मागील भागात आपण पाहिलं कि बौद्ध धम्माचे साहित्यिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे विकृतीकरण इथल्या ब्राह्मण्यवादाने केलेलं आहे . काही काल्पोकाल्पित काव्य, कथा रचून बहुजन समाजाला फिल्मी वाटणाऱ्या पात्राला प्रत्यक्षात उतरवून बहुजन समाजाला मानसिक गुलामीत लोटलेल आहे . इथल्या बहुजन ओबीसी ने स्वताला गुलामगिरीत ठेवायचं कि मुक्त व्हायचं हे त्यांनी ठरवावं परंतु बौद्ध धम्मबांधवांनी धम्माचे पालन आणि धम्माबद्दलचा विपर्यास आणि इतिहासाची माहिती ठेवणे हेही महत्वाच आहे .
' दसरा ' या शब्दाचा अर्थ आहे रावण ; याला दहा तोंड होती म्हणतात आणि त्याच दिवशी त्याचा वध करण्यात आला म्हणून हा दसहरा ! रावणाला दहा तोंडे नव्हतीच . दहा प्रकारची शक्ती याला प्राप्त होती , तो दसबलाने युक्त होता . ते दस बळ वैगेरे शक्ती काहीही नव्हत तर त्याने दहा परिमिता पूर्ण केलेल्या होत्या म्हणून तो दसबळ असलेला बौद्ध धर्मीय लंकेचा राजा रावण होता आणि दसबळ हे मुळात भगवान बुद्धाचे आहे
' सब्बेपि बुद्धं दसबल तनुज बोधिचेतिय नमामि '
- ज्याने दहा प्रकारचे बळ अथवा गुण प्राप्त केलेले आहे असे ते बुद्ध . या दसऱ्याला भारतातून ब्राह्मणी परंपरेने बौद्ध धम्माचा लोप केला हा अर्थ त्याच्यात आहे आणि रामायणामध्ये बुद्धाला चोर जाणा म्हटलेलं आहे . आजही आदिवासी रावणाची पूजा करतात . राम हा ब्राह्मण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा तर रावण हा ब्राह्मणेतर म्हणजेच बौद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा आहे . रावणाला ते राक्षस संबोधतात . राक्षस शब्दाचा अर्थ जो रक्षण करतो तो . कारण ' रक्ष' या धातूपासून राक्षस हा शब्द बनलेला आहे . यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी दिला जात असे परंतु यज्ञाला आणि प्राणीहत्येला ज्यांनी विरोध केला ते म्हणजेच राक्षस ज्यांनी प्राणीमात्रांचे आणि जनतेचे रक्षण केले ते असाच रक्षण करणारा रावण होता . रावणाला श्रीलंकेचा राजा दाखविण्याचे कारण म्हणजे श्रीलंका (सिलोन ) हे बौद्ध धर्माचे केंद्रस्थान होते . म्हणून रावण हा श्रीलंकेचा राजा दाखविलेल आहे . बौद्ध साहित्यात 'लंकावतार सूत्र' हे अत्यंत महत्वाचे आहे . रामायण हे महाकाव्य आहे आणि हे महाकाव्य पाली भाषेतील जातक कथेतील 'दसरथ जातक ' या जातक कथेमधून आणि ब्राह्मणी स्वरूप देऊन रचण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे भगवतगीता हे दुसर तिसर काहीही नसून धम्मपदाची नक्कल आहे . ' विजयादशमी ' च्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्र खाली ठेवून बुद्धधम्माचा स्वीकार केला म्हणून ही विजयादशमी आहे . परंतु याच दिवशी ब्राह्मणी परंपरा शस्त्र काढून त्याची पूजा करतात .
' दिवाळी ' च्या दिवशी धम्मसेनापती महामोग्गलायन यांना ठार करून तुकडे तुकडे करण्यात आले कारण बौद्ध धम्माचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार धम्मसेनापती महामोग्गलायन यांनी केला होता म्हणून त्यांचा काटा काढायचा म्हणून हे कृत्य ब्राह्मणी संस्कृतीने कट रचून केले . आणि तो दिवस 'दिवाळी' म्हणून साजरा केला . नागपूर मधील रामटेक या ठिकाणी आश्विन पौर्णिमेला ' पितांबर ' जाळतात त्याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतात . 'पीत ' म्हणजे पिवळे व 'अंबर ' म्हणजे वस्त्र म्हणजेच याच दिवशी अनेक बौद्ध भिक्खू च्या कत्तली आणि खून यांनी केलेत आणि याच दिवशी धम्मसेनापती सारीपुत्र यांचे महापरीनिर्वाण झाले त्यांना मारून टाकण्यात आल म्हणून ते पितांबर जाळण्याची परंपरा निर्माण करतात .
आर्य नागार्जुन हे आयुर्वेदाचे श्रेष्ठ जाणकार होते तसेच बौद्ध धर्मीय ,आयुर्वेदाला जे मोठे स्वरूप प्राप्त झाले ते केवळ नागार्जुन मुळे ! परंतु इथली ब्राह्मणी संस्कृती आयुर्वेदाला फक्त नागार्जुन यांचे नाव देतात मात्र आचार ,विचार पूर्ण वैदिक आणि ब्राह्मणी परंपरेचे आहेत . योगा हि बौद्ध धम्माची देन आहे . पंतजली याने बौद्ध धम्माचा उपासक असल्याचा आव आणून हि विद्या शिकून घेतली नंतर बौद्धांचे विरोधक बनून ब्राह्मणी शासन निर्माण केले आणि योगविद्या ब्राह्मणी परंपरेने प्रसारित केली . योगविद्या हे दुसरे तिसरे काही नसून 'आनापानसतिचे' विकृतीकरण केले आहे . पाली हि साऱ्यांची भारतीय भाषांची जननी आहे , असे आचार्य बुद्धघोषाने म्हटले आहे . परंतु ब्राह्मणी परंपरेने संस्कृतला साऱ्या भाषांची जननी आहे अस म्हटलं आहे .
बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरे कपडे धारण करतात . हे कपडे आपण मंगलप्रसंगी धारण करतो . आपण पाहतो कि उच्चवर्णीयाकडे कोणी मृत झाले असेल तर ते पांढरे वस्त्र धारण करतात . धम्मामध्ये आपण शुभेच्छ्या देतांना 'भवतु सब्ब मंगल ' असे म्हणतो . पण ब्राम्हणी परंपरा याचेही विकृतीकरण करते मंगल या शब्दाचा अर्थ ब्राम्हणी परंपरेने मुला - मुलीना अडथळे आल्यास ' मंगळ आहे' असे म्हणतात . करुणा ,मैत्री , मुदिता आणि उपेक्षा हे 'ब्रम्ह ' आहे . हेच श्रेष्ठ आहे . परंतु ब्राम्हणी परंपरेने ब्रम्हा ला श्रेष्ठ म्हटले आहे . 'पूजयामि मुनिन्दस्स सिरीपादसरोरुहे ' म्हणजे येथे सिरीपाद म्हणजे 'श्रीपाद '. श्री म्हणजे गुणसंपन्न ,विद्यासंपन्न ,सर्वज्ञ असे जे बुद्ध म्हणजे मुनींचे जे इंद्र (प्रमुख ) असे जे आहेत . ज्यांचे चरण हे कमाळाप्रमाणे आहेत , त्यांची पूजा करतो . श्रीपाद हे बुद्धाचे नाव आहे . पालीमध्ये ' गणपती ' या शब्दाचा अर्थ गण म्हणजे भिक्षुंचा गण अथवा संघ व पती म्हणजे प्रमुख हे भगवान बुद्धाला उद्देशून म्हटले आहे पण यांनी मळाचा आणि हत्तीच्या डोक्याचा गणपती बनविलेला आहे .
अशाप्रकारे ब्राम्हणी परंपरेने बौद्ध संस्कृतीचे जे विकृतीकरण केलेले आहे ते सर्वांनी जाणायला हव आणि बदलत्या काळात बुद्धविचार रुजवायला हवेत . इतिहासकालीन वास्तव उलगडून इतरांना दाखवायला हव तर बौद्ध धम्माच्या वाटचालीस नवी प्रेरणा आणि दिशा मिळेल . यासाठीच हा माझा छोटा प्रयत्न तीन भागामध्ये दाखविण्याचा होता . आपणही याच अवलोकन करून प्रचार आणि प्रसार करावे हि विनंती !
!!! जयभीम ............... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव , धम्म उपासक
Enter your comment...अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती मिळाली त्यामुळे आभार. बुद्धाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मी सम्यक प्रयत्न करीन
ReplyDelete