नगरपालिका ताब्यात आहे तेही स्वबळावर मग बाळासाहेब हि जी स्वाभिमानाची चळवळ एकट्याने चालवत आहे तर मग ते खूप चुकत आहेत ? मुंबई मध्ये आठवले नि युती करून १ नगर सेवक आणला तिथे बाळासाहेबांनी स्वबळावर १ नगरसेवक निवडून आणला . मग आपल्या सर्वांची हि जबाबदारी नाही का कि इतर नेत्याची हि चाचपणी करायला हवी इतर नेत्याची राजकीय ताकद काय कि त्यांना नेते म्हणून विनाकारण स्वीकाराव ?

परत एकदा इतिहासात डोकावलं तर शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेनी गाठली होती ,मुंबई मध्ये दहशतीच वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने केली होती ,त्याच काळात मागासवर्गीयावरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी दलित panther ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्राश्यांच्या विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली,त्यानंतर ठाकरेनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले. या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झालीत. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाई ची हत्त्या घडवून आणली . इथवर ते थांबले नाही १९७४ ला दलित panther नेता भागवत जाधव यांचा खून केला आणि आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत निर्माण केली त्यानंतरही विदर्भात दलितावर हल्ले सुरूच ठेवले , कधी दक्षिण भारतीय ,कधी शीख , कधी मुस्लिम तर आंबेडकरी जनतेवर या नराधमानी हल्ले सुरूच ठेवले हा सगळ्या माजामागे कॉंग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली , त्यानंतर “Riddles in Hinduism”. हे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये यात हिंदू देव देवतांचा अपमान आहे हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेनी घेतली होती . त्या वेळी जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध शिवसेना अस राहील होत , जानेवारी १९८८ ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन जमवल " ज्याच खर रक्त हिंदूच असेल त्यांनी या मोर्चात याव" , या मोर्चात बाबासाहेबावर अभद्र शब्दात बोलल्या गेल , त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्यापेक्षा या नराधमाने अकलेचे तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले अशा प्रकारचे वक्त्यव्ये करून आंबेडकरी समजला चिथावले . याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृवात मंत्रालयावर मोर्चा काढला आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आपल्या आंबेडकरी तरुणाकडून नासधूस झाली , दुसऱ्या दिवशी आताचे नकली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरेच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक विधी करून शुद्ध करून मनुवादी विचारसरणीचा परिचय करून दिला . पुढे मंडल आयोगाचा लढा सुरु झाला प्रकाश आंबेडकरानी व्ही. पी . सिंगच्या मदतीने लढून यशस्वी केला ,त्याच काळात छगन भुजबळ ला स्वताची जाणीव होऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र केला .

इथवरच बाळ ठाकरे आणि आणि त्याच्या सेनेने थांबले नाहीत तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास विरोध केला , मराठा आणि दलित वाद निर्माण करून १४ वर्षे दलितावर अत्याचार सुरु ठेवला , या काळात बाबासाहेबावर चिखलफेक करण्याचे काम बाळ ठाकरे ने केले , 'बाबासाहेब निजामाचे हस्तक' ,'ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ' , महारानी आमच्या नोकऱ्या पळवल्या अशाप्रकारची विधाने केली तितकीच चिथावणीला साथ राज ठाकरे ने दिली. मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता , हे सध्या मनसे मध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे , अखेर नामांतर न होता नामविस्तार झाला तत्कालीन शरद पवार सरकारचे असलेले मंत्री रामदास आठवले यांनी समझोता करून या वादावर पडता टाकण्यास मदद केली परंतु नांदेड विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असे नामकरण केले पण मराठवाडा विद्यापीठासमोर बाबासाहेबांचे नाव लावून नामविस्तार केला . या लढ्यात पोचीराम कांबळे ,गौतम वाघमारे यांना हुतात्म आले परत यांचीच टिंगल म्हणून बाळ ठाकरे ने गौतम वाघमारे ना बेवडा संबोधून आणखी ठिणगी टाकली अनेक लोकांचे प्राण गेले घरे गेली , या सर्वाना कारणीभूत बाळ ठाकरे आणि कॉंग्रेस जबाबदार होती . अलीकडेच बाळ ठाकरे ने मरण्यापूर्वी एका tv मुलाखतीत एक मोठा खुलासा केला कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहित नसेल पण मराठवाडा विद्यापीठाची settlement करण्यासाठी रा . सु . गवई ना जेवण्यासाठी बोलावलं आणि विद्यापीठाचे नामांतर न करता हा नामविस्तार करू त्यावर जेवताना रा . सु . गवई लगेच तयार झाले पुढे काय झाल आपल्यालाच माहिती आहे आणि मी कधी नामांतराला विरोध नाहीच केला हि भूमिका बाळ ठाकरे ने मांडली . या वरून काय सिद्ध होते ,आंबेडकरी नेत्याची हि लाचारी कि स्वाभिमानी वृत्ती यावर समाजच अधिक विचार करू शकतो या निमित्ताने सांगावे वाटते .

वर थोडक्यात उल्लेखलेल्या बाळ ठाकरे आणि त्यांच्या सेनेने केलेली दुष्कृत्ये आंबेडकरी समाजातील लहान मुल पण समर्थन करणार नाही पण आपले माजी panthar रामदास आठवले ,बाळ ठाकरेंना जावून मिळाले , ते सर्व विसरू शकतील पण जातीयवादी बाळ ठाकरे आणि शिवसेनेला हा आंबेडकरी समाज माफ नाही करू शकणार . रामदास आठवले एव्हड्यावर च नाही थांबले तर बाल ठाकरे च्या निधनानंतर अंतयात्रेमध्ये बाळ ठाकरेच्या शवासोबत ट्रक मध्ये चढलेले दिसले राज ठाकरे एकीकडे पायी चालताना दिसले तर आठवले साहेब ट्रकवर चढून आंबेडकरी वारसदार कि ठाकरे वारसदार हे आम्हा आंबेडकरी जनतेला कळाले नाही ,नामदेव ढसाळ तर आम्ही अगोदरच बाळ ठाकरेच्या चरणी नतमस्तक होताना पाहिलेले आहेत . या अंतविधीला आठवले सोबत , बाळ ठाकरेंना आव्हान देणारे आणि शिव्या देणारे झुंजार नेते जोगेंद्र कवाडे सर सह ,रा . सु . गवई चे चिरंजीव राजेंद्र गवई , महातेकर , अर्जुन डांगळे सह अनेक चळवळीला विसरलेले नेते दिसले . पण तिथे एक व्यक्ती missing होते ते म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर .

कोणी म्हणेल कि दुश्मनाच्या अंतविधीला उपस्थित रहाव लागत पण आमच्या बापाच्याही बाप असलेले बाबासाहेब आणि आंबेडकरी जनतेवर जुलूम आणि हत्या करणाऱ्या बाळ ठाकरे आणि सेनेचा आदर आणि नावाला आंबेडकरी असलेल्या खोट्या शेजाऱ्याला असेल परंतु सख्ख्या बापाच्या रक्ताच्या पोराला बापाच्या अपमानाबद्दल बाळ ठाकरे सारख्या व्यक्ती बद्दल कधीच आदर असू शकत नाही हे बाळासाहेब आंबेडकरांनी अनुपस्थित राहून स्वाभिमानी भीमबाण्याने दाखवून दिले . ………………… जयभीम
(क्रमश : पुढील अंतिम भाग -५ )

No comments:

Post a Comment