Saturday, 14 September 2013

!!! मळाचा गणपती आणि मळलेले लोक !!!

हिंदू पुराण ग्रंथ यांचा आधार घेतला तर अस लक्षात येत कि शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वतीने अप्रकृतिकपणे पुत्र निर्माण केलेत तर दुसऱ्या पुराणात हे सांगतात कि अनेक देव देवता शिव म्हणजेच महादेवाला विनंती करू लागले कि आमच्या रक्षणासाठी आपण आपला पुत्र निर्माण करावा . पुढील गोष्टीचे वर्णन करताना मला अतिशय लज्जित वाटते पण लिहिणाऱ्याने त्याची तमा बाळगली नाही तर आपलेही कर्तव्य आहे कि यावर विवेकबुद्धीने याचे खंडन करणे आवश्यक आहे . म्हणून शिवपुराणामध्ये लिहिल्यानुसार पार्वती आणि शिव दोघे जंगलामध्ये फिरायला जातात तेव्हा पार्वतीला हत्ती आणि हत्तीणीचा प्रणय चाललेला दिसतो त्यानंतर पार्वतीहि शिवाकडे तशी इच्छा व्यक्त करते ,आणि अश्लीलपणाचा कळस सुरु होतो १००० वर्षे हा शिवाचा आणि पार्वतीचा प्रणय चालतो . त्यानंतर चा अश्लीलपणा मी अधिक सांगू शकत नाही त्यासाठी शिवपुराण आणि अन्य पुराणांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल . माझ सांगण्याच तात्पर्य हेच आहे कि कोणी शिवाचा पुत्र अर्थात गणेश म्हनजेच गणपती चा जन्म काही ग्रंथ प्राकृतिक आणि काही अप्रकृतिक सांगतात . यावरून हे कल्पोकल्पित आणि अश्लीलतेचा कळस गाठनारे पुराणके आहेत . अजूनही इथला बहुजन समाज हिंदू ब्राह्मणी गुलामगिरीत आधुनिक पद्धतीने जगत आहे .

मनुस्मृतीनुसार स्त्रियांनाही 'शुद्र' मानलेल आहे . म्हणून शिवपुराणात असा उल्लेख आहे कि पार्वती एकदा अंघोळीला गेली असता तिने शरीराच्या मळाणे गणेश अर्थात गणपती तयार केला . यावरून अस आपण तार्किकपणे पाहल तर काही गोष्टी निर्माण होतात कि पार्वतीने मळाने गणपती बनविला तर तिच्या शरीरावर किती मळ असेल ? म्हणजे तिने किती महिन्यापासून किवा वर्षापासून अंघोळ केलेली नसेल म्हणून तिच्या अंगावर एव्हढा मळ साचला असेल ? किती हि एखाद्या स्त्रीची बदनामी इथल्या ब्राह्मणी परंपरेने काल्पनिक गोष्टी मध्ये हि पार्वतीची अर्थात स्त्रीची बदनामीच केलेली आहे . असा हा गणपती जन्माची अख्यायिका आहे .

परत दुसरा प्रसंग एकदा परत पार्वती अंघोळीला गेली असता बाहेरून कोणी आत मध्ये येऊ नये म्हणून गणेश अर्थात गणपतीला पहारा करण्यास पार्वतिने ठेवले . ब्राह्मण ग्रंथकार पुराणकार यांची पार्वतीच्या अंघोळीची रुची वारंवार पुराणामधून दाखविलेली आहे यावरूनच त्यांची नैतिकता कळून येते. ठरल्या प्रमाणे गणपती बाहेर उभा राहतो परंतु तितक्यात महादेव/शंकराचे आगमन होते . गणपती शंकराला आत जाण्यापासून रोखतो तर महादेव गणपतीचे शीर / डोके छाटून टाकतो . इथवर सर्वांनी ऐकलेलं आहे पण गुलामगिरीत जगणाऱ्या बहुजन ओबीसी ला आपल्या डोक्यात 1400 cc (cranial capacity ) अर्थात बुद्ध्यांक असलेला साधा मेंदू नसावा याचे आजच्या आधुनिक युगात मोठ आश्चर्य वाटत . त्या निमित्ताने काही तार्किक प्रश्न आपल्या डोक्याला आपण का विचारू नयेत ?जसे अगोदर पुराणकाराने सांगितल्याप्रमाणे तिच्या अंगावर एव्हढा मळ होता कि तिने गणपती बनविला म्हणजेच ती अंघोळ करत नसेल म्हणजे तिला अंघोळीला का जावे लागले बर ? गेली तर गेली पण तिला त्यावेळी बाथरूम असेल ना मग त्यालाही दरवाजा असेल तर तिथे गणपतीला ठेवण्याची गरज काय होती ? बर गणपतीला बाहेर ठेवलं तर ठेवलं पण शंकराला अस कोणत अर्जंट काम किवा मिटिंग होती कि direct पार्वती अंघोळ करीत असताना थोडा वेळ थांबताहि येत नव्हत ? यासाठी गणपतीचं डोक का त्याला उडवाव लागल , गणपती हा जर शंकराचा मुलगा होता तर स्वतःच्या मुलाला तो ओळखत नव्हता का ? किवा तो अंतर्यामी परमेश्वर आहे जगातील प्रत्येक जीवाला तो आपल्या अंतरज्ञानाने ओळखत असेल तर स्वतःच्याच मुलाला का ओळखू शकला नाही ? असे अनेक प्रश्न बुद्धीप्रामान्यवाद्यांना पडतात आणि ते शत प्रतिशत खरही आहे ह्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत .

बर गणपतीचे डोके उडविल्यानंतर पार्वती अंघोळीवरून बाहेर येते तर तिला हे चित्र दिसते आणि महादेवाला ती सुनावते आणि हा आपला मुलगा आहे असे सांगते यावरून हेच सिद्ध होते कि शंकर हा मूर्ख असायला हवा कारण स्वतःच्या पत्नीस फक्त भेटण्याच्या कारणाने स्वतःच्या मुलाची हत्या करतो आणि त्याला माहितही नसते कि हा आपला मुलगा आहे म्हणून , पण पुराणकार पुढे सांगतात कि तेव्हा समोरून एक हत्ती चाललेला असतो तेव्हा त्याचे डोके कलम करून गणपतीस लावतो अर्थात गणेशाचे गजमुख होऊन जाते . इथेही जास्त डोके न लावता बहुजन गुलाम लोकांनी विचार करायला हवा कि जर शंकर महादेव हा सर्वशक्तिमान आहे तर त्यांला हत्तीचे डोकेच का दिसले ? जर तो खरा शक्तिमान असेल तर त्याने हत्तीऐवजी मनुष्याचे डोके का लावले नाही ? आणि कितीही लहान हत्ती जरी घेतला तर त्याचे डोके मनुष्याच्या डोके नसलेल्या धडावर match च होत नाही आणि एव्हढे वजनदार डोके मानवी शरीर पेलू शकत नाही . काही दिवसापूर्वी मी माझ्या एका मित्राच्या हॉस्पिटल मध्ये गेलो असता तिथे मला गणपतीचे मोठे चित्र लावलेले दिसले . मी अभियांत्रिकी क्षेत्रात जरी असलो तर माझी सर्वात अगोदरची पसंती मेडिकल फिल्ड होती म्हणून मला बरीच माहिती आहे, त्यामुळे मी माझ्या मित्राशी याबद्दल इंग्रजीमधून संवाद साधला आणि त्याला विचारलं कि मला एका मनुष्याला हत्तीचे डोके लावायचे आहे तर अशी सर्जरी होऊ शकेल काय ? तर तो हसून मला म्हणाला तू गंमत करतोस का ? तुलाही माहित आहे अस शक्य नाही . मग मी त्याला म्हणालो जर मनुष्याचे डोके धडापासून वेगळे केले तर मेंदूचा संपर्क शरीराशी तुटून मनुष्य लगेच मरतो आणि इतर प्राणी किंवा मनुष्याचेही डोके आपण लावू शकत नाही . तो अगदी बरोबर आहे म्हणाला ,यावर मी त्याला प्रश्न केला कि हा गणपतीचा लावलेला फोटो याच ऑपरेशन शंकराने कस केल असेल ? जर तू गणपतीचा फोटो लावत अशील तर स्वाभाविक इथे येणाऱ्या माझ्यासारख्या पुरोगामी विचारांच्या लोकांची समजूत होईल कि तू एक डॉक्टर म्हणून अशाप्रकारच्या सर्जरीच समर्थन करत आहे आणि तुला हे मेडीकली आणि सायंटिफिकली आम्हाला प्रुव्ह कराव लागेल . त्यानंतर तो अतिशय लाजीरवाणा झाला . तुम्ही बहुजन मंडळी अजूनही धार्मिक गुलामगिरीत आहात. आज तुम्ही डॉक्टर आहात ते गणपती ,महादेव यांनी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही दिला ,तुम्ही शिकले केवळ महामानव डॉ . बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे! काही दिवसांनी मला त्याने फोन करून आग्रहाने चहासाठी बोलवले पण मला परत जावे वाटेना पण तिथे गेलो तर कळाल गणपतीचा फोटो त्याने त्याच दिवशी काढून त्याऐवजी बाबासाहेब ,महात्मा फुले आणि इतर महापुरुषाचे फोटो मला पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे त्याच्या विचारातही फुले ,शाहू ,आंबेडकर दिसले सांगायचं तात्पर्य एव्हढंच कि आंबेडकरी विचारामध्ये जग बदल्याची ताकद आहे फक्त संयम आणि अभ्यासाची जोड ठेवली तर सर्व शक्य आहे .

मागील काही लेखात मी सांगितले आहे कि हि सर्व पुराण, धर्मग्रंथ फक्त बौद्ध धर्मास टक्कर देण्यासाठी लिहिली गेली आहेत . जिथे हत्तीला बौद्ध धम्मात महत्वाचे स्थान आहे . तथागताच्या जन्मापासून महानिर्वानापर्यंत अनेक वेळा हत्तीचा उल्लेख येतो . तिथे ब्राह्मण पुराणकार शंकराकडून हत्तीच्या डोक्याचे शिरच्छेद करतात याचा दुसरा तिसरा अर्थ काही नव्हे तर हा शिरच्छेद म्हणजे बौद्ध धम्माचा पाडाव करणे आणि ब्राह्मणी व्यवस्था लादणे होय . मागे सांगितल्या प्रमाणे

'पूजयामि मुनिन्दस्स सिरीपादसरोरुहे '

म्हणजे येथे सिरीपाद म्हणजे 'श्रीपाद '. श्री म्हणजे गुणसंपन्न ,विद्यासंपन्न ,सर्वज्ञ असे जे बुद्ध म्हणजे मुनींचे जे इंद्र (प्रमुख ) असे जे आहेत . ज्यांचे चरण हे कमाळाप्रमाणे आहेत , त्यांची पूजा करतो . श्रीपाद हे बुद्धाचे नाव आहे . पालीमध्ये ' गणपती ' या शब्दाचा अर्थ गण म्हणजे भिक्षुंचा गण अथवा संघ व पती म्हणजे प्रमुख हे भगवान बुद्धाला उद्देशून म्हटले आहे पण यांनी मळाचा आणि हत्तीच्या डोक्याचा गणपती बनविलेला आहे .

अशाप्रकारे ब्राम्हणी परंपरेने बौद्ध संस्कृतीचे जे विकृतीकरण केलेले आहे . मुळात पुराण, वेद लिहिणाऱ्या ब्राह्मणांनी कल्पोकल्पित कथा रचून इथल्या बहुजन समाजाला वेड लावलेलं आहे त्याचाच कित्ता गिरवत भटमान्य टिळकाने गणेशोत्सव महात्मा फुल्यांनी सुरु केलेल्या शिवाजी महाराज जयंती ला बंद करण्यासाठी आणि ब्राह्मणी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सुरु केला होता . म्हणून आज बहुजन समाजासोबत काही फक्त नावाला आंबेडकरी असलेले लोक हिंदू ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत सर्वात प्रथम अशा लोकांना बहिष्कृत करायला हव त्यामुळे आपल्या चळवळीची गती आपण आणखी मजबूत करू शकू .

!!! जय भीम .................... नमो बुद्धाय !!!
- प्रवीण जाधव

2 comments:

  1. नमस्कार..
    मला वाटत होत की खरच की काय पण दलितांच्यावर अन्याय झाला असेल का? शिक्षणापासून यांना का बरे वंचित ठेवले असावे? पण माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या लेखातून मिळाली.. जय हिंद जय भारत

    ReplyDelete
  2. तुम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्विकारला त्यामुळे तुम्हांला हिंदू धर्माबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही . हिंदू धर्माबद्दल द्वेष पसरवण्याऐवजी बौद्ध धर्म वाढवण्याकडे लक्ष द्या. गौतमबुद्धांच्या जन्माची गोष्ट ( महामायेच्या स्वपनात पांढरा हत्ती येतो त्यामुळे गौतमबुद्धांचा जन्म होतो.) माहित असेलच. पुरावा भारहुत स्तुप. त्यामुळे स्वत:च्या बुडाखालचा अंधार बघा मग दुसर्‍यांना नावे ठेवा.

    ReplyDelete